एक दगड वाटेवरचा,मला उचलले कुणी
आणले मंदिरी, जरासा आकार देवूनी ।।
हात जोडती… पाया पडती
अंगावर किती थर जडती
वेगळाच मी ठरतो, देव शब्दात अडकुनी ।
एक दगड वाटेवरचा,मला उचलले कुणी।।
किती खाऊ,किती फळेफुले
तोंड न मजला, देतच सुटले
कशासाठी कुणासाठी, मला पडे ना पचनी ।
एक दगड वाटेवरचा……मला उचलले कुणी।।
शाळेच्या भिंती आम्ही बांधू
धरणाच्या भिंतीतही आमचे बंधू
असे यावे क्षण म्हणतो.. सार्थ ठरावे जीवनी ।
एक दगड वाटेवरचा…मला उचलले कुणी ।।
कौशल.
— श्रीकांत पेटकर
Leave a Reply