नवीन लेखन...

एक परीस स्पर्श ( भाग – ४६ )

विजय कोठेही असला तरी त्याचे डोळे आणि कान सताड उघडे असतात. लोकांच्यात होणारे संभाषण हे तर त्याच्या कविता, कथा आणि लेखांचे खाद्य असते. लेखक ,कवी असो अथवा पत्रकार त्यांना  सतत लोकांच्या भाव – भावनांचा विचार करत राहावे लागते. काही दिवसापूर्वी विजय बसने प्रवास करत होता. प्रवासात दोन स्त्रियांचा संवाद त्याच्या कानावर पडत होता… बायका तश्या बऱ्यापैकी सुशिक्षित दिसत होत्या म्हणजे त्यांच्या बोलण्यात येणाऱ्या सततच्या इंग्रजी शब्दावरून ते लक्षात येत होते. त्या बायका कमीत कमी दहावी – बारावी पर्यत  नक्कीच शिकलेल्या असाव्यात. त्यातील एक तर इतकी व्यवस्थित होती कि ती नक्कीच कोणत्यातरी कार्यालयात कामाला असावी अशी वाटावी. तर त्या दोन स्त्रियांच्या बोलण्यावरून विजयला लक्षात आले की ती बाई घरकाम करणारी होती, तिला दोन मुली होत्या एक मुलगी दहावीला आणि दुसरी सातवीला होती. नवऱ्याला उत्तम नोकरी होती. त्याने नवीमुंबईत कोठेतरी फ्लॅट विकत घेतला होता त्याचा तो हप्ता भरत होता म्हणून त्याला मदत म्हणून ही घरकाम करत होती. तीन घरकाम करून तिला १५००० रुपये मिळत होते. आणि सध्या ते ज्या इमारतीत भाड्याने राहात होते त्या घराचे भाडे बारा हजार होते त्यात लाईट बिल वेगळे म्हणजे ते जवळपास असेल १००० रुपये ! म्हणजे तिच्या पगार त्यांचे फक्त घरभाडे निघत होते. हे मुंबईतील वास्तवातील चित्र आहे. मुंबईत भाड्याने राहणाऱ्या  मध्यमवर्गीय लोकांना बचत करणे तर अश्यक आहे त्यामुळे कितीही मेहनत करून ते मुंबईत मालकीचे घर कधीच घेऊ शकणार नाही हे वास्तव होते. त्या दुसऱ्या स्त्रीचेही बहुतेक सारे उत्तमच चालले असावे पण नवऱ्याला मदत म्हणून म्हणा अथवा आपल्या काही इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तिला घरकाम हवे होते.. यापूर्वीचा तिला कामाचा काहीही अनुभव नव्हता. त्यांच्या संवादातून हे ही कळत होते कि हलली घरकाम करणाऱ्या बायका घरकाम करायला येताना स्कुटी वगैरे घेऊन येतात काहींचे नवरे त्यांना बाईकवरून कामावर सोडायला आणि घरी न्यायलाही येतात. त्यात कामाचा इतका मोबदला घेऊनही त्यांना ज्यांच्याकडे काम करतात त्यांच्याकडून चांगूलपणाची अपेक्षा असते. म्हणजे  त्यांनी त्यांना वेळेला आर्थिक मदत करावी. छोट्या मोठ्या वस्तू द्याव्यात आणि प्रेमाने वागावे इ. त्यातील एक बाई दुसऱ्या बैल अभिमानाने सांगत होती तिच्या शेजारची एक बाई घरकाम करते तिची मालकीण म्हणजे तिच्या मुलाचा कितवा वाढदिवस आहे त्याप्रमाणे त्याला वाढदिवसाची भेट म्हणून पैसे देत आली आहे म्हणजे पहिल्या वाढदिवसाला १००० रुपये, दुसऱ्या वाढदिवसाला २००० रुपये असे. एकूणच काय तर त्या घरकाम करणाऱ्या स्त्रियांची कामे ऐकून खरतर विजयला घाम फुटला होता आणि आता अगदी पदवीधर झालेल्या स्त्रियाही घरकाम का करतात ? याचे रहस्य त्याला उलगडले होते. विजयला घरकाम करण्यात तसे काही वावगे वाटत नाही पण मुंबईत मुंबईत बहुसंख्य मराठी बायका घरकाम करतात याचे नक्कीच वाईट वाटते आणि ते ही परप्रांतीयांच्या घरी त्याचे अधिक वाईट वाटते. त्यामुळेच कदाचित हिंदी चित्रपटात , मालिकांत नेहमी मराठी बायकाच मोलकरणी आणि घरगडी दाखवतात आणि तो रोल मराठी कलाकार अभिमानाने करतात याचे किंचित वाईट वाटते कारण त्यांना त्याचे पैसे मिळत असतात. मराठी बायकांना मुंबईत घरकाम करणे हा उत्पन्नाचा एकच पर्याय उरलेला आहे हे पाहून एक मराठी माणूस म्हणून विजयला खूप दुःख होते.. पण आता त्या घरकाम करणाऱ्या स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आलेला आहे. त्या बायकांच्या बोलण्यात एक विषय असाही आला कि काही दिवसापूर्वी जवळच्याच एका टॉवरमध्ये एका ३० वर्षीय महिलेची कामगारांसाठी असलेल्या स्वच्छतागृहात तिच्यासोबतच काम करणाऱ्या २१ वर्षीय पुरुषाने गळा चिरून हत्या केली. त्यामुळे आता त्या इमारतीत घरकाम करणाऱ्या स्त्रिया घाबरलेल्या आहेत त्यामुळे सध्या त्या घरकाम करणाऱ्या बायकांचे नवरे त्यांना कामाच्या ठिकाणापर्यत सोडायला येतात. इतके सगळे असताना, इतर पर्याय उपलब्ध असतानाही त्या बाईला घरकाम करायचे होते याचेच विजयला आश्चर्य वाटत होते..

विजयचे एक – दोन मित्र असेही आहेत की तत्यांच्या आईने त्यांना घरकाम करून शिकविले अगदी एम.  बी ए . झाले ते आणि लग्न करून वेगळे राहायला लागले आहेत आज त्यांच्याकडे घरकामाला बाई येते पण त्यांच्या आईशी आजही दुसऱ्यांची धुणीभांडी करतात हे पाहिल्यावर विजयला खूपच वाईट वाटते.. विजयच्या अशिक्षित आईने स्वाभिमानापोटी घरकाम करण्यापेक्षा दोन चार वर्षेच का होईना घरकाम करण्याऐवजी एका कारखान्यात काम करण्याचा मार्ग स्वीकारला होता… त्याचा विजयला आजही अभिमान वाटतो. उच्च शिक्षित तरुणांनाही आजकाल आपली आई घरकाम करते याची लाज वाटत नाही हे खरंच किती दुर्दैव आहे. म्हणजे माणूस किती पैशाचा हपापलेला आहे आणि कोणालाही कोणाची आर्थिक जबाबदारी घ्यायची नाही अगदी मुलाला आपल्या आईचीही ! तर रक्तातील इतर नात्यांची जबाबदारी ! त्याची कल्पनाच न केलेली बारी… या घरकाम करणाऱ्या बहुसंख्य बायकांचे नवरे ते नसतील तर मुले हे व्यसनी असतात हे सत्य आहे… एक प्रकारे ह्या घरकाम करणाऱ्या स्त्रियांचे पुरुषांकडून शोषणच होत असते. स्वतःच्या आर्थिक प्रगतीसाठी अथवा आर्थिक सक्षमीकरणासाठी या बायका काम करत असत्या सर्व ते नक्कीच स्वागतहार्य असते. पण वास्तवात हे होण्याची शक्यता थोडी कमीच आहे… कोणतेही काम हलके नसते ! हे म्हणणे सोप्पे असते, पण प्रत्यक्षात सर्व काम करणाऱ्या व्यक्तींना समान वागणूक मिळतेच असे नाही. घरकाम करणाऱ्या स्त्रियांना मिळणारे पैसे आणि कारखान्यात काम करणाऱ्या स्त्रियांना मिळणारे पैसे यात कमालीची तफावत आहे. पूर्णवेळ काम करूनही कारखान्यात काम करणाऱ्या स्त्रिया घरकाम करणाऱ्या स्त्रियांइतके पैसे कमावत नाहीत हे आज वास्तव आहे…. कारण या कारखान्यांवर सरकारचे कोणतेच नियंत्रण राहिलेले नाही. त्यामुळे या घरकाम करणाऱ्या स्त्रियांपेक्षा कारखान्यात काम करणाऱ्या स्त्रियांची अधिक पिळवणूक होते. हे वास्तव आहे…. निदान मुंबईतील तरी… मुंबईतील बहुसंख्य छोट्या कारखान्यात आजही काम करणाऱ्या  पुरुष कामगाराला दिवसाला ३०० रुपये रोज दिला जातो. म्हणजे महिन्याला त्यांना ८००० रुपयेही मिळत नाहीत अशा कामगाराच्या पत्नीला घरकाम करावे लागणारच ना ! आपल्या देशात वेगवेगळ्या ठिकाणी कामगाराला दिल्या जाणाऱ्या मोबदल्यात असणारी प्रचंड तफावत जोपर्यत दूर होत नाही तोपर्यत सरकारी नोकरीसाठी लागणाऱ्या लांबच्या लांब रांगा कधीच कमी होणार नाही… आणि कामगारांचे आयुष्य मार्गीही लागणार नाही. विजयने आपले अर्धे आयुष्य कारखान्यात काम करण्यात वाया  घालविले होते पण त्या बदल्यात त्याच्या हातात चिंचोकेच आले होते. छोट्या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या हिताचा विचार अजिबातच सरकार कडून केला गेलेला नाही हे वास्तव आहे… त्यात हे कामगार असंघटित असतात. त्यांना संघटित करावे असा विचारही पुढे आलेला नाही… विजय ज्या कारखान्यात काम करत होता तो कारखाना अक्षरश: धर्मशाळेसारखा चालविला जात होता… आता तो कारखाना बंद होतोय याचा विजयला आनंदच होत होता.  विजयने त्यावेळी या सगळ्याच्या विरोधात भूमिका घेतली नाही याचा विजयला आज पश्चाताप होतोय ! विजयला आर्थिक समस्या नसली तरी तो त्याच्यासोबत त्यावेळी काम करणाऱ्या निदान चार पाच कामगारांचे हिट साधू शकला असता. आज विजय जेव्हा आर्थिक गणित मांडतो तेंव्हा त्याच्या लक्षात येते कि त्याने त्याचे आणि इतर कामगारांचे किती नुकसान केले आहे… विजयच्या चंगूलपणामुळे त्याने स्वतःचे तर नुकसान करून घेतलेच पण इतर कामगारांचेही नुकसान केली.. त्याच्या चंगूलपणाचे बक्षीस तर त्याला मिळाले नाहीच उलट एक कारखाना बंद करण्याचे पातक त्याच्या माथी मारण्याचा प्रयत्न झाला. पण आता विजयला त्याचे काडीचेही दुःख होत नाही… कामगारांचे शोषण करणारे कारखाने बंद झालेलेच उत्तम…या मतापर्यत आता तो पोहचलेला आहे…

— निलेश बामणे.

Avatar
About निलेश बामणे 418 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..