यो डाकिनीशाकिनिकासमाजे निषेव्यमाण: पिशिताशनैश्च ।
सदैव भीमादिपदप्रसिद्धं तं शंकरं भक्तहितं नमामि ।।८।।
महाराष्ट्रामध्ये पसरलेल्या सह्याद्रीच्या डोंगर रांगात पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भीमा नदीचे उगमस्थान म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या निसर्गरम्य निवास करणारे भगवान शंकरांचे ज्योतिर्लिंग स्थान म्हणजे श्री भीमाशंकर.
अभयारण्य स्वरूपात आरक्षण केल्या गेले असल्याने अत्यंत निसर्गरम्य या परिसरात अनेक वन्यजीव तथा याच प्रांतात विशेषत्वाने पाहायला मिळणारी शेकरू म्हणजे उडणारी खार हे या परिसराचे वैशिष्ट्य.
कुंभकर्णाचा पुत्र असणाऱ्या भीम नामक राक्षसाने तपस्या करून भगवान विष्णूंना देखील पराजित केले. त्यानंतर त्याने सुदक्षिण नावाच्या शिवभक्त राजावर आक्रमण करून तो पूजा करीत असलेल्या पार्थिव शिवलिंगावर प्रहार करण्याचा प्रयत्न करताच त्यातून भगवान शंकर प्रकट झाले आणि त्या राक्षसाचा विनाश केला त्यामुळे या स्थानाला भीमाशंकर म्हणण्याची पद्धत पडली.
हिमाद्री पंथी बांधणीचे अत्यंत सुबक कोरीव काम , चिमाजी आप्पा यांनी आणलेली पाच मणाची मोठी घंटा येथील आकर्षण स्थाने.
या भगवान भीमाशंकर यांचे वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात,
यो डाकिनीशाकिनिकासमाजे – जय भगवान शंकर डाकिनी शाकिनी इत्यादींच्या समाजामध्ये हे,
निषेव्यमाणं पिशिताशनैश्च – भूतप्रेत इत्यादींच्या द्वारे सेवा केले जातात.
सदैव भीमादिपदप्रसिद्धं – आपल्या भक्तांना जे भीम म्हणजे विशाल फल प्रदान करतात,
तं शंकरं भक्तहितं नमामि – त्या भक्त हितकारी भगवान शंकरांना मी नमन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply