
जन्म: ४ डिसेंबर १९१०
मृत्यू: २७ जानेवारी २००९
गोवा-मुक्तीनंतर पोर्तुगलला भेट देणारे तसेच चीनला अधिकृत भेट देणारे वेंकटरामन हे पहिलेच भारतीय राष्ट्रपती । कामराज यांच्या रशिया भेटीवर आधारित प्रवासवर्णनासाठी त्यांना सोव्हिएट लँड-नेहरू पारितोषिक देण्यात आले.
`वेंकटरामन, रामस्वामी (आर. वेंकटरमन) हे भारताचे आठवे राष्ट्रपती होत. ते स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वाचे नेते होते. त्यांचा जन्म तमिळनाडू राज्यातील सजमदम् (तंजावर जिल्हा) येथे झाला. वेंकटरामन यांचे शालेय शिक्षण राजमदम् आणि उच्च शिक्षण चेन्नई येथे झाले. त्यांनी मद्रास विद्यापीठाच्या एम.ए. बी.एल. या पदव्या मिळविल्या. सुरुवातीस त्यांनी चेन्नई येथील उच्च न्यायालयात व पुढे सर्वोच्च न्यायालयात वकिली केली. याच काळात ते काँग्रेस पक्षाकडे आकृष्ट झाले आणि त्यांनी काँग्रेसअंतर्गत समाजवादी पक्षाच्या स्थापनेत भाग घेतला. ‘भारत छोडो’ आंदोलनातील सहभागामुळे त्यांना दोन वर्षे कारावास भोगावा लागला. तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी कामगार चळवळीस वाहून घेतले. पुढे चेन्नई येथून प्रकाशित होणाऱ्या लेबर लॉ जर्नल या मासिकाचे ते कार्यकारी संपादक झाले. स्वातंत्र्यानंतर त्यांची हंगामी संसदेत निवड झाली. तमिळनाडूच्या विधानसभेतील विजयानंतर त्यांच्याकडे उद्योग, कामगार, ऊर्जा आणि परिवहन खाती सुपूर्द करण्यात आली. देशाच्या नियोजन आयोगावर त्यांची सदस्य म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी विविध आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये भारतीय प्रतिनिधिमंडळाचे नेतृत्व केले होते.
इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात त्यांनी अर्थखाते व पुढे संरक्षण खाते ही दोन महत्त्वाची खाती सांभाळली. २४ ऑगस्ट १९८४ रोजी त्यांची उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली. पुढे काँग्रेसपुरस्कृत उमेदवार म्हणून ते राष्ट्रपती पदावर निवडून आले.
Leave a Reply