नवीन लेखन...

एक हटके Send off Party

आज रात्री मला वर्षा खेरकडे Sendoff Party ला जायचंय. ती म्हणाली मैत्रिणींमधे कुणाला बोलवायचं ती योजना तूच कर बाई.

आता म्हटलं वातावरणासाठी निर्मिती हवीच. आनंदी शिवाय तर मज्जाच नाही. अपेक्षा ला नाही बाई बोलवणार. चिकटली की चिकटली. करुणा ही नकोच. सगळं spoiled करते. आशा आणि सुखदा माझ्या भारी लाडक्या हं. शांती ला नाही बोलवलं तरी ती गुपचूप सामिल होणार पार्टीत. आणि तृप्ती तर माझी पाठराखीण! आमच्या संपदाला बोलवायचा अवकाश की ऐश्वर्या आणि समृद्धी डुलत डुलत आल्या म्हणून समजा .

प्रतिभा कल्पना आणि भावना ला वेगळं आमंत्रण नको. तू तिथे मी.. असा तो त्रिवेणी संगम असतो माझ्या मागे. आकांक्षा असली नं बरोबर की माझ्यात बाई जान येते . कारण ती उर्जिता ला घेऊन येते. प्रतिमा… माझी जुळी बहीण हो… ती बरी राहील माझ्या शिवाय? अगबाई प्रेरणा राहिली की ! समोरच राहते माझ्या. ती नेहमी प्रगती आणि उत्कर्षा ला घेऊनच फिरत असते. अधेमधे किर्ती जॉईन होते त्यांना. मग काय यशवंती चा भाव वधारतो बरं ! कोणत्याही पार्टीत नेत्रा – सुनयना असल्या की सगळ्यांना सगळं मिळतंय की नाही? ह्यावर नजर ठेवून असतात म्हणजे त्या हव्याच.

आशा आणि कल्याणी शी माझं चांगलं सूत आहे. ओघानी त्या येणारच . अरे बापरे ! निशा आणि स्वप्नाली ला विसरुन कसं चालेल? सोबतिणी आहेत त्या माझ्या. विद्या शारदा आणि सरस्वती ला अशा पार्टीत बोलावूं की नको अजून ठरवलं नाही. पण लक्ष्मी मात्रं चुकवत नाही हो पार्टी बिर्टी..आता ती आहे म्हणून तर धनश्री आपल्या थाऱ्याला उभी राहते. असो.

निमित्त कोणतंही असो भाग्यश्री वाचून पूर्तता नाही कशाची ! येतेस नं सखे ? ए पूजा -आरती आज तुम्ही घर सांभाळा हो… अग येईल नं तो …त्याच्या स्वागताला नको कां कुणी ? चल ग संध्या लवकर वर्षा खेर कडच्या पार्टीचा मुहूर्त टळालला नको बाई .

सौ.अलका वढावकर
ठाणे
३१ डिसेंबर २०२४

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..