याम्ये सदंगे नगरेsतिरम्ये विभूषितांग विविधैश्च भोगै: ।
सद्भक्तिमुक्तिप्रदमीशमेकं श्रीनागनाथं शरणं प्रपद्ये ।।६।।
भगवान शंकरांच्या या बारा दिव्य ज्योतिर्लिंगांपैकी पाच वैभवशाली स्थाने महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यापैकी बालाघाटच्या पर्वतरांगांमध्ये निसर्गरम्य परिसरात विराजमान असणारे वैशिष्ट्यपूर्ण स्थान म्हणजे श्रीक्षेत्र औंढा नागनाथ.
या क्षेत्राची प्राचीन नाव आमर्दकपूर. सर्व दुष्टांचा विनाश करणारे भगवान शंकर आमर्दक या नावाने ओळखले जातात.
याच नावाने शिव उपासना करणारा ही शैव पंथ देखील प्रचलित आहे. ते स्वतःला आमर्दक संतान असे म्हणतात.
या क्षेत्राचे दुसरे नाव म्हणजे दारुकावन. दारूक नावाचा राक्षसाच्या विनाशासाठी भगवान शंकर येथे प्रकट झाले आणि त्यानंतर तेथेच निवास करते झाले. अशी या क्षेत्राची कथा आहे.
अनुज्ञान नागनाथ, नागेश्वर अशा नावांनी देखील या स्थानाचा उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये मिळतो.
वेरूळ अजिंठ्याच्या शिल्प कामाशी तुलना करावी इतके या मंदिराचे बांधकाम रेखीव आहे.
कनकेश्वरी देवीच्या जवळ १२९४ च्या उल्लेखासह सापडलेल्या शिलालेखानुसार मंदिराचे प्राचीनत्व इतके तर निश्चितच जुने आहे.
त्याच्याही पूर्वी वाकाटक राष्ट्रकूट राजघराण्याचा या मंदिराशी संबंध असल्याचे उल्लेख आहेत.
अशा या वैशिष्ट्यपूर्ण ज्योतिर्लिंग स्थानाचे वैभव सांगतांना आचार्य श्री म्हणतात,
याम्ये सदंगे – याम्य म्हणजे दक्षिण दिशेला.
दक्षिण दिशेचे अधिपती भगवान यमराज असल्याने त्या दिशेला याम्य दिशा असे म्हणतात.
नगरेsतिरम्ये – अत्यंत रमणीय अशा नगरांमध्ये.
विभूषितांग
विविधैश्च भोगै: –
विविध भोगांच्याद्वारे अंग सुशोभित केलेले.
सद्भक्तिमुक्तिप्रदमीशमेकं
सुयोग्य भक्ती आणि मुक्ती प्रदान करणाऱ्या, या संपूर्ण विश्वाचे एकमेव स्वामी असणाऱ्या,
श्रीनागनाथं शरणं प्रपद्ये ।। भगवान श्री नागनाथांना मी शरण जातो.
Leave a Reply