नवीन लेखन...

एक परीस स्पर्श ( भाग – ५१)

विजय त्याच्या घरातील बेडरूममध्ये बसून बेडरूमच्या खिडकीतून बाहेर पाहत होता. बाहेर धो – धो पाऊस कोसळत होता आणि त्या पावसाच्या आवेगाने समोरच्या झाडाच्या फांद्या खाली वाकत होत्या. समोरील ओबड – धोबड भिंतीवरून एक पाण्याचा कृत्रिम रित्या तयार झालेला धबधबा कोसळत होता. त्या कोसळणाऱ्या धबधब्याकडे विजय एक टक पाहत होता. त्या बेडरूममध्ये विजय एकटाच एकांतात बसला असल्यामुळे तो शांत डोक्याने विचार करू शकत  होता. विचार करता करता त्याच्या मनात विचार आला.  गेली सहा वर्षे मी अनामिकेच्या प्रेमात आहे त्यामुळे लग्नासाठी मी इतर कोणत्याही तरुणीचा विचारही केला नाही. माझे अनामिकावर प्रेम आहे पण तिचे माझ्यावर कोठे आहे ? ज्या मुलीचे आपल्यावर प्रेमच नाही अशा मुलीच्या प्रेमात पडून राहण्यात काय अर्थ आहे ? एक दिवस ती दुसऱ्याचा हात धरून आनंदाने निघून जाईल तेव्हा तू तिला रोखूही शकणार नाहीस आणि आपलं प्रेम तिच्यासमोर व्यक्तही करू शकणार नाहीस?

शेजलचे काय झाले ते माहीतच आहे ? तिचे तुझ्यावर किती प्रेम होते पण तू काही तिच्या प्रेमाला प्रतिसाद दिला नाहीस ! अनामिकेने तरी तुझ्याबाबतीत दुसरे काय केले ? तू तिच्यावर प्रेम करत राहिलास पण ती काही तुझ्या प्रेमात पडली नाही. तिला तुझे प्रेम कळले नसेल असे वाटत नाही कारण स्त्रियांना पुरुषांच्या डोळ्यातील भाव स्त्रियांना लगेच ओळखता येतात. शेजलचे तुझ्यावर जीवापाड प्रेम होते पण तू तिला तुझे तिच्यावरील प्रेम काही दिसू दिले नाहीस, पूर्वीपासून प्रेमाच्या आणि लग्नाच्या बाबतीत तुझे तत्व होते कि जी मुलगी तिचे तुझ्यावर असणारे प्रेम तुझ्यासमोर स्वतःहून व्यक्त करेल तू तिच्याशीच लग्न करशील ? शेजलची काही तिचे तुझ्यावरील प्रेम व्यक्त करण्याची हिंमत काही झाली नाही. तुझ्या मनात तिच्यासमोर प्रेम व्यक्त करण्याची नाही म्हटले तरी इच्छा होती. तिच्या आईनेही तुला एक दोनदा आडून आडून विचारले होतेच पण तेव्हाही तू तुझ्या नेहमीच्या जोडीदाराबद्दलच्या जास्तीच्या अपेक्षा सांगितल्या होत्यास त्यामुळे झाले काय ? तिच्या आईने तिच्यासाठी स्थळे पाहायला सुरुवात केली आणि तिच्या गावातीलच एका मुलाशी तिचे लग्न लावून दिले. लग्नानंतर ती तुला फक्त एकदाच भेटली. त्यानंतर ती तुला आता भेटली जेंव्हा ती विधवा झालेली होती. कोरोनात तिचा नवरा गेला होता. त्यातल्या त्यात दुर्दैवाची आणखी एक गोष्ट होती ती म्हणजे तिला मुलबाळही झालेले नव्हते. तिचे लग्न होऊन ती विधवा झाली तरी अजूनही तुझे लग्नही झाले नाही. नियतीने तिला पुन्हा तुझ्या समोर आणून उभे केले . आता ती एखाद्या प्रौढ बाईसारखी दिसते, तिच्यात ती पूर्वीची नाजूकता आणि चंचलता नावालाही शिल्लक राहिलेली नाही. तिचे शब्दही कोरडे झालेले आहेत. तुझ्या मनात कधी – कधी विचार येतो कि तू तिच्याशी लग्न केले असतेच तर तिचे आयुष्य वेगळे असते पण ज्योतिषी म्हणून तुला हेही माहीत आहे कि भविष्य कोणालाही बदलता येत नाही. तिच्या नशिबातच वैधव्य होते. कदाचित तिच्या नशिबात दुसऱ्या विवाहाचा योगही असेल… पण तुझे तिच्याशी लग्न होणे हे कदाचित नियतीलाच मान्य नसावे… आता विधवा झालेल्या शेजलशी तू लग्न करायला तयार व्हावास एवढे मोठे मन तुझे नक्कीच नाही !

तुझे लग्नच होईल कि नाही याबद्दलच तुला शंका आहे ? तुझ्या पत्रिकेत द्विभार्या योग आहे. त्यामुळे त्या भीतीनेही तू लग्न करत नाहीस आपण जिच्यावर प्रेम करून लग्न करू ती आपल्यासोबत टिकेल का ? याची तुला खात्री नाही. द्विभार्या योगाचे दोन अर्थ असतात एक तर माणूस दोन लग्न करतो अथवा अकि सोबत लग्न करून दुसरीला बायकोसारखे मानत असतो. कोणत्याही परिस्थितीत तो जिच्याशी विवाह करणार तिच्या दुःखाला कारणीभूत ठरणारच आहे. त्यापेक्षा त्याला आता लग्नच न करणे हा पर्याय जवळचा वाटतो. तसेही त्याच्या पत्रिकेत चंद्र आणि हर्षल त्याच्या कुंडलीत एकाच घरात आहेत…

अनामिकेसाठी आपण इतकी वर्षे वाया घालवली याचा आता विजयला पश्चाताप होऊ लागला होता. त्याच्या आयुष्यात आलेल्या इतक्या जणी त्याच्या आयुष्यातून ह्या ना त्या कारणाने दूर गेल्या त्याचे त्याला इतके दुःख झाले नाही जितके अनामिकेच्या जाण्याने होईल… कारण अनामिकेच्या बाबतीत त्याला असे वाटत होते कि त्याचे आणि तिचे जन्मजन्मांतरीचा नाते आहे . त्यामुळे काहीही झाले तरी त्यांचे मिलन हे होणारच ! मग अख्खं जग आडवं आलं तरी ! पण हे तोपर्यतरच वाटत होत जोपर्यत तिच्याही मनात त्याच्याबद्दल ओलावा आहे असे विजयला वाटत होते. पण तसा तो नसावा कारण लग्नासाठी तिने आता पर्यत दहा – बारा मुलांना नकार देऊन झाली आहे. तिच्या मुलाकडूनच्या अपेक्षा फारच जास्त आहेत त्या म्हणजे तो दिसायला सुंदर असावा, श्रीमंत असावा, निर्व्यसनी असावा वगैरे पण ती लग्नाला नकार का देत असावी याची तिची पत्रिका पाहिल्यावर विजयाच्या लक्षात आले होते की तिला शारीरिक संबंध बाबत फार इच्छा नसावी, तिला गर्भाशया बाबतही काही समस्या असाव्यात, तिला अशीही एखादी समस्या असावी जी ती दुसऱ्या कोणाला सांगूही शकत नसावी. त्यामुळेच भल्या भल्या मुलींना आपल्या प्रेमात पडणाऱ्या विजयला तिला प्रेमात पाडणे जमले नसावे… विजयला हे माहित आहे कि तिच्या जन्मपत्रिकेत अनेक दोष आहेत. ते दोष माहीत असतानाही तो तिच्या प्रेमात होता कारण त्याच्याशी काही प्रमाण मिळते जुळते दोष त्याच्या पत्रिकेतही होते त्यामुळे त्याला वाटत होते की नियतीने त्यांची भेट घडवून आणली होती. पण विजयने स्वतःहून प्रयत्न करूनही अनामिकेकडून काहीच प्रतिसाद मिळालेला नव्हता. त्यामुळे विजयची आता खात्री पटू लागली होती कि अनामिका कदाचित त्याच्या आयुष्याची ती जोडीदार नसावी.. त्याला मिळालेले दैवी संकेत आणि घटना जरी त्याला अनामिकात गुंतवून ठेवत असल्या तरी आता त्याला त्याचे आणि अनामिकेच्या भविष्यात एकत्र येणे अशक्य वाटू लागले होते… ती त्याच्या आयुष्यातून निघून गेल्याच्या दुःखात विजयला दुःख करत  बसायचे नव्हते… कारण त्याचा नियतीवर प्रचंड विश्वास आहे. त्यामुळेच विजयने आता आपले अनामिकेवरचे प्रेम आणि लक्ष दुसरीकडे वळवायला सुरुवात केली होती… फक्त दैवी अनुभूती म्हणून तो तिच्या प्रेमात होता पण आता त्याला तो त्याचा त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा गैरसमज होता असे वाटू लागले होते. अनामिकेच्या आणि त्याच्या आयुष्यात आता काय काय होते हे पाहण्याची त्याला  उत्सुकता होती पण तटस्थपणे.. आता विजय तिच्यात फार गुंतून राहणार नव्हता. विजयच्या डोक्यात कोणाच्याही प्रेमाची नशा लगेच चढते आणि ती कित्येक वर्षे टिकूनही राहते.. पण ती नशा जेव्हा उतरते तेव्हा तो पुन्हा पूर्वीसारखाच झालेला असतो. नव्याने कोणाच्यातरी प्रेमात पडायला… पण ह्यावेळी नियतीने त्याच्यासमोर काय वाढून ठेवलेले आहे याची त्यालाही कल्पना नव्हती. त्याला त्याच्या भविष्याबद्दल तशी फारशी चिंता नाही कारण पद प्रतिष्ठा आणि संपत्ती त्याच्या पायाशी भविष्यात लोळण घेणार याची त्याला खात्री आहे पण त्या बदल्यात त्याला सांसारिक सुखाचा त्याग करावा लागणार हे अटळ आहे. अनामिकेच्या आयुष्यात भविष्यात  काय वाढून ठेवले आहे याची तिला कल्पना नसली तरी विजयला बऱ्यापैकी  कल्पना आहे. विजयाच्या आयुष्यात प्रेम चोरपाचोर पावलांनी येणे आणि चोरपावलांनी निघून जाणे हे काही त्याच्यासाठी नवीन नाही. विजयने खरे प्रेम फक्त अनामिकावर केले होते आणि त्याच्या आयुष्यात आलेल्यांची त्याच्यावर प्रेम केले होते. आता आयुष्याच्या या टप्प्यावर विजयला कदाचित प्रेमभंग पचवायला लागणार होता. विजय आता भावुक झाला होता पण त्याला या विश्वाचे अंतिम सत्य माहीत होते त्यामुळेच तो स्वतःच स्वतःला समजावत असतो कि तुला फक्त नियतीने तुझ्यासमोर उभ्या केलेल्या परिस्थितीला समोर जायचं आहे… तेवढेच आता तुझ्या हातात आहे.. तुझ्या आयुष्याचे तू निर्णय घेण्याची वेळ कधीच टळून गेलेली आहे. यापूर्वीचे निर्णयही तू घेतलेले नाहीस ! हे तुला ठाऊक असले तरी या भौतिक जगातील लोकांना मारे पर्यत असेच वाटत राहते कि त्याचे आयुष्य त्याने त्याला हवे तसे घडविले पण प्रत्यक्षात ते नियतीने त्याच्याकडून घडवून घेतलेले असते… खिडकीतून बाहेर दिसणारा धो – धो पाऊस जसा कोसळायचे थांबला तसा विजय शांत झाला त्याच्या मानतील चलबिचलही  शांत झाली…

— निलेश बामणे.

Avatar
About निलेश बामणे 418 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..