नवीन लेखन...

“एक नसलेली राष्ट्रीय एकात्मता”

दोन दिवस अबमदाबादेत जाऊन आलो. माझ्या मुलीला तिच्या नोकरीचं पहीलं पोस्टींग अमदाबादेत मिळालं, तिला सोडायला गेलो होतो..
तिला कंपनीतर्फे रुमशेअरींग पद्धतीने क्वार्टर मिळाली होती, ती ताब्यात घ्यायची होती.

जवळपास शंभरेक मुली आल्या होत्या देशभरातून..आणि सर्वांची हवी ती रुम मिळवण्यासाठी धडपड चालली होती..सर्वांची म्हणजे पालकांची, त्यातही आईपक्षाची जास्तच..सर्वच आया आपल्या मुलीला आपल्याच शहरातली रुम पार्टनर मिळवून देण्यासाठी धडपडत होत्या. अगदी शहरातली पार्टनर नाहीच मिळाली तर किमान आपल्याच राज्यातली रुम पार्टनर मिळावी यासाठी आयांचा आटापीटा चालला होता..पोरी मात्र मजेत होत्या, एकमेकांच्या ओळखी करून घेत होत्या, ओळखीच्या मुलींना मिठ्या मारत होत्या..मस्त रंगीबेरंगी चिमण्यांच्या चिवचिवाटाने माहौल जिवंत झाला होता..एक मिनी भारत तिथे एकटवला होता..

माझी ‘ही’ही त्या रेस मधे होतीच..मी तर सांगीतलं की तिला रॅंडमली जी पार्टनर येईल ती येऊ दे, उलट असं होणं जास्त चांगलं..आपल्याच शेजारची, आपलीच भाषा बोलणारी पार्टनर मिळाली तर फावल्या वेळात गप्पा मारता येतात हे जरी खरं असलं तरी या हाॅस्टेल लाईफ मधे तसं होणं अपेक्षित नाही..निरनिराळ्या राज्यातल्या मुली पार्टनर्स म्हणून येऊ दे..तेवढंच इतरत्र काय चाललंय याचं नकळत ज्ञान होईल, तिकडच्या प्रथा-परंपरा कळतील, भाषा शिकता येईल असे अनेक फायदे होतील.. भारतभरातील विविध राज्यात वरवर दिसणारी विविधता संस्कृतीच्या एकाच अदृष्य धाग्याने कशी जोडली गेलीय ह्याचं नकळत ज्ञान होऊन आपल्या देशाबद्दलचं कौतुक आणि अभिमान आपसुक अंगात भिनला जाईल..राष्ट्रीय एकात्मतेचे डोस वेगळ्याने पाजण्याची (ते ही एखाद्या बकवेषी पुढाऱ्याकडून) काहीच आवश्यकता राहाणार नाही..

एक मिनी भारत तिथे एकटवला होता असं जाणवणारा मी बहुतेक एकटाच असेन त्या गर्दीत. माझ्या व्याख्यानाने कंटाळलेल्या बायकोने शेवटी मला, “जा चहा पिवून या” म्हणून तिथून पिटाळून लावलं..आत उरलेल्या सर्वांमधे शेजार, शहर, राज्य आणि भाषा बघून ग्रुप करण्याची अहमिहीका लागली होती..काही बहाद्दरांनी त्यांच्या मुलीना त्यांच्या मते (म्हंजे पालकांच्या) हवी ती मुलगी रुम पार्टनर म्हणून मिळवलीच शेवटी..भारतात तरी वेगळं काय चाललंय..

-गणेश साळुंखे
9321811091
salunkesnitin@gmail.com

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..