हिंदूंच्या देववैविध्यात भगवान श्रीकृष्ण हा मोठा लोकप्रिय देव ! हिंदूंचा धर्मग्रंथच ज्याने निर्माण केला असा हा अद्वितीय तत्ववेत्ता ! अत्यंत सात्विकतेने वागतानाच वेळ पडल्यास ” नरो वा कुंजरो वा ” म्हणणारा, स्थानिकांना कमी पडते म्हणून दही-दूध-लोणी बाहेर नेण्यास प्रतिबंध करणारा, १६ सहस्र नाडयांवर ( नारींवर नव्हे) हुकूमत असलेला योगीराज, नृत्य,सूर आणि स्वरराज्य यावर ज्याचे अधिपत्य होते असा सकलकला शिरोमणी आणि म्हणूनच आजही आपल्याला आपल्या घरातला वाटणारा हा भगवान श्रीकृष्ण !
चित्रकार,गीतकार,साहित्यिक,तत्वचिंतक,योगीपुरुष अशा अनेकांना हजारो वर्षे या श्रीकृष्णाने नवनिर्मितीसाठी उद्युक्त केले आहे.
सोबतच्या कृष्णचिन्हामध्ये दोन हातात धरलेली मुरली आणि त्याखाली ७ वेगवेगळ्या लांबीच्या साखळ्यांना ७ वेगवेगळ्या आकाराचे घुंगुर आहेत. अधिक लांबीच्या साखळीचा जाड घुंगुर खर्ज किंवा खालच्या “सा” साठी तर एकेक स्वर चढत थेट कृष्णापर्यंत पोचता येते. पण त्याआधी मुरलीच्या ६ छिद्रांतून षडरिपु बाहेर जायला हवेत.
माझ्या कल्पनेतून साकारलेले हे :कृष्णचिन्ह” पूर्णपणे पितळी आहे. येत्या कृष्णजन्माष्टमीच्या निमित्ताने सर्वांना सादर ….
–मकरंद करंदीकर
नमस्कार.
‘नरो वा कुंजरो वा’ हें वाक्य युधिष्ठिर म्हणालेला आहे. अर्थात्, सर्व कृष्णाच्या ‘रणनीती’चा भाग म्हणायला हवा.
– सोळा सहस्त्र नाडी ( ना नव्हे) ही संकल्पना चांगली आहे. परंतु, सोळा सहस्त्र नारी म्हटलें तरी कांहींही बिघडत नाहीं. कारण ( जरासंधाने) अपहरण करून आणलेल्या स्त्रियांचा कोणीच स्वीकार केला नसता, अगदी घरच्यांनीही. अंबेची कहणी प्रसिद्धच आहे, आणि तीही महाभारतकाळातलीच. ( कांहीं वाचकांना राजकपूर व नूतन अभिनीत ‘छलिया सिनेमा आठवत असेल, ज्याची बॅकग्राउंड १९४७ च्या पार्टिशनची आहे. तिथेंही नूतनला तिचा पती स्वीकारत नाहीं. अर्था्त्. सिनेमा असल्यानें सुखान्त होतो, ही गोष्ट वेगळी. पण खरोखरच पार्टिशनच्या वेळच्या अशा अनेक खर्या कहाण्या आहेत. ) . तेव्हां अशा स्त्रियांना कृष्णानें आश्रय तर दिलाच, पण डिग्निटीही दिली, हें खरें तर महत्वाचें.
– दूध-दह्यासंबंधीची आपली आइडियाही स्तुत्य. मात्र, गोकुळ-वंदावनातून मथुरेला दही-दूध रोज विकायला जात होतें, तो गोपांचा धंदाच होता. त्यामुळे excess production व त्याची विक्री, हें नित्याचेंच होतें. त्यामुळे, यात कृष्णाचा role काय, तें पहायला हवें. घरी लेकरांना व वासरांना पुरेसें न ठेवतां, तें दही-दूध विकलें जात होतें, असा विचार आपणांला मांडायचा असल्यास, ठीक आहे.
– कृष्णचिन्हाची कल्पना फारच स्तुत्य व कौतुकास्पद ! त्याची तारीफ करावी तेवढी थोडीच.
– सुभाष स. नाईक
सुभाषजी, आपल्या अभिप्रायाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद !