तो गोरक्षनाथांना भेटला असता ते त्याला राज्याचा त्याग करून सन्यास घ्यायाला सांगतात! पण राजा म्हणतो मी तसं करू शकत नाही कारण माझ्या राणीचे माझ्यावर खूप प्रेम आहे. ते ऐकून गोरक्षनाथ त्याला एक फळ देतात आणि सांगतात हे फळ खाल्ल्यावर तू अमर होशील! राजा ते फळ घेऊन राजवाड्यात जातो आणि विचार करतो, जर हे फळ मी खाल्ले तर मी अमर होईन पण माझी राणी म्हातारी होऊन मेल्यावर मी जागून काय करू? त्यामुळे राजा ते फळ राणीला देतो आणि राणीला सांगतो हे फळ जर तू खाल्लेस तर तू अमर होशील! राजाचे राणीवर कितीही प्रेम असले तरी राणीचे मात्र वाड्यात काम करणाऱ्या एका नोकरावर प्रेम असते. राणी विचार करते मी हे फळ खालले तर मी अमर होईन पण तो नोकर म्हातारा होऊन मरेल मग! मी जगून काय करू? म्हणून राणी ते फळ त्या नोकराला देते आणि सांगते हे फळ तू खा! म्हणजे तू अमर होशील. राणीचे त्या नोकरावर कितीही प्रेम असले तरी त्या नोकराचे वाड्यातील भांडी घासणारीवर प्रेम असते. तो विचार करतो मी हे फळ खाल्ले तर मी अमर होईन पण ती भांडी घासणारी म्हातारी होऊन मरेल मग! मी जगून काय करू? तो नोकर ते फळ त्या भांडी घासणारीला देतो. त्या भांडी घासणारीवर त्या नोकराचे कितीही प्रेम असले तरी तिचे कोणावरच प्रेम नसते. त्यामुळे ती विचार करते हे फळ खाऊन मी अमर होऊन काय करू? मी अमर झाले तरी आयुष्यभर मला भांडीच घासावी लागतील. त्यापेक्षा हे फळ मी राजाला देते. राजा अमर झाला तर प्रजेचा फायदाच होईल.म्हणून ती ते फळ घेऊन राजाकडे जाते आणि राजाला म्हणते, महाराज हे फळ तुम्ही खा! म्हणजे तुम्ही अमर व्हाल! राजा ते फळ हातात घेतल्या बरोबर ओळखतो कि हे तर तेच फळ आहे जे मी राणीला दिले होते? राजा तिला विचारतो हे फळ तुला कोणी दिले तर ती म्हणते, नोकराने! मग राजा त्या नोकराला बोलावून घेतो आणि विचारतो, तुला हे फळ कोणी दिले? त्यावर नोकर काही बोल्त नाही! तो काही बोलला नाही तर राजा त्याला ठार मारेल म्हणून राणी स्वतःच सांगते कि हे फळ त्याला मी दिले. ते ऐकल्यावर राजा प्रचंड संतापतो आणि तिला विचारतो ते फळ तू त्याला का दिलेस तर राणी म्हणते माझं त्याच्यावर माझं त्याच्यावर या वाड्यात लग्न करून आल्यापासून प्रेम आहे. ते ऐकून राजा मनात विचार करतो ज्या राणीवर मी एवढे जीवापाड प्रेम करतो. आणि मला वाटत होते तसे राणीचे माझ्यावर प्रेमच नाही. तिचे प्रेम माझ्या नोकरावर आहे. खूप विचार केल्यावर राजा राज्याचा त्याग करून शेवटी सन्यास घेण्याचा निर्णय घेतो.ही कथा ऐकल्यावर विजय झोपेतून खाड्कन जागा झाला आणि त्याच्या मनात विचार आला माझी परिस्थिती त्या राजासारखी तर नाही ना? म्हणजे मी अनामिकावर इतकं प्रचंड प्रेम करत आलो, आजही करतो आहे, पण ती तसं प्रचंड प्रेम दुसऱ्या कोणावर तर करत नसेल ना? आता मात्र विजय अस्वस्थ झाला. त्या राजासारखी आपल्यावर तर सन्यास घेण्याची वेळ येणार नाही ना? आपल्या जन्म पत्रिकेत दोन विवाहाचे योग आहेत पण प्रत्यक्षात एका लग्नाचेही वांदे झालेले आहेत. मागे आपण जी शांती केली तिलाही आता सात आठ महिने होत आले तिचाही काही परिणाम होताना अजून तरी दिसला नाही.ती शांती करून काही होणार नाही याची विजयला खात्री होती पण त्याला त्याच्या आई – वडिलांची आणि भावा-बहिणीची मानसिक शांती करायची होती. सर्वाना वाटत होतं कि माझं लग्न ग्रह ताऱ्यांनी अडकवून ठेवलं आहे. त्यांची शांती केली कि विजयच लग्न होईल. पण तसं काहीही होणार नाही हे विजयला पक्के माहित होते कारण भविष्य कोणालाही बदलता येत नाही. विजयने आता आपले भविष्य स्वीकारले होते म्हणूनच तो शांत झाला होता. त्याला त्याच्या भविष्याची चिंता आता सतावत नव्हती. अनामिक त्याची होणार याची त्याला खात्री होती कारण अनामिकाचा जन्मच त्यासाठी झाला होता. पण दुसरी कोण असेल का? याबाबतीत मात्र तो साशंक होता कारण तो आता अनामिका शिवाय दुसऱ्या कोणाचा विचारच करू शकत नव्हता. ती दुसरी कोणी त्याच्या आयुष्यात आली तरी अनामिकेवरचे त्याचे प्रेम कमी होणार नाही याची त्याला खात्री वाटत होती. विजय प्रेमात वाहवत जाणारा असा कधी नव्हता पण त्याच भविष्य त्याला जे दिसत होत ते तो बदलूही शकत नव्हता. त्यामुळेच अनामिकाच प्रेम मिळावं म्हणून! आथवा ते व्यक्त करण्यासाठीचा अट्टहास तो करत नव्हता. तिकडे अनामिकाही शांत होती. तिच्याही आयुष्यात येणाऱ्या वादळांना ती फार मनावर घेत नव्हती. पण का? या प्रश्नाचे उत्तर विजयला सापडत नव्हते कारण अनामिक हे ही एक गूढ रहस्यच होते. तिच्या आयुष्याचा आलेख विजयने अभ्यासला होता. तो अनाकलनीय होता. म्हणजे तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना का घडत आहेत हे तिला आणि तिच्या आजूबाजूच्यांना कळत नव्हते. पण विजयला कळत होत कारण विजयने तिची जन्म पत्रिका अभ्यासली होती. ती जरी विजयच्या आयुष्यात आली तर त्यांचे आयुष्य सामान्य असणार नाही हे विजयला खात्रीने माहित होते. तरीही भविष्य बदलता येत नाही म्हणून विजय तिच्या प्रेमात पडून राहिला आहे. कित्येकदा विजयच्या मनात विचार आला तिचा नाद सोडून दुसरी एखादी पकडावी! पण आता विजयची पूर्वीची अस्त्रे चालेनाशी झाली आहेत. नाही म्हणायला आजही स्त्रिया त्याच्या प्रेमात पडतात त्याच्याकडे आकर्षित होतात पण त्यांची प्रेमाची गाडी काही नियती पुढे सरकू देत नाही. अनामिकाची पत्रिका पाहता विजयने तिच्याशी लग्न न करण्याचा विचार करायला हवा होता पण! ती त्याच्या आयुष्यात आल्यावर यश त्याच्या पायावर लोटांगण घालणार आहे. त्याच्या यशाच्या घोड्याला आवर घातला आहे तो अनामिकेनेच कारण जो पर्यत त्याच लग्न होत नाही तोपर्यत त्याचा भाग्योदय होऊच शकत नाही. विजयाच्या कुंडली प्रमाणे त्याची भावी पत्नी कशी असावी? या परिमाणात आता फक्त अनामिका फिट बसते. विजयने जर अनामिकासमोर आपले प्रेम व्यक्त केले तर ते योग्य होणार नाही हे विजयला पक्के माहित होते. अनामिका तिचे प्रेम व्यक्त करणार नाही हे ही विजयला माहित होते. त्यांचा विवाह झाला तर तो नियतीच घडवून आणू शकते. त्यामुळेच जेव्हा जेव्हा विजय तिच्यासमोर व्यक्त होण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा कोणीतरी आडवं येत आणि नियतीने त्याच्या अगदी जवळ असणाऱ्या अनामिकेला त्याच्यापासून शेकडो किलोमीटर लांब नेऊन ठेवले. आता त्यांच्यात कोणताही संवाद होत नाही. ते दोघेही आपल्या आयुष्यातील समस्या सोडविण्यात आणि शारीरिक व्याधी सांभाळण्यात त्यांचा वेळ जात होता. ते त्यातही खूप आनंदी होते पण जग मात्र त्यांच्यासाठी विनाकारण दुःखी होत होते. विजयला खरं तर आता आयुष्याकडून काहीही अपेक्षा उरलेल्या नव्हत्या कारण त्याने ज्यांच्यासाठी आपले आयुष्य खर्ची घातले ते सारेच एकजात स्वार्थी निघाले होते. अनामिकाही तशी स्वार्थीच होती. पण ती नियतीच्या बंधनात बांधली गेली आहे.
विजय कोकणातील त्याच्या गावी जाऊन माघारी आला तरी त्याचा पाय काही दुखायला थांबला नव्हता. विजयला आता त्याच्या पायाची खूपच चिंता वाटू लागली होती. कारण अजूनही त्याला पाय खेचत चालावे लागत होते आणि पायऱ्या चढता उतरताना प्रचंड त्रास होत होता. त्याने इंटरनेटवर त्याच्या गुरूंचे त्याचे या महिन्याचे राशी भविष्य पाहिल्यावर त्याच्या लक्षात आले की येणारा काळ जरी त्याच्यासाठी संघर्षाचा असला तरी यश घेऊन येणारा आहे. त्यामुळे विजय थोडा आनंदातच होता. त्यात तो जो नवीन उद्योग सुरू करण्याच्या विचार करत होता म्हणजे! त्याची छोट्या तत्वावर त्याने सुरुवातही केली होती.
— निलेश बामणे.
Leave a Reply