नवीन लेखन...

एक परीस स्पर्श ( भाग – २७ )

विजयच्या वाचण्यात एक सर्वेक्षण आले हल्ली जास्त पैसे कमावणारे जास्त आंनदी असतात.आणि विजयला त्याच्या दुःखी असण्याचे कारण उमगले.चांगुलपणा म्हणून विजय केलेल्या कामाच्या पैशाचा फार विचार करत नसे.त्यामुळेच तो आयुष्यात आर्थिक दृष्ट्या यशस्वी होऊ शकला नाही. त्याने केलेल्या प्रत्येक कामाचा जर त्याने योग्य मोबदला घेतला असता तर आज तो आनंदी असता. आज त्याला स्वतःच्या सर्व आर्थिक गरजा भागवताना नाके नऊ आले नसते.

विजयने नेहमीच पैशापेक्षा माणुसकीला महत्व दिले.चांगुलपणाने वागला पण सर्वांनी त्याच्या चांगुलपणाचा फायदा उचलला आणि त्याच्या चांगुलपणाला ते त्याचा मूर्खपणा समजू लागले.विजय इतका हुशार होता की त्याला हे सगळे कळत असताही त्याकडे दुर्लक्ष केले कारण त्याला माहित आहे जो जो त्याला फसवतो तो तो कोठे ना कोठे फसतोच. कारण  विजयवर परमात्म्याची विशेष कृपा आहे. विजयच्या जन्म पत्रिकेत द्वितीयेश त्याच्या उच्च राशीत आहे आणि उच्चीच्या गुरुची त्या द्वितीयेशावर दृष्टी आहे. विजयला जो जितक्याला फसवतो त्याच्या कित्येक पट अधिक त्याचे नुकसान होते हा विजयचा अनुभव आहे.पण ते त्या लोकांना कधीच लक्षात येत नाही. विजयसमोर जेंव्हा फक्त चांगुलपणाचा मुखवटा पांघरून घेतलेले लोक येतात तेंव्हा त्यांना तो चटकन ओळखतो. पण ते त्यांना तो कधीच कळू देत नाही. विजय सर्वांशी सारखाच वागतो म्हणून लोकांचे त्याच्यावाचून एक वेळ आडते पण त्याचे आडत नाही कारण त्याची काळजी स्वतः परमात्मा वाहतो याची त्याला खात्री आहे. तरीही तो त्याचे कर्म करत राहतो. जगाला प्रश्न पडतो विजय इतका शांत  निश्चिंत कसा आहे ? त्याचे कारण आहे विजयला हे ज्ञात आहे या विश्वातील कोणतीच घटना विनाकारण घडत नाही. प्रत्येक घटना आपल्या ठरलेल्या वेळीच घडत असते.मनुष्यप्राणी इतका मूर्ख आहे की त्याला सतत वाटत असते की त्याच्या आयुष्यात जे काही घडत आहे ते तो घडवून आणत आहे.एखादी घटना घडण्यापूर्वी ती घडविण्याची जी प्रेरणा मनुष्याला होते ती ईश्वर निर्मित असते. म्हणूनच विजय दुसऱ्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करत नाही अगदी त्याच्या कुटुंबातील भावा – बहिणीच्या आयुष्यातही.पण त्या बदल्यात तो ही कोणाला त्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करून देत नाही.अनामिकेबद्दल काही संकेत मिळाले म्हणून तो तिच्या प्रेमात पडला.पण प्रत्यक्षात तो प्रेम वगैरेच्या आहारी जात नाही कारण त्याला पक्के माहीत आहे. कोणी कितीही प्रयत्न केला तरी त्यांच्या आयुष्यात तीच माणसे येतात जी नियतीने ठरवलेली असतात म्हणून विजयच्या आयुष्यात अनेक स्त्रिया येऊनही त्यातील एकीचीही त्याला माझ्याशी लग्न करशील का म्हणून विचारण्याची हिंमत झाली नाही.कारण नियतीने त्याच्या आयुष्यात कोणी यावं हे अगोदरच ठरवून ठेवलेले आहे..त्यामुळेच कित्येकांना विजय पाषाण हृदयाचा वाटतो.तो आहे ही तसाच.पण विजय  नक्की कसा आहे हे अजूनही कोणाला उलगडले नाही आणि उलगडणारही नाही कारण विजयचे आयुष्य म्हणजेच एक रहस्य आहे.

काळ विजयच्या घरी त्याच्या ओळखीची एक बाई आणि तिची विवाहित मुलगी आली होती. कारण त्यांना विजयच्याच इमारतीत भाड्याने घर घ्यायचं होतं.पाय दुखत असल्यामुळे  विजय घरातच होता आणि त्याची आई होती. आईने त्यांना चहा वगैरे दिला. आणि तीन बायका एकत्र आला की त्यांच संभाषण मूळ विषयावरून भरकटुन भलतीकडेच जातं. लग्न या विषयावर सरळ सरळ विजयशी काही बोलणं म्हणजे वाघाच्या जबड्यात स्वतःहून हात घळण्यासारखं होतं. म्हणून त्या मुलीची आई आडून आडून विजय आईला म्हणाली,” घरातील सर्व कामे तुम्हालाच करावी लागत असती नाही.सून असती तर मदत झाली असती.त्यावर त्याची आई म्हणाली,” माझ्या मदतीचं काही नाही.त्यांच्या त्यांच्यासाठी आणली तरी बस.खरं तर कोणीही लग्न या विषयाला हात घातला की विजयची हटते. कारण विजयची या बाबतीत मते. कोणा सामान्य माणसांच्या डोक्यात घुसने अशक्य.आणि निर्बुद्धी लोकांना ती पटवून देण्यात आपला वेळ वाया घालविणे विजयला पटत नाही.भारतीय समाजाची मानसिकता आजही तीच आहे की लग्न कर नाहीतर सन्यास घे.म्हणून देशात घटस्फोटाच प्रमाण वाढलेले आहे.ते ट्रॅफिकमुळे, शिक्षणामुळे अथवा समृद्धीमुळे वाढलेले नाही. आपल्या देशात लग्न होत नाही तर ती लादली जातात.लग्न झाली की पोरं झालीच पाहिजेत.दोन तीन वर्षे नाही झाली.की समाजाकडून त्यांची कारणमीमांसा सुरू होते.त्याला वैतागुणही काही लोक घटस्फोट घेतात. मग ! मुलं व्हावी म्हणून प्रयोग सुरू होतात.मग ही अशी प्रयोगाने झालेली मुळेच नंतर म्हातारपणी त्यांना वृद्धाश्रमाची वाट दाखवतात.प्रत्येकाच्या आयुष्याचा हा शेवट हा असाच होणार असेल मग.  एक मूल असो वा ! दहा.मग ! ती मुलं असली काय आणि नसली काय ? काय फरक पडतो ?? आणि जर एखाद्याला मुलंच नको हवी असतील तर अशाने लग्न केलं काय आणि नाय केलं काय ? काय फरक पडतो.आपल्या देशात.लग्न न झालेल्या व्यक्तीला तुझी तब्बेत कशी आहे ? हा प्रश्न विचारला जात नाही तर लग्न कधी करतोस ? हा प्रश्न विचारला जातो. आपक्या देशात लग्न ही व्यक्तिगत गोष्ट नाही तर सामाजिक गोष्ट आहे म्हणून घटस्फोट वाढत आहेत.विजयच्या आयुष्याचा सारासार विचार करता त्याचं लग्न टिकेल की नाही ह्याबद्दल विजयला तर  शंका होतीच पण विजयची जन्मपत्रिका ती ही तसेच दर्शवित होती.ही आणखी एक वेगळी समस्या होती.विजयला म्हणजे त्याच्या विजयच्या विचारांना पेलेल अशी मुलगी विजयच्या आयुष्यात कधीच आली नाही.अनामिकेतही ती क्षमता नाही.आणि अनामिकेच्या जन्मपत्रिकेतही अनेक अशुभ योग आहेत.एकूणच विजयच्या जन्मपत्रिकेत सर्वसामान्य माणसासारखे सुखी संसार करण्याचे योग नाहीत म्हणून तर त्याच्या आयुष्यात एकजात सर्व स्वार्थी माणसे आली आणि त्याची आर्थिक प्रगती होऊ शकली नाही. जगाच्या दृष्टीला सोप्प्या दिसणाऱ्या गोष्टी खरं तर खूप अवघड आहेत. विजय या गोष्टी जगाला समजावू शकत नाही. विजयला त्याच्या आईवडिलांच्या मनाची होणारी घालमेल कळते कारण समाजाला समज देण्याची क्षमता त्यांच्यात नाही. ती सामान्य माणसे आहेत. पण त्यांच्यासमोर जर विजयने मान तुकवली तर किती मोठ्या समस्येचा सामना करावा लागेल याची  त्यांना कल्पनाही नाही. म्हणूनच विजयला एकाकी जीवन जगावे लागत आहे आणि महत्वाचे म्हणजे तो त्यात आनंदी आहे.विजयला त्याच्या आयुष्यातील निर्णय कोणा दुसऱ्यावर अवलंबून असणे पटत नाही. विजयचा विवाह संस्थेला विरोध नाही. सामान्य माणसांच्या आयुष्यात सर्व गोष्टी सहज घडून येतात. पण असामान्य माणसांच्या आयुष्यात ते तसे होताना दिसत नाही.असामान्य माणूस आणि त्याचा सुखी संसार हे चित्र फारच क्वचित पाहायला मिळते.

— निलेश बामणे.

Avatar
About निलेश बामणे 419 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..