खूप विचार केल्यानंतर विजयने पुन्हां पत्रकारितेत आणि साहित्य क्षेत्रात नशिब आजमावण्याचा निर्णय घेतला. विजयने पूर्वी एका साप्ताहिक वृत्तपत्रात पत्रकारिता केली होती. बातमी मिळविण्यापासून बातमी कशी लिहायची हे ही तो तेथे शिकला होता. पण पत्रकारितेत तो फार रमला नव्हता कारण तेंव्हा पत्रकारिता हे काही त्याचे उत्पन्नाचे साधन होऊ शकले नाही. त्याला प्रसिद्धी बऱ्यापैकी मिळाली आणि मोठमोठ्या लोकांशी ओळखीही झाल्या, पण त्या ओळखीचा स्वतःच्या स्वार्थासाठी उपयोग करून घेण्याचा विजयचा स्वभाव नव्हता. आज आमदार – खासदार असणाऱ्या बऱ्याच नेत्यांना तो प्रत्यक्ष भेटला होता. पण त्याला पत्रकार म्हणून फार ओळख मिळाली नाही कारण लोक कवी म्हणूनच त्याला जास्त ओळखू लागले. त्याच्यातील कवीने त्याच्यातील पत्रकार दाबला. त्याचे दोन कविता संग्रह बऱ्यापैकी गाजल्यामुळे ते झाले.त्याच्यातील कवी त्याच्यातील कथा लेखकावरही वरचढ ठरला. त्याच्या ओळखीचे बहुसंख्य लोकं त्याला कवी म्हणूनच ओळखतात. विजय आता एका कवीची व्यथा भोगत होता. विजयचे वडील. हा माणूस जितका विजयच्या डोक्याला ताप ठरत होता तितका दुसरा कोणीही ठरला नाही. पराकोटीचा व्यसनी असणारा हा माणूस आता पराकोटीचा अध्यात्मिक झालेला होता. त्यामुळे भौतिक दिण्यापूरत मर्यात होतं. आणि विजयच्या वयाच्या कोणी घर घेतलं, गाडी घेतली, की त्याची विजयसमोर कॅसेट वाजवणं इतकंच काय ते काम या माणसाला होते. या माणसाच्या मनात मुळात शिक्षणाला फार महत्वाचं स्थान नव्हतं. लिहायला वाचायला यावं इतकं ज्ञान त्यांना पुरेसा वाटत होतं. म्हणूनच जगाशी या माणसाचा जो काही संबंध होता तो फक्त उदरनिर्वाहापुरता होता. आता काम करणं आणि हरी हरी करणं इतकंच काही ते त्यांना काम होतं.
विजय दहावी होताच या माणसाने त्याला एका कारखान्यात कामाला लावले. तेथे तीस रुपये रोज होता त्याला. त्याच्या बापानेच त्याच्या भविष्याची राख रांगोळी केली होती. विजयची अचाट बुद्धिमत्ता त्याला कधीच कळली नाही? विजयचा बाप म्हणजे बाप कसा नसावा याच जिवंत उदाहरण आहे. मुलाला योग्यवेळी योग्य शिक्षण द्यायचं नाही. त्याच्या भविष्याची काही तरतूद करायची नाही आणि मग जगाच्या पोरांकडे पाहून त्यांच्याशी त्याची तुलना करून त्याचा पाणउतारा करायचा. पण त्याला हे दिसत नाही लोकांनी प्रसंगी कर्ज काढुन आपल्या मुलांना शिकविले म्हणून त्या शिक्षणाच्या जोरावर त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळाल्या आणि त्यांचं आयुष्य सुरळीत झालं. योग्य वेळेत त्यांचं लग्न झालं त्यांना घर-गाड्या घेता आल्या. विजयला इतके वर्षे काम करून स्वतःसाठी साधा एक महागातला मोबाईलही घेता आला नाही. जगाच्या नजरेत महान असणारा विजय त्याच्या आई – बापाच्या नजरेत नालायक, कुचकामी ठरला होता. का? तर तो भरपूर पैसे कमावत नव्हता, फक्त गरजेपुरते पैसे कमावत होता, त्याच्याकडे बँक बॅलन्स नव्हता. या जगात विजयला सगळ्यात जास्त कोणी बदनाम केलं असेल तर ते त्याच्या बापाने. विजयला त्याच्या आयुष्यात सारेच एकजात स्वार्थी लोक भेटले आणि अजूनही भेटत आहेत. प्रत्येकाने आपल्या कामासाठी त्याचा उपयोग करून घेतला पण त्यातील एकही कधी त्याच्या कामी येऊ शकला नाही. विजयला कदाचित तसा शापच असावा की तो जगाच्या कामी येईल पण जग त्याच्या कामी येऊ शकणार नाही.
आता विजयने स्वतःचा उद्योग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे खरा पण आता त्यात त्याला किती यश मिळते हे नियतीच ठरवेल. ज्या कंपनीसाठी विजयने आपल्या आयुष्यातील वीस वर्षे घालवली त्या कंपनीचा त्याला काडीचाही उपयोग झाला नाही त्या कंपनीच्या मालकाने गोड बालून बोलून त्याच्याकडून त्याला हवे हवे ते काम काढून घेतले पण कधीही त्याला कधी एक रुपयाही जास्तीचा दिला नाही. विजयाच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवत राहिला. पण जेव्हा विजयचा पाय दुखावला आणि तो महिनाभर घरी बसला तेंव्हा त्याने त्याच्या आयुष्याचा नव्याने विचार केला आणि त्याच्या लक्षात आले त्याने त्याचे निम्मे आयुष्य फक्त आणि फक्त स्वार्थी लोकांना मदत करण्यात वाया घालविले प्रत्येक क्षेत्रात त्याला स्वार्थी लोकच भेटले फक्त त्याचे मोजकेच मित्र सॊडले तर. विजयने दिलेली प्रसिद्धी सर्वाना हवी होती पण कोणाच्याही हातून एक रुपयाही सुटत नव्हता. विजयला थोडा मान दिला कि त्याच्याकडून कोणतेही काम फुकटात करून घेता येते हा सर्वांचा समाज. त्यात विजय निर्व्यसनी, ना त्याला बायका ना पोरं, मग कशाला लागतात त्याला पैसे? असाही विचार करणारे महाभाग आहेत विजयाच्या आयुष्यात. विजय नेहमीच इतरांचा विचार करून आयुष्य जगत आला आणि त्याचाच परिणाम म्हणजे तो आज एकटा पडलेला आहे. आयुष्यात दोन डझन मुली येऊनही तो एकटा राहिला. कधी कधी विजयला वाटत. आपल्या भविष्यात फक्त एकटेपणा आणि जगासाठी झिजणंच लिहिलेलं आहे वाटतं! विजयला हे असं आयुष्य जगावं लागेल असा विचार विजयने स्वप्नातही केला नव्हता.
विजयच्या आई – बापाला जे दुःख आहे तेच दुःख विजयलाही आहे. आज विजय जे जीवन जगत आहे ते त्याला कधीच अपेक्षित नव्हते पण नियतीने ते त्याच्यावर लादले होते. विजयच लहानपणापासून खूप मेहनत करून श्रीमंत होण्याचं स्वप्न होतं. त्याच्या जीवावर खूप लोक श्रीमंत झाले पण त्याला काही श्रीमंत होता आले नाही. तो सतत देणाऱ्याच्या भूमिकेत राहिला घेणाऱ्याच्या भूमिकेत त्याला शिरताच येत नाही. तो दानशूर आहे हे त्याच्या चेहऱ्यावरचं लिहिलेले आहे कारण शंभर माणसातही भिक्षा मागणारा बरोबर त्याच्या समोर येऊन उभा राहतो नेहमीच! त्याला आशीर्वाद खूप मिळतात म्हणूंन अजूनतरी त्याच्यावर कोणासमोर हात पसरण्याची वेळ आली नाही आणि ती भविष्यातही येईल असे वाटत नाही कारण त्याच्या मदतीला एक अज्ञात शक्ती नेहमीच उभी राहत आली आणि आजही राहते. विजय जेथे पाय ठेवतो तेथे लक्ष्मी प्रकट होते आणि जेथून पाय काढतो तेथून लक्ष्मी नाहीशी होते. विजय सहज बोललेल्या गोष्टीही खऱ्या होतात. विजयचं आयुष्य त्याच्या विचारांनी आणि त्याच्या सोबत असणाऱ्या अज्ञात शक्तीने फारच गुंतागुंतीचे करून ठेवलेले आहे. विजयच्या जन्मापासून आतापर्यत विजयाच्या आयुष्यात सामान्य घटना घडतच नाही त्याच्या आयुष्यात सहज असं काहीच घडत नाही. त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या छोट्यात छोट्या गोष्टीलाही काहीतरी अर्थ असतोच . निरर्थक असं त्याच्या आयुष्यात कधीच काहीच घडत नाही. आता विजयाचा पाय दुखावला त्यातूनही त्याने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. आता हे असे का घडले याचे उत्तर विजयला काही दिवसातच नक्की मिळेल.
यावर्षी विजयचा पाय दुखत असल्यामुळे विजयचा कोकणात होळीला गावी जाण्याचा अजिबात मूड नव्हता कारण कोणीही लंगडताना पहिले तर हजार प्रश्न विचारणार हे नक्की! कशामुळे दुखतोय? या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर अजून विजयलाही मिळत नव्हते. युरिक ऍसिड वाढल्यामुळे गाऊट झाला आहे त्यामुळे पायाच्या सांध्यात सूज आली आहे असे प्रथमदर्शनी दिसत असले तरी पाय बरा व्हायला इतका वेळ का लागतोय ते मात्र कळत नाही. पाय प्रचंड दुखत असल्यामुळे विजयची नियोजित सर्व कामे रखडली आणि भेटीगाठीही होऊ शकल्या नाही. विजयला घरातील अचानक सर्वजण गावी जायला निघाल्यामुळे नाईलाजाने विजयही निघाला कारण तो एकटा घरी राहायला तर त्याला स्वतः जेवण करावे लागेल, भांडी घासावी लागतील, कपडे धुवावे लागतील आणि बाजारातून भाजीही आणावी लागेल! हे सारं पूर्वी विजय आनंदाने मजा घेत करायचा पण सध्याच्या पायाच्या दुखण्यामुळे ती मजा सजाच झाली असती. नाईलाजाने का होईना विजयने कोकणाचा रस्ता धरला. मुंबईतून कोकणात जाणारे शक्यतो रात्रीचा प्रवास करतात. विजयही त्याच्या कुटुंबातील इतर व्यक्तींसह खाजगी गाडीने कोकणाकडे निघाला. विजयला कोकणाच्या दिशेने प्रवास करताना हमखास उलट्या होतात. मग ते प्रवासाचे वाहन कोणते का असेना! यावेळी विजय एका खाजगी वाहनाने प्रवास करत होता ते वाहन म्हणजे टाटा सफारीची चारचाकी होती. गाडी उत्तम आणि आरामदायी होती.
— निलेश बामणे.
Leave a Reply