अग्रलेखांचे बादशहा म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ पत्रकार आणि दैनिक नवाकाळचे संपादक नीलकंठ खाडिलकर यांचा जन्म ६ एप्रिल १९३४ रोजी झाला.
खाडिलकर हे दैनिक नवाकाळचे अनेक वर्षं संपादक होते. या काळात महत्त्वाच्या घडामोडींवर त्यांनी अग्रलेखांमधून भाष्य केलं. संपूर्ण अर्थशास्त्र हा विषय घेऊन ते बी.ए. ऑनर्स झाले होते. ज्येष्ठ नाटककार आणि ‘केसरी’ चे माजी संपादक कृ. प्र. खाडिलकर यांचे ते नातू होते.
खाडिलकर हे एक उत्तम मुलाखतकार होते. त्यांनी घेतलेल्या गोळवलकर गुरुजी आणि सत्य साईबाबा यांच्या मुलाखती अतिशय गाजल्या होत्या.
नीलकंठ खाडिलकर यांनी आपल्या तर्कशुद्ध आणि संदर्भासहित लेखनातून इतिहासाची मांडणी करत वाचकांचे प्रबोधन केले आणि त्याचवेळी वर्तमान सामाजिक-राजकीय परिस्थितीचे अभ्यासू व विवेकी विवेचनही वाचकांपर्यंत पोहचविले.
नीलकंठ खाडिलकर यांचे २२ नोव्हेंबर २०१९ रोजी निधन झाले.
Leave a Reply