जगाचा कुतूहलाचा विषय असणारा “डोळे गरगरवून टाकणारा” आयफेल टॉवर पॅरीसवासियांना नको होता, युनिव्हर्सल एक्स्पोझिशन या कलाकृती प्रदर्शनाचा भाग होवू पहाणारा हा टॉवर सुरवातीला शहरात व प्रदर्शनात नसावाच असे अनेकांचे मत होते. ३२४ मीटर उंचीचा व १०१०० टनाचा “गुस्ताव आयफेल” नावाच्या माणसावरून नाव पडलेले हा टॉवर शहराला विद्रूप करणार असे अनेक फ्रेंच लोकांना वाटायचे.
आधुनिक इंजिनीअरिंगमधला चमत्कार समजल्या जाणाऱ्या या टॉवरवर, तो जेव्हा बांधला गेला तेव्हा त्याच्या रुक्षपणामुळे, आत्तापर्यंत दगडी इमारती, त्यात कोरलेली शिल्पं, चितारलेली चित्रं बघण्याची सवय असलेल्या फ्रेंच लोकांनी भरपूर टीका केली.
१८८९ च्या मार्च महिन्यात फ्रान्सची राजधानी पॅरिस इथे एक जागतिक प्रदर्शन भरणार होतं व त्यासाठी प्रवेशद्वार म्हणून ‘अलेक्झांडर गुस्ताव आयफेल’ या इंजिनीअरने हा टॉवर बांधला. १८८७ रोजी आयफेल टॉवर बांधण्यात सुरवात झाली, व १८८९ बांधून पूर्ण झाला.
दरवर्षी सुमारे ७० लाख पर्यटक आयफेल टॉवरला भेट देतात आणि टॉवरवरून दिसणारी रम्य पॅरिस नगरी, आयफेल टॉवरची रोषणाई आणि लाइट शोचा आनंद घेतात.
१९८५ च्या “अ व्हिव टू किल” या बॉन्डपटात टॉवरवर फाईट दाखवली आहे. तसेच बीटल्सच्या “आय एम द वॉलरस” या प्रसिध्द गाण्यात आयफेल आहेच.
या टॉवरच्या प्रतिकृती अमेरिकेत लास वेगासला तर चीनमध्ये शेनझेनला लोकाना आकर्षित करतात. फ्रेंच कारमेकर सिट्रॉनने तर १९२५ ते १९३४ या कालावधीत आपल्या गाड्यांची जाहिरात करण्यासाठी याचा उपयोग केला. जगातील सर्वात मोठे होर्डिंग म्हणून या रेकॉर्डची गिनीज बुकमध्ये नोंद आहे.
अश्या या टॉवरच्या प्रेमात कोणीही पडू शकेल. परंतु २००८ ला एरिका नावाच्या एका युवतीने आपले टॉवरवरील प्रेम पक्के करण्यासाठी या मनोऱ्याबरोबर चक्क लग्नच लावले. लग्नानंतर रजिस्टरमध्ये आपल्या नावाची एन्ट्री “एरिका ला टूर आयफेल” अशी करून तिने धमालच उडवून दिली.
आज आयफेल टॉवर म्हणजेच पॅरिस असं समीकरणच आज रूढ झालं आहे.
आयफेल टॉवरची तांत्रिक माहिती
हा टॉवर लोखंडाचे १८,०३८ तुकडे २५,००,००० रिबेट्सने जोडून बांधण्यात आला आहे.
बांधकामासाठी २ वर्षे २ महिने वेळ लागला.
एकूण वजन : ७,३०० टन.
टॉवरची उंची : (३२४ मीटर १.०६३ फूट), १७१० पायऱ्या.
उन्हाळ्यात लोखंड प्रसरण पावून टॉवरची उंची ३.५ इंचाने वाढते. वाऱ्याच्या जोरामुळे टॉवरचा सगळ्यात वरचा भाग १५ सेंटीमीटरने विस्थापित होतो., लोखंड गंजू नये म्हणून दर सात वर्षांनी टॉवरला रंग लावला जातो व त्यासाठी ५० ते ६० टन रंग लागतो. पर्यटकांना टॉवरच्या वरती नेण्यासाठी असलेली लिफ्ट इतक्या वेळा वरखाली करते की ते अंतर मोजल्यास दर वर्षाला ९८,००० किलोमीटर इतकं भरते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply