ज्योतिर्मयद्वादशलिंगानां शिवात्मनां प्रोक्तमिदं क्रमेण ।
स्तोत्रं पठित्वा मनुजोsतिभक्त्या फलं तदालोक्य निजं भजेच्च ।।१३।।
ज्याप्रमाणे पूर्णाहुती शिवाय यज्ञाला सांगता प्राप्त होत नाही त्याचप्रमाणे फलश्रुती शिवाय स्तोत्राची सांगता होत नसते या भारतीय दंडकाचा विचार करून, आचार्यश्रींनी रचलेला हा फलश्रुतीचा श्लोक.
साधकांच्या भक्तांच्या दृष्टीने फलश्रुतीला फार वैशिष्ट्यपूर्ण स्थान नसले तरी, सर्वसामान्य माणूस यात वर्णन केलेल्या फळाच्या आधारे भक्ती मार्गाला लागतो त्यामुळे फलश्रुती वर्णन केलेली असते.
आचार्य श्री फलश्रुतीच्या पद्धतीप्रमाणे प्रथम तीन चरणात स्तोत्र कसे म्हणावे ? ते सांगताना म्हणतात,
ज्योतिर्मयद्वादशलिंगानां शिवात्मनां प्रोक्तमिदं क्रमेण ।
स्तोत्रं पठित्वा मनुजोsतिभक्त्या – या बारा ज्योतिर्लिंगांचे हे भगवान शंकराचे स्तोत्र जो मनुष्य अतीव भक्तिभावाने पठन करीन,
अर्थात हे स्तोत्र केवळ म्हणायचे म्हणून नव्हे तर त्यामागे भक्तीपूर्ण अंत:करण असेल तर अशा भक्ताला काय काय प्राप्त होते हे सांगताना शेवटच्या ओळींमध्ये आचार्यश्री वर्णन करतात,
फलं तदालोक्य निजं भजेच्च – तो निज फलाला प्राप्त होतो.
निज शब्दाचे दोन अर्थ आहेत. वाचणाऱ्याच्या दृष्टीने निज म्हणजे त्याचे स्वतःचे. अर्थात त्याच्या स्वतःच्या ज्या कोणत्या इच्छा असतात, सगळ्या इच्छा यास स्तोत्र आणि प्राप्त होतील. पूर्ण होतील.
तर निजाम म्हणजे भगवान शंकरांचे स्वतःचे निवासस्थान अर्थात कैलास.
या देहात असेपर्यंत सर्व इच्छा पूर्ण होतील आणि हा देह सुटल्यावर भगवान शंकरांच्या कैलास लोकात स्थान मिळेल.
असे दोन्ही अर्थ आचार्य श्री या एकाच शब्दातून सादर केलेले आहेत.
नमः शिवाय !
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply