नवीन लेखन...

एक परीस स्पर्श ( भाग – २५ )

आज विजयला निलिमा आणि त्याच्यात घडलेली ती घटना आठवत होती. विजय तिसरीत असताना निलिमा त्याच्याच वर्गात होती. त्यावेळी विजयचा थाट एखाद्या राजकुमारसारखा होता. पण त्यावेळी विजय शरीराने खूपच नाजूक पण काटक शरीर यष्टीचा होता. एक वेळ अशीही आली होती जेंव्हा विजय तोडकी मोडकी स्लीपर ती ही मागून झिजलेले घालून शाळेत जावे लागत होते. पण त्याने शाळेत पहिल्यादा पाऊल ठेवले होते तेंव्हा त्याच्या पायात नवेकोरे बूट होते. विजयला बुटाचे आकर्षण लहानपणापासून होते. विजय कमवायला लागल्यावर त्याने कधी स्लीपर फार घातली नाही.मग ती कितीही महागातली का असेना ? गोव्यावरून विजयने आणलेली स्लीपर त्याने कारखान्यात काम करताना वापरली.

विजयच्या पायाची रचनाच अशी आहे की त्याने कितीही महागातली बूट घेतली तरी ती जास्तीत जास्त सहा महिने टिकतात. त्याच्या बुटांना वरून काही होत नाही फक्त त्याचा तळवा मधून तुटतो. आणि हल्ली बूट दुरुस्त करण्यापेक्षा नवीन घ्यायला परवडतात. पूर्वी विजय चामड्याची बूट वापरत असे एका पावसाळ्यात ती भिजली आणि खराब झाली. त्यानंतर त्याने चामड्याची बूट वापरणे सोडले ते आजपर्यत आणि आता ती चामड्याची असतात म्हणून तो वापरत नाही.विजय फक्त बुटांवर खर्च करताना विचार करत नाही. दुकानदार नेहमी त्याला बूट देताना म्हणतो.वर्षभर तरी या बुटांना काही होणार नाही ! त्यावर विजय त्याला म्हणतो. कोणतेही बूट माझ्या पायात  सहा महिन्यापेक्षा जास्त टिकत  नाहीत. म्हणून एका दुकानदाराने एक इंचाचे जाड व मजबूत सोल असणारे बूट त्याला दिले. विजयचाही त्या बुटांवर जीव जडला होता पण ते बूट तीन महिन्यातच मधोमध पिंजकले.ते टाकायलाही विजयला जीवावर येत होते.आता विजय फार महागातली बूट घेत नाही पण त्याला आवडलेलीच घेतो.म्हणजे जी जीन्सवर शोभतील अशी.जीन्स आणि टी – शर्ट  हा विजयचा आवडता पोशाख पण मागे वजन वाढून पोट पुढे आल्यावर तो शर्ट वापरू लागला पण जीन्स तशीच होती. विजयला कपड्यांना इस्त्री करायला प्रचंड कंटाळा येतो म्हणून तो शक्यतो ज्या कपड्यांना इस्त्री करावी लागणार नाही असेच कपडे विकत घेतो. विजयने आजपर्यत विकत घेतलेली वस्तू परत केलेली नाही.

त्यावेळी  वर्गात येताना विजय एकदम नटून येत असे.  म्हणजे अगदी तशी  जशी आजची लहान मुले जातात. एक दिवस मधल्या सुट्टीत वर्गातील सर्व मुले डबा खात होते. विजयही एकटाच त्याचा डबा खात होता. विजय त्या शाळेत नवीन होता त्यामुळे त्या वर्गात त्याचा एकही मित्र नव्हता. पण निलिमा त्या शाळेत पूर्वीपासून होती आणि वर्गाची वर्गप्रमुख होती. त्यामुळे वर्गातील इतर मुलं तिला घाबरून असत  आणि तिच्यासोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याच्या प्रयत्नात असत म्हणजे ती जे करील त्याचे समर्थन करत. विजय त्याचा त्याचा डबा खात होता. निलिमा आणि तिच्या मित्रांचा डबा खाऊन झाल्यावर त्यांना बाहेर जाऊन पाणी प्यायचे होते पण त्यांची नजर विजयच्या पाण्याच्या बाटलीकडे गेली. निलिमाने पुढे जाऊन विजयची पाण्याची बाटली उचलली आणि त्यातील पाणी पिऊन ती रिकामी केली. आणि ती विजयच्या हातात दिली. विजय वरवर खूप शांत वाटतो पण मुळात तो खूपच रागीट म्हणजे भयंकर रागीट आहे. त्याला अन्याय सहन होत नाही.तरीही तो सध्या काही लोकांकडून त्याच्यावर होणारा अन्याय त्यांच्यावरील प्रेमापोटी सहन करत होता. पण आता त्याच्या सहनशीलतेचा बांध फुटण्याची वेळ जवळ आलेली दिसतेय. विजयचा राग ज्याला माहीत आहे तो त्याच्या सावलीलाही उभा राहात नाही. निलिमाच्या जागी मुलगा असता तर तो कदाचित भिडला असता.

विजयला इतका प्रचंड राग आला होता की तो रडत एकटाच घरी पोहचला.त्याला अचानक घरी आलेलं पाहून त्याच्या आईला आश्चर्य वाटले आणि तिने कारण विचारल्यावर त्याने निलिमाचे नाव सांगितले.आई ! त्याला सरळ तशीच शाळेत घेऊन गेली आणि बाईंकडे निलिमाची तक्रार केली. बाईंनी ती वर्गाची वर्गप्रमुख असूनही तिला फैलावर घेतले आणि विचारले तू विजयची पाण्याची बाटली घेऊन त्यातील पाणी प्यायलीस ? त्यावर निलिमा हो ! म्हणताच बाईंनी तिच्या हातावर चार – पाच फटके मारले. ते फटके मारताच ती रडायला लागली.निलिमा तेंव्हा एखाद्या बाहुलीपेक्षा दिसायला कमी नव्हती. गोरीपान, गुबगुबीत गाल, लालबुंद ओठ, गुबगुबीत गाळ आणि बोलक्या डोळ्याची होती. ती रडल्यावर तिच्या डोळ्यातील अश्रू तिच्या गालावरून हळू हळू वाहत तिच्या पायावर टपटप गळत होते कारण तिच्या आयुष्यात तिने खाल्लेला पहिला आणि शेवटचा मार होता तो तिने शिक्षा म्हणून खाल्ला होता. तिला सतत रडताना पाहून विजयही हळहळला.विजय त्याच्या पत्रिकेतील मंगळ आणि हर्षल मुळे प्रचंड संतापी होता. आणि चंद्रामुळे प्रचंड हळवा होता. आजही ! भावुक करणारे मग ते काहीही असो पाहताना वाचताना त्याचे डोळे पाणावतात.

आपल्यामुळे निलिमा दुःखी झाली ही बोच विजयच्या इतक्या जिव्हारी लागली की शाळेत असे पर्यत शाळेतील कोणत्याच मुलीला कधी त्याने जवळ केले नाही. शाळेतील सर्व मुली त्याच्याशी बोलण्याच्या प्रयत्नात असत पण तेंव्हा आपल्या शिकून मोठं व्हायचंय एवढंच त्याच्या डोळ्यासमोर होतं.  पण कदाचित ते नियतीला मान्य नव्हतं. विजयला शिकून काही मोठं होता आलं नाही पण आपल्यातील कलागुणांनी तो मोठा झाला. पण फक्त मोठा झाला. मनाने पण ! लक्ष्मी काही त्याच्यावर प्रसन्न झाली नाही.

— निलेश बामणे.

Avatar
About निलेश बामणे 419 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..