नवीन लेखन...

एक परीस स्पर्श ( भाग – ५०)

आदरणीय एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे ३० वे मुख्यमंत्री झाले…मुख्यमंत्री होणे हे त्यांच्या प्रारब्धातच असावे त्यामुळेच त्यांनी अनाकलनीय पाऊल उचलून हे बंड केले…विजयला खात्री आहे येत्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आदरणीय शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्यात नक्किच दिलजमाई होईल…पण तूर्तास महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यांचा त्रास थोडा कमी झाला असेल कारण जनता काय होतं हे पाहण्यासाठी टीव्ही आणि मोबाईलवर डोळे लावून बसली होती…आदरणीय उद्धव ठाकरे साहेब यांनी मुख्यमंत्री पदाचा आणि विधानपरिषद सदस्यत्वाचा  राजीनामा दिला त्यात आश्चर्य वाटण्यासारखे असे काही नव्हते पण त्यामुळे येत्या काळात ते शिवसेना पक्ष म्हणून अधिक बळकट करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील आणि त्या प्रयत्नांना यशही येईल… आता जे प्रसारमाध्यमातून शिवसेना संपविण्याचा वगैरे डाव आहे अशा बातम्या येतात तर त्यात काही तथ्य नसावे ! शिवसेना संपविणे कदापी शक्य नाही कारण शिवसेना एक राजकीय पक्ष असली तरी ती एका विशिष्ठ विचारधारा असणाऱ्या लोकांची मजबूत संघटना आहे जी बाळासाहेबांनी तीन पिढ्यांच्या मानत रुजवून वाढवलेली आहे. इतके दिवस टी. व्ही. वरील बातम्यांवर लावून ठेवलेले डोळे विजयने आता दूर केले… अचानक पावसाला जोरदार सुरुवात झाली. त्या पावसात विजय न्हाऊन निघाला आणि त्याला छत्रीची आठवण आली. पाऊस आणि छत्री यांचे एक अनोखे नाते असते. आपल्या देशात छत्रीची आठवण फक्त पावसाळ्यात येते. पाऊसाच्या सुरुवातीला विजयच्या घरातील दोन छत्र्या हरवल्या. विजयने आता पर्यत किती छत्र्या हरवल्या याची काही गणतीच नाही प्रत्येक वर्षी तो एखादी छत्री हरवतोच ! त्यामुळे त्याचे त्याला दुःख वाटत नाही पण एकदा एक नवीन छत्री त्याने त्याच्या चांगुलपणामुळे हरवली होती. एकदा विजय त्याच्या कार्यालयात काम करत बसला होता आणि बाहेर धो – धो पाऊस कोसळत होता. त्या  पाऊसात भिजत एक म्हातारी त्याच्या ऑफिस समोर येऊन उभी राहिली. पाऊस तर मी म्हणत होता पाऊस जाण्याची कोणतीच चिन्हे दिसत नव्हती. म्हातारी कुडकुडत येथे उभा राहण्यापेक्षा ती तिच्या घरी जाणे उत्तम म्हणून विजयने तिला आपली नवी कोरी छत्री दिली आणि तो तिला म्हणाला,” आजी ही छत्री घेऊन जा ! परत कधी ह्या रस्त्याने आलात तर मला माझी छत्री परत करा…. त्या दिवशी विजय  पावसात भिजत घरी गेलो. तसही मुसळधार पावसात भिजायला विजयला  खूप मजा येते… पण त्या म्हातारीने त्याची ती छत्री काही पावसाळा संपला तरी त्याला काही आणून दिली नाही.. दिली नाही त्याची अनेक करणे असू शकतात.. पण इतक्या हरविलेल्या  छत्र्यात विजयला आजही फक्त ती एकच छत्री लक्षात आहे कारण त्याचा चंगूलपणा नाही तर त्या छत्रीवरील नक्षीकाम आणि रंगसंगती विजयला प्रचंड आवडलेली होती. म्हणूनच विजयने ती छत्री विकत घेतली होती.. कदाचित त्या म्हातारीचा जीवही त्या छत्रीत गुंतला असेल. असो ! छत्री गमावल्याच्या  दुःखापेक्षा आपण पावसात भिजणाऱ्या एका म्हातारीला मदत केली याचा त्याला प्रचंड आनंद होता. विजय ही  मदत करत असताना पाहणाऱ्या त्याच्या मित्रांना खात्री होती की ही म्हातारी छत्री आणून देणार नाही ! मदत करताना हा विचार विजयाच्या मनात आला नसेल असे नाही ! पण तो स्वतःशीच म्हणाला,” दिली ! नाही दिली ! तरी माणुसकीच्या नात्याने मला माझे कर्तव्य तर करावेच लागणार त्याला पर्याय नाही.. तेंव्हा पासून विजय कोणालाही मदत करताना समोरच्यांकडून कोणतीच अपेक्षा कधीच करत नाही. दानाची सुरुवात आपल्या घरापासूनच करायला हवी ! असे म्हणतात… ही गोष्ट विजयला त्याच्या लहानपणीच कोणीही न सांगताच उमगली होती त्यामुळेच स्वतः जवळ, स्वतःसाठी असा धनसंचय न करता आपल्या घरासाठी त्या घरातील माणसांसाठी झिजत राहिला आणि त्या झिजण्यातूनच त्याला एक दिवस इतरांसाठीही झिजण्याची प्रेरणा मिळाली होती…

विजयला आपल्याजवळ पुरेसे पैसे नसल्यामुळे आपण कोणत्याही सामाजिक कार्यात आर्थिक मदत करू शकत नाही याचे विजयला प्रचंड दुःख होते पण त्या परिस्थितीत तो स्वतःला समजावतो की आपण लोकांना आर्थिक मदत करावी ही त्या परमेश्वराचीच इच्छा नसावी ! पण  त्याच ईश्वराने विजयला विचारांची संपत्ती अमाप दिली. ती संपत्ती विजयने लोकांना भरभरून वाटली. अजूनही भरभरून वाटत आहे आणि भविष्यातही भरभरून वाटेल याची त्याला खात्री वाटते.

काही दिवसापूर्वी विजयने एका किर्तनात एक कथा ऐकली ती कथा अशी होती की एका गावात एक मोठे साधू महाराज येतात.. त्या गावातील लोक खूपच धार्मिक असतात ते त्या साधूना लोक वर्गणीतून एक आश्रम बांधून देतात .. त्यावर ते साधू महाराज मानत विचार करतात या गावाने आपल्यावर उपकार केलेले आहेत त्या उपकाराची परतफेड आपल्याला करायला हवी म्हणून ते त्या गावकऱ्यांना सांगतात तुम्ही मला तुमच्या गावातील पन्नास विद्यार्थी द्या मी त्या पन्नास विद्यार्थ्यांना दोन वर्षे शिकवून ज्ञानी करेन त्याप्रमाणे गावकरी ४९ विद्यार्थी जमा करतात पण एक विद्यार्थी कमी पडत असतो. त्या गावात एक मुलगा असतो तो फक्त खात असतो आणि झोपत असतो. गावकरी विचार करतात ५० वा विद्यार्थी म्हणून ह्याला पाठवू या ! घरी झोपा काढतो त्या ऐवजी तेथे जाऊन झोपा काढेल. ठरल्याप्रमाणे ते साधू त्या विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात करतात तो ५० वा विद्यार्थी आपल्या सवयी प्रमाणे मागे भिंतीला टेकून झोपा काढत असतो.  हा ! हा ! म्हणता एक वर्ष होते .. साधू महाराज त्या मागे बसलेल्या ५० व्या विद्यार्थ्याला  उठवून पुढे आणून बसवायला सांगतात आणि सर्व विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणतात,” एक गॊष्ट लक्षात ठेवा ! ईश्वर चराचर आहे … तुम्ही जे काही करता ते आणखी कोणी पाहत नसला तरी ईश्वर पाहत असतो.  मी तुम्हाला वर्षभर शिकविले , मी तुम्हाला खरे तर २ वर्षे शिकविणार होतो पण मला वाटते तुम्ही सारे १ वर्षतच शिकलात त्यामुळे तेरवा मी तुमची परीक्षा घेणार आहे , तुम्ही दोन दिवस अभ्यास करा आणि तेरवा परीक्षेला या !  माझ्या एक भक्ताने मला ८० आंबे दिले आहे तुम्ही सर्व जाताना एक – एक आंबा घेऊन जा ! पण तो आंबा सर्वानी अशा ठिकाणी जाऊन खा ! जेथे कोणी तुम्हाला आंबा खाताना पाहणार नाही. जो कोणी या परीक्षेत पास होईल त्याला अभ्यासातून सुट्टी मिळेल आणि जो नापास होईल त्याला आणखी एक वर्षभर शिकवेन ! तिसऱ्या दिवशी सर्व विद्यार्थी ठरल्याप्रमाणे परीक्षेला येतात गुरु महाराज प्रत्येकाला विचारतात तुम्ही आंबा कोठे खाल्ला ? त्यावर एक विद्यार्थी म्हणतो मी तीन घोंगद्याच्या आता जाऊन खाल्ला , दुसरा मुलगा म्हणाला,” मी माळरानावर जाऊन खाल्ला, तिसरा मुलगा म्हणाला, ” मी न्हाणीघरात जाऊन खाल्ला ! असे ४९ विद्यार्थी वेगवेगळी ठिकाणे सांगतात ! शेवटी गुरुजी ५० व्या विद्यार्थ्याला विचारतात तुझे काय ? तर तो आंबा पुढे करत गुरुजी महाराजांना म्हणतो की तुम्ही वर्षभर काय शिकविले ते मला माहित नाही पण त्या दिवशी मला पुढे बॊलावून तुम्ही काय म्हणाला होतात ,” ईश्वर सर्वत्र आहे आपण जे काही करतो ते इतर कोणी नाही पण तो ईश्वर पाहत असतो त्यामुळे मी जेथे जेथे आंबा खायला गेलो तेथे मला इतर कोणी पाहत नव्हता पण ईश्वर पाहत होता त्यामुळे मी तो आंबा खाल्ला नाही… त्यावर ते गुरु महाराज म्हणतात तुमच्या पैकी माझ्या परीक्षेत फक्त हा एकटा पास झालेला आहे… कथेचं तात्पर्य काय होत.. तुम्ही जे काही करता ते इतर कोणी नाही पहिले तरी परमेश्वर पाहत असतो… त्यामुळेच एक अक्का कारखाना विजयच्या हातात कित्येक वर्षे असतानाही त्या कारखान्यातून त्याने वेतना व्यतिरिक्त कधी १ रुपयाचाही त्या कारखान्याच्या माध्यमातून कधी कोणत्याही मार्गाने व्यक्तिगत फायदा करून घेतला नाही. तरीही त्या कारखान्याच्या मालकाने त्याचा उपयोग करून घेतला हे वेगळे ! पण त्याचेही विजयला दुःख नाही कारण त्याने त्याच्या कर्तव्यात कसूर केली नाही.  त्यालाही असे वाटत होते की आपण कोणतीही चुकीची गोष्ट केली तर तिला दुसरा कोणी पाहत नसेल तरी ईश्वर पाहत असतो.

— निलेश बामणे.

Avatar
About निलेश बामणे 419 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..