नवीन लेखन...

एडटेक कंपन्यांचे शैक्षणिक संस्थांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह?

शिक्षणाचा उपयोग पूर्वी मुल्यां साठी व्हायचां तो आता आर्थिक मुल्यांसाठीच होत आहे.एज्युकेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच एड टेक कंपन्या गेल्या अनेक वर्षापासून चर्चेत आहेत. लाॅक डाऊन मुळे ऑनलाईन  शिक्षणाची उपयोगीता वाढली आहे व वाढत राहणार.आज भारतात एडटेक उद्योग जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा उद्योग आहे.२०२२ पर्यंत हा उद्योग ३.२$ पर्यंत पोहोचणार आहे.एडटेक कंपन्यांची  इतकी भरभराट होत आहे की शैक्षणिक संस्थांच्या अस्तित्वावर त्या प्रश्नचिन्ह बनवत आहेत. कोरोना च्या दोन वर्षाच्या काळात शिक्षण संस्था बंद होत्या त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून अनेकांनी शैक्षणिक तंत्रज्ञानाला जवळ केले. एडटेक कंपन्या शिक्षण खरोखर मनोरंजक बनवण्याच्या उद्देशाने भारतातील शैक्षणिक चित्र बदलवतच  नाहीत तर विद्यार्थ्यांचे करियर घडवत आहेत.

कोणी हवे असल्यास शिकू शकते ,तंत्रज्ञानाचे द्रोणाचार्य आचार्य म्हणून उपलब्ध आहेत.

संवादात्मक स्क्रीन ,ऑनलाइन वर्ग तसेच एड टेक स्टार्टअप मुळे विषय अधिक चांगल्या प्रकारे समजतो ,शिकणें मनोरंजक  व जटील संकल्पना समजण्यास मदत होते. संबोध स्पष्ट नसणें हेच शिक्षणाच्या पिछेहाटीचं कारण आहे. पोपटपंची ने करिअर करण्याचे दिवस आता संपले आहेत.

शैक्षणिक परीणाम वाढविण्यासाठी डिझाईन केलेले तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर वापरून शिक्षण अधिक आकर्षक व सुलभ बनविले जात आहे.

शैक्षणिक संस्था संबोध स्पष्ट करण्यात कमी पडत आहेत. एडटेक कंपन्यांनी २४ तास आता शिक्षक घरी उपलब्ध करून दिले आहेत त्यांच्या साह्याने अनेक संबोध विद्यार्थ्यांना स्पष्ट होत आहेत व करिअरच्या वाटा त्यांच्यासमोर त्यांना प्रगतीकडे नेण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत.पैसे असणाऱ्या घटकांना एडटेक रेड कार्पेट ठरत आहे.खोऱ्याने पैसा ओढणाऱ्या व्यवसायाकडेच विद्यार्थी वळत आहेत म्हणून करिअर घडविणाऱ्या संस्थेकडे विद्यार्थी व पालक भरमसाठ पैसा देऊन वळत आहेत.गुणवत्ता असली की सरस्वतीचा वरदहस्त असतों पण आता लक्ष्मिपुत्रांनाही एडटेक कंपन्या वरदान ठरत आहेत. एडटेक कंपन्यांनी अनेक प्रकारची उत्पादने आणली जी शैक्षणिक साधने ठरत आहेत.बडेअभिनेते ही साधने वापरावीत म्हणून जाहिराती साठी आणली आहेत.ज्यांनी पैसे कमवून पैशासाठी जाहिराती केल्या यांची मुले अमली पदार्थाच्या आहारी गेली  तरी कंपनी ची उत्पादने वापरावी असे आव्हान तें करीत आहेत  व लोक त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत आहे कुठे गेली मूल्यें? नाहीतर जाहिरात करणारे जाहिरातीतील उत्पादने कुठे वापरतात? तें फक्त पैशासाठी जाहिरात करतात, लोकांची दिशाभूल होते हे त्यांच्या गावीही नसतं. आकर्षक पॅकिंग व मार्केटिंग ने ९०% नफा मिळतो. यापूर्वीही ऑफलाइन शिक्षणात कोचिंग ने धुमाकूळ घातलाच होता. कोचिंग क्लासेसनें चित्रपट काढणे ,सहल आयोजित करणे इथपर्यंत मजल गाठली होतीच,त्यांच्या अनेक ठिकाणी शाखा होत्या व आजही आहेत,हे जसं थोपविता आलं नाही तसंच ऑनलाइन शिक्षणात  एडटेक कंपन्यांना थोपविता  येणार नाही अशी परिस्थिती आहे. ज्ञानासाठी ज्ञानआज कोणालाच नको आहे. पैसा फेको तमाशा देखो हेच शिक्षण लोकप्रिय ठरत आहे.शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शिक्षणातील क्लिष्टपणा कमी होत आहे हे खरं असलं तरी माणसांनाही आता रोबोट लागत आहेत शस्त्रक्रीयाही आता रोबोट करत आहेत.शैक्षणिक संस्थांच्या अस्तित्वावर आता प्रश्न निर्माण होत आहे. बाजारपेठेत चांगलं तें व  हवं तेच खपतं. शैक्षणिक संस्था अद्ययावत जोपर्यंत होणार नाहीत तोपर्यंत शैक्षणिक तंत्रज्ञानाची भरभराटी होणारच. युजीसीच्या परिपत्रकाने चित्र बदललें असतें तर प्राचार्य व प्राध्यापकांच्या जागा रिक्त राहिल्याच नसत्या,कोचींग क्लासेस बहरलेलं नसतें व महाविद्यालये ओस पडली नसती.

युजीसीच्या नियंत्रणाखाली असलेली  काही महाविद्यालयें जाहिरातीतच चांगली आहेत प्रत्यक्षात ना तिथे तज्ञ प्राध्यापक, ना खेळाच्या सुविधा ना मैदान, ना सुसज्ज ग्रंथालय याला जबाबदार कोण? वर्षोनुवर्षे प्रभारी प्राचार्य व सी.एच.बी.प्राध्यापकावर चाललेली महाविद्यालये संलगनीकरण  समितीला नुसता खो देत आहेत. पुढच्या वर्षी सुधारणा करू म्हणत म्हणत सिल्वर ज्युबिली साजरी करत आहेत.चांगली व अद्ययावत सेवा देणाऱ्या बँकेत गर्दी होत आहे तसेच सर्व व्यवहार ऑनलाइन  झाल्यामुळे जे सुलभ आहे त्याकडेच  लोक वळणार, याला जसं थोपवता येत नाही तसेच शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या आगमनाला थोपवणे शक्य नाही. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर अशीच परिस्थिती शिक्षणक्षेत्रात आली आहे.

शिक्षणाचा आशय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात शैक्षणिक संस्था कमी पडत आहेत म्हणूनच ॲड टेक कंपन्या त्यांची जागा घेत आहेत.

ज्ञानापेक्षा कौशल्य व माहिती याला महत्त्व आले आहे. ज्ञानापेक्षा आयुष्य सुजलाम-सुफलाम करणारे माहितीचे पॅकेजेस  लोकप्रियठरत आहेत. बँकेत न जाणारा व घरून सर्व व्यवहार करणारा एक वर्ग जसा तयार झाला आहे तसाच शैक्षणिक संस्था मध्येही न जाता ज्ञानाच्या बाबतीत अद्ययावत होणारा एक वर्ग तयार होत आहे. वर्क फ्रॉम होम कल्चर जसं रूजत आहे तसंच लर्न फ्रॉम होम कल्चर रुजत आहे.

Survival of the fittest प्रमाणे ज्याच्याकडे पैसा आहे तोच शिकू शकेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.शैक्षणिक संस्थेमध्ये जाण्यापेक्षा पैसे देऊन तंत्रज्ञानच घरी आणणे रुळत आहे.जे रूचतं व रूळतं  तेच रुजत आहे.

एक BYJU’S चं उदाहरण घेतलं तरी पुरेसं आहे.

ऑनलाईन शिक्षणासाठी BYJU’Sघरगुती नांव बनले आहे.कोचिंग क्लास म्हणून सुरू  केलेले BYJU’S जगातील सर्वोच्च ऐडटेक कंपनी आहे.

व्हिडिओ चे धडे, अमर्याद सराव, सत्रे, आकर्षक प्रश्नावली तसेच  BYJU’Sमध्ये वर्ग चार पासूनCAT,IAS चाचणी पर्यंत तसेच UPSC,CBSC,NCERT चे ऑनलाइन वर्ग घेता येतात.

तसेच ब्रेनली एडटेक कंपनी सुद्धा पस्तीस देशात उपलब्ध आहे व ग्रहपाठाची समस्या सोडवते ९०० दशलक्ष पेक्षा सक्रिय वापरकर्ते यांचे आहेत ‘सगळं कुणालाच माहीत नसतं पण प्रत्येकाला काही ना काही माहित असतं’ हे त्यांचे घोषवाक्य आहे.

अशा अनेक एड टेक कंपन्या आपले अभ्यासक्रम घेऊन  तयार आहेतच पण शालेय व विद्यापीठीय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात ही लक्ष घालून ते राबवित आहेत.

करिअर करणाऱ्या साठी एडटेक कंपन्या पर्वणीच आहे.अनेकांचे शैक्षणिक तंत्रज्ञानाचा नैवेद्य दाखवून परदेशी स्थायिक व्हायचे मनसुबे आहेत.

शिक्षणाचीमदारआताकेवळ ऑफलाइनशिक्षणावर ठेवून चालणार नाही.

करोना सदृश्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी ऑनलाइन शिक्षण वर यापुढे अवलंबून राहावे लागणार आहे तसेच ऑनलाईन शिक्षणामुळे समाजातली दरी रुंदावत चालली असली तरी व कंपन्यांची भरभराट विषमता निर्माण करत असली तरी ती काळाची गरज आहे. युजीसीने या कंपन्या बरोबरील संबंध तोडण्याचा आदेश विद्यापीठांना दिला असला तरी आतापर्यंत कोचिंग क्लास वर  बंदी आणणे  तरी कुठे जमलें आहे. पर्याय नसेल तर या कंपन्यांच्या ऑनलाइन शिक्षणावरही बंदी कशी आणणार.

जाहिरात शिक्षणाचं अंग बनत आहे. ज्याची जास्त जाहिरात व सातत्याने येणारी जाहिरात लोकांची मानसिकता बदलत आहेत.

ज्ञानगंगा घरोघरी हे मुक्त विद्यापीठाचे घोषवाक्य होते. त्याद्वारे त्यांनी शिक्षण तळागाळातल्या व ज्यांचे शिक्षण खंडित झाले होते त्यांच्यासाठी काम केलं तसंच या कंपन्यांनी करावं एवढीच अपेक्षा.एकीकडे विषाणूचं म्युटेशन व दुसरीकडे शिक्षणाचं कंपनीकरण या विचित्र कात्रीत वंचीताचं शिक्षण सापडले आहे.शैली बदलून

आयुष्याला सदसदविवेकानें सामोरे जाणें हेच

अस्तित्वासाठी आवश्यक ठरणार आहे.

–डॉ. अनिल कुलकर्णी

९४०३८०५१५३ / anilkulkarni666@gmail.com

डॉ. अनिल कुलकर्णी
About डॉ. अनिल कुलकर्णी 32 Articles
डॉ. अनिल कुलकर्णी हे पुणे येथे स्थायिक असून ते शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची ३ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..