नवीन लेखन...

एक परीस स्पर्श ( भाग – ४१ )

विजय आज त्याच्या कार्यालयात बसून संगणकावर काम करत होता… इतक्यात त्याचे एक मित्र बऱ्याच महिन्यांनी त्याला भेटायला आले… ते मित्रही साहित्यिक असल्यामुळे विजय आणि त्यांच्या चर्चा रंगणारच होत्या. विजयने बोलायला सुरुवात केली तोच ते म्हणाले,” माझी बायको वारली एक महिन्यापूर्वी ! ते ऐकून विजयला धक्काच बसला ! त्या मित्राचे वय असेल साधरणतः ५० वर्षे, म्हणजे त्यांची पत्नी असेल पंचेचाळीसची वगैरे, त्यामुळे त्या इतक्या कमी वयात वारल्याचे ऐकून विजयला धक्काच बसला ! विजय काही त्यांना कधी प्रत्यक्षात भेटला नव्हता त्यामुळे त्यांच्या एकूणच तब्बेतीबद्दल विजयला काही माहिती नव्हती. पण ! यापूर्वी विजयाच्या त्या मित्राच्या बोलण्यात कधी त्यांच्या तब्बेतीचा विषय निघाला नव्हता म्हणजे त्या फार पूर्वी पासून आजारी वगैरे असण्याची शक्यता कमीच होती.. त्यामुळे विजयने थोडं गंभीर होतच त्यांना प्रश्न केला,” कशा वारल्या ? काय झालं होत ?? त्यावर ते मित्रही गंभीर होत म्हणाले,” तिला कावीळ झाली होती त्यामुळे तिचे लिव्हर पूर्णपणे खराब झाले होते आणि त्यामुळे ती गेली , त्यावर त्यांनी अशीही पुस्ती जोडली की डॉक्टर म्हणाले,” एखाद्या दारुड्या माणसांचेही लिव्हर इतके खराब झालेले नसते… मग ! विजयने त्यांना विचारले कोणत्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले होते तर त्यांनी ज्या हॉस्पिटलचे नाव सांगितले त्या हॉस्पिटलच्या विरोधात विजयने पूर्वी म्हणजे तो पत्रकारिता करत असताना बातमी तयार केली होती .. त्यामुळे तो त्या मित्राला म्हणाला,” तुम्हाला बायकोला ऍडमिट करायला मुंबईत फक्त तेच हॉस्पिटल सापडले का ? तर ते मित्र म्हणाले,” त्या हॉस्पिटलचे नाव तिच्या नातेवाईकांनी सुचवले होते.. त्यावर विजयने पुढचा प्रश्न विचारला कावीळ कधी झाली होती.. तर ते म्हणाले,” ती जायच्या महिना दोन महिने अगोदर ! मग ! काविळवर काही गावठी उपचार केले नाहीत ? तर ते म्हणाले मी आग्रह करून एकदा औषध दिले होते पण तिचा त्या औषधांवर विश्वास नव्हता तिचे माहेरची माणसे कुठल्याश्या डॉक्टरच्या काकाढयांच्या पावडरच्या पुड्या पाठवायचे तेच काडे ती दिवसातून तीनदा गरम गरम घ्यायांची ! तिला विश्वास होता की ती त्याच काढ्यांनी बरी होईल ! ती तिच्या भावाकडे गेलेली असताना ती आजारी पडली आणि तिला तिकडेच एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले होते तेव्हा त्या हॉस्पटलमध्ये तिच्यावर काविळचे उपचार केले होते.. पण मुंबईला आल्यावर तिने परत ते काढे सुरु केले… पंदरा दिवसांनी पुन्हा एका नातेवाईकाच्या कार्याला ती गावी गेली आणि मुंबईला परत आल्यावर खूप आजारी पडली आणि शेवटी लिव्हर पूर्ण खराब झाल्यामुळे ती कोमात जाऊन तिचा मृत्यू झाला… डॉक्टरने मृत्यूचे कारण सांगताना सांगितले की सतत ते नको ते काढे पायल्यामुळे आणि गावच्या हॉस्पिटलमध्ये चुकीची ट्रीटमेंट मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यावर विजयने विचारले ,” त्याचा मेडिकल इन्शुरन्स होता का ? तर ते हो ! म्हणाले … त्यावर विजय म्हणाला,” त्यांना इतर काही आजार नसल्यामुळे गावचे पाणी पायल्यामुळे त्यांना कावीळ झाली असावी ! तब्बेत बरोबर नसताना त्यांना कोणत्याही कारणाने पुन्हा गावी जाण्याची गरज नव्हती… त्या जे काढे घेत होत्या त्या काढ्यांचा खरोखरच शरीराला  काही उपयोग होतोय का की ते फक्त शरीर पोखरतंय याची त्यांना कल्पना आली नाही कारण ते काढे सुचविणाऱ्या माहेरच्या माणसांवर त्यांचा अधिक विश्वास  होता. त्यावेळी फालतू खाजगी  हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट करण्याऐवजी सुरुवातीलाच सरकारी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं असत तर कदाचित त्या वाचल्या  असत्या.. त्यावर ते मित्र म्हणाले ,” मला हे सगळं कळत होत , मी तिला समजविण्याचा खूप प्रयत्न केला होता पण ! ती आणि माझी मुले माझे काही ऐकतच नव्हते. त्यावर विजय म्हणाला, ” कोणतेही काढे जवळच्या डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय घेऊ नयेत.. कोरोना काळात आपल्या देशातील लोकांना हे नको नको ते काढे पिण्याची घाण सवय लागली आहे… लोकांचा ऍलोपॅथी वरचा विश्वास उडाला आहे पण ते योग्य नाही ! आयुर्वेदिक औषधे वाईट नसतात पण आजच्या धकाधकीच्या आयुष्यात त्या औषधांची पथ्ये पाळले शक्य होत नाही.. आणि त्यांचा परिणाम होण्यास फार काळ लागतो त्यामुळे ती औषधे जर चुकीची असतील तर आजार अधिक बळावू शकतो हे ही लक्षात घ्यायला हवे ! आता ते मित्र त्यांच्या जाण्याला त्यांच्या माहेरच्यांना जबाबदार धरत आहेत आणि त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी दुसरे लग्न करून भरून काढण्याच्या तयारीत आहेत…

पुरुष आपली बायको गेल्याचे दुःख किती सहज पाचवतो.. कधी – कधी वाटतं त्याचं त्याच्या बायकोवर कधीच प्रेम नसत मग ती पत्नी कमावती असो व नसो ! त्याला फक्त बायको पोरं काढून देण्यासाठी आणि कुटूंब सांभाळून जेवण करण्यासाठी हवी असते ! तस नसत तर बायको गेल्यावर एकाच महिन्यात एखाद्याच्या मनात दुसऱ्या लग्नाचा विचार कसा येऊ शकतो…. पुरुष दुसरं लग्न प्रेम मिळविण्यासाठी अजिबात करत नाही तर फक्त आणि फक्त रिकामी जागा भरण्यासाठी करतो… आता जे महाराष्ट्रात विधवा प्रथा बंद करण्यासाठी जे प्रयत्न होत आहेत त्या प्रयत्नांना यश यायलाच हवं ! भारतीय स्त्रिया आपल्या कुटुंबासाठी आपल्या तब्बेतीकडे दुर्लक्ष करतात पण दुर्दैवाने त्यांच्या आजारपणाने  जाण्याची दखलही भारतीय पुरुष कधीच घेत नाहीत… एखादा अपवाद असेल पण त्याचा विचार करण्यात काही अर्थ नाही… बायको मेली तर नवरा दुसऱ्या लग्नाचा विचार करायला महिनाभरही वाट पाहत नाही आणि बायको मात्र नवरा मेल्यावर आयुष्य काढते फक्त त्याच्या आठवणीवर सर्व त्रास सहन करत समाज्याचे दुर्लक्ष सहन करत… विधवा प्रथा ही आता बंद व्हायलाच हवी ! आपल्या देशात घटस्फोट घेऊन दुसरं , तिसरं , चौथ लग्न करणाऱ्या स्त्रियांनाही मान मिळतो पण आपल्या पतीच्या मृत्यू नंतरही आपलं पत्नी धर्म निभावणाऱ्या स्त्रियांना मात्र मान मिळत नाही हे किती दुर्दैवी आहे… आता जर खरोखरच स्त्री – पुरुष समानता अस्तित्वात आली असेल तर जर बायको मेल्यावर नवऱ्याला काही फरक पडत नसेल तर तो बायकोलाही पडता काम नये…नवरा गेल्यामुळे बायकोच्या सामाजिक प्रतिष्ठेत काहीही फरक पडायला नको ! असे विजयला वाटत होते…समाजाचा ऐकूनच स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन विजयला त्याच्या लहानपणापासून आवडत नाही कारण त्याची आई तो व त्याची भावंडे लहान असताना कुटूंबाला आर्थिक हातभार लागावा म्हणून एका कारखान्यात कामाला जायची पण त्याचा बाब तिला घर कामात कधी मदत तर करायचा नाही उलट तेव्हा दारू ढोसून आल्यावर तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारझोड करायचा त्यामुळे त्या वेळेपासूनच खरंतर विजयचा विवाह संस्थेवरचा विश्वास उडायला लागला होता.. पुढे पुढे त्याला खतपाणीच मिळाले त्यामुळे विवाह हि गोष्ट विजयने कधीच गंभरपणे घेतली नाही.. विजयचा प्रेमावर विश्वास आहे पण लग्नावर नाही.. कारण तो जिच्यावर प्रेम करतो तिच्यावर तो लग्न झाल्यावर प्रेम करेल याची त्याला खात्री वाटत नाही… कारण आपल्या देशात लग्न हा फक्त आणि फक्त एक बाजार झालेला आहे त्या बाजारात आजही फक्त स्त्रियाच विकल्या जातात… मग त्या शिकलेल्या असो वा ! अशिक्षित… विजय जेव्हा पत्राकरिता करायचा तेव्हा सुरुवातीच्या काळात त्याने एक लेख लिहिला होता की मूळ्नावात  बदल नको ! त्याला आता वीस एक वर्षे झाली पण आजही सुशिक्षित म्हणजे अगदी उच्चशिक्षित स्त्रियाही लग्नानंतर आपले नाव बदलतात  आणि त्याचे त्यांना काहीच वाटत नाही… हे पाहिल्यावर विजयला वाईट वाटते की मूळ्नावात बदल नको हा विचार मी एक पुरुष असूनही मांडला पण कोणा स्त्रीने नाही मांडला इतक्या वर्षात … विजय नेहमी स्त्रियांच्या विरोधातही लिहीत आला कारण त्या त्याच्या आयुष्यातील गोष्टींचे परीक्षण न करता तेच करत असतात जे पुरुषांना आवडते… त्या स्वतःसाठी कधी काही करणार आहेत की नाही हा प्रश्न विजयला सतत सतावत असतो…

— निलेश बामणे.

Avatar
About निलेश बामणे 419 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..