
ईस्टर संडे ख्रिस्ती बांधवांसाठी हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. ख्रिस्ती समाज हा सण साजरा करतात. पॅलेस्टाइनमध्ये रोमन व ज्यू लोकानी येशू ख्रिस्ताला क्रुसावर चढविले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी रविवारी येशू परत जिवंत झाला. ह्या प्रसंगाचे स्मरण म्हणून वसंत ऋतूतील पहिल्या पौर्णिमेनंतर येणारा पहिला रविवार, हा ईस्टर संडे म्हणून हा सण साजरा केला जातो. ईस्टर दरवर्षी निश्चित तारखेला ने येता एकवीस मार्च नंतर पहिल्यांदा पूर्ण चंद्र दिसल्या नंतरच्या पहिल्या रविवारी ईस्टर येतो. हा शब्द जर्मनीतील ईओस्टर शब्दातून घेतला आहे.
इ. स. दुसऱ्या शतकापासून येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाबाबतची मेजवानी या स्वरूपात सर्व ख्रिस्ती लोक हा सण साजरा करताना दिसतात. ख्रिस्ती संतांच्या चारही गॉस्पेल्समध्ये ख्रिस्ताच्या मृत्यूचे व नंतरच्या त्याच्या दर्शनाचे संपूर्ण वर्णन आढळते. ‘येशूचे पुनरुत्थान झाले’ या श्रद्धेचे प्रतिबिंब नव्या करारातील प्रत्येक पानावर दिसून येते. जगातील सर्व आबालवृद्ध ख्रिस्ती लोक हा सण अत्यंत उत्साहाने साजरा करतात. चर्चवर आकर्षक रोषणाई केली जाते तसेच क्रूस, कोकरू, अंडी इ. कलात्मक धार्मिक प्रतीकेही ह्या सणाप्रित्यर्थ तयार केली जातात. नवीन वस्त्रे परिधान करून ख्रिस्ती लोक चर्चमध्ये जातात व घरी गोडधोड करून हा सण आनंदाने साजरा करतात.
युरोप आणि काही देशांत अंडी खाली ढकलतात, ही अंडी न फुटता खाली आणल्यास तो विजेता ठरतो.
अनेक देशांत लहान मुलं आपली इच्छा एका पत्रावर लिहितात आणि पाठवतात. तसेच पोस्ट ऑफिसमधील काही कर्मचारी त्यांना उत्तर पाठवतात.
काही देशांत बागांमध्ये अंडी लपवलेली असते. ही अंडी शोधण्याची स्पर्धा मुलांमध्ये लावली जाते.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
छायाचित्र सौजन्य: Henry Ford College
पुणे.
Leave a Reply