सहा महिन्यांनंतर बरेच प्रयोग, औषधे आणि व्यायामाचे प्रकार सातत्याने केल्यावर आता कोठे विजयचा पाय दुखायचा कमी झाला होता म्हणजे तो आता पायऱ्या सहज उतरू लागला होता. पायाच्या निमित्ताने विजयला सहा महिने सक्तीचा आराम करावा लागला होता तरीही या सहा महिन्यात त्याने त्याचा आर्थिक भार दुसऱ्या कोणाच्याही खांद्यावर पडू दिला नव्हता. त्याचा खर्च निघावा इतके छोटे मोठे काम तो करतच होता पण याकाळात त्याला घराला आर्थिक हातभार लावता आला नाही त्यामुळे त्याचे बाबा थोडे थोड वैतागल्यासारखे वागू लागले होते कारण आता कुटुंबाचा सर्व आर्थिक भार त्यांच्यावर येऊन पडला होता. विजयने त्याच्या स्वतःच्या सर्व गरज मर्यादित करून घेतल्या होत्या त्यामुळे तो कमीत कमी पैशातही स्वतःचा उदरनिर्वाह करू शकत होता. पण ते सर्वानाच जमेल असे नाही ना ! विजयच्या बाबाना बऱ्यापैकी खर्च करण्याची सवय लागलेले असल्यामुळे खर्च करताना त्यांना हात आखडता घेता येतच नाही. विजयने या सहा महिन्यात त्यांच्याकडून एक रुपयाही घेतला नाही. पण विजयच्या या पायाच्या दुखण्यामुळे त्याच्या घराचे आर्थिक नुकसान झाले हे सत्यही नाकारता येणार नाही. विजयला काहीही झाले तरी कोणासमोर पैशासाठी हात पसरण्याची वेळ त्याच्यावर देवाच्या कृपेने येत नाही.. त्यासाठी विजय नेहमीच देवाचे आभार मानतो. विजयच लग्न व्हावं म्हणून विजयच्या आई – बाबानी विजयचा विरोध असतानाही हजरो रुपये खर्च करून केलेल्या शांतीचा काहीही उपयोग झाला नाही. विजय त्याच्या आई – बाबाना अगोदरच म्हणाला होता,” या शांत्या वगैरे करून काही होत नाही. जे व्हायचे ते त्याच्या ठरल्या वेळेला होते .. ते होण्यापासून जगातील कोणतीही ताकद थांबवू शकत नाही. पण विजयचे म्हणणे विजयच्या आई – बाबांना कधीच पटत नाही. जे जग विजयच्या अचाट बुद्धीसमोर नतमस्तक होत. पण त्याच बुद्धीचे महत्व त्याच्या आई-बापाला कधी कळलेच नव्हते आणि भविष्यात कळण्याची शक्यताही दिसत नव्ह्ती. विजयचे आई-बाबांना विजयचे मन कधीच कळेल नव्हते… त्यांनी नेहमीच विजयचे आयुष्य स्वार्थीपणाने हाताळले होते.. म्हणजे त्याच्या जगण्यात त्यांनी नेहमीच त्यांचा स्वार्थ पहिला होता आणि आजही पाहत आहेत… जेव्हा विजयच्या आयुष्यात डझनभर सुंदर तरुणी होत्या तेव्हा त्याच्यापैकी कोणाशी विजयचा विवाह करून द्यावा असा विचार त्यांच्या मनात कधीच आला नाही.. विजयच्या हृदयावर ज्यांनी अधिराज्य गाजवले त्या सर्व विजयच्या आयुष्यातून निघून गेल्यावर त्यांनी विजयासाठी मुली पाहायला सुरुवात केली… त्यांनी पाहिलेल्या त्या सुमार मुलींपैकी कोणाला आपल्या आयुष्याची जोडीदार करण्याचा विचार विजय स्वप्नातही करू शकत नव्हता. तसेही आता विजयने त्याचे एकट्याचे आयुष्य स्वीकारले होते त्यात तो आनंदी होता आता त्याला त्याच्या आयुष्यात कोणाचीही ढवळाढवळ नको होता. तो आता त्याच्या मानला वाटेल तसे मोकळे जीवन जगायला लागला होता. आता तो त्याच्या या जगण्यातच प्रचंड आनंदी होता. त्याला तो एकटा जीवन जगत असल्याची कोणतीही कसलीच खंत वाटत नव्हती. विजयला आता कोणत्याच शारीरिक गरजाही सतावत नव्हत्या कारण आता तो त्या गरजांच्या पलीकडे विचार करू लागला होता. एक स्त्री ही आता त्याला त्याच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची गोष्ट वगैरे वाटत नव्हती.. तो त्याच्या वाटणीचे प्रेम करून झळा होता. तो त्याच्या वाटणीच्या प्रेमातील रात्रीही जागवून झाला होता.. आता एखादी सुंदर तरुणी पहिली कि त्याच्या मनात काही क्षणासाठी फुलपाखरे उडू लागतात पण ती सुंदर तरुणी नजरेआड होताच त्याचे मन पुन्हा पूर्वी सारखेच शांत होते. म्हणजे स्त्रीयांच्या बाबतीतल्या त्याच्या भावना आता कोरड्या झालेल्या आहेत. म्हणजे स्त्रियांबद्द्ल आता त्याच्या मानत प्रेम तर निर्माण होत नाहीच पण शारीरिक आकर्षणही निर्माण होत नाही म्हणजे तो ” अलैंगिक ” झालेला आहे… म्हणजे कोणत्याच लिंगाबद्दल त्याला विशेष आकर्षणही राहिलेले आणि तिरस्कारही वाटत नाही…विजयचे आईबाबा त्याला लग्नावरून अधून मधून विषय निघाल्यावर त्याला टोमणे मारत असतात त्याचा स्वाभिमान आणि अभिमान दुखवण्याचा प्रयत्न करत असतात जेणेकरून त्यामुळे तो कोणाशीही लग्नाला तयार होईल. पण तसे आता काही होणार नाही हे त्यांच्या लक्षातच येत नाही… विजयचच्या दृष्टीने लग्न या गोष्टीला त्याच्या आयुष्यात काडीचीही किंमत उरलेली नाही कारण त्याच्यावर प्रेम करणारी, त्याच्यावर प्रेम असणारी अशी कोणी आता या वयात भेटेल अशी त्याला खात्री वाटत नव्हती. कोणाच्याही दबावाखाली बायको नावाचे एक लोढणे विनाकारण बांधून घेण्याइतका विजय मूर्ख नव्हता. त्यामुळे आता तो कोणाच्याही भावनिक दबावाला बळी पडणे अशक्य होते.. . आता तर त्याला अनामिकाचीही आपल्या आयुष्यात खरंच गरज आहे का याचाही नव्याने विचार करू लागला होता. कारण आता अनामिकाही त्याच्या आयुष्यात आल्यामुळे त्याच्या आयुष्यात फार मोठा बदल घडणार नव्हता. उलट तिच्या स्वप्नांसाठी त्याला अधिकचे श्रम करावे लागणार होते.. त्याला त्याला आता अनामिकाबद्दलही पुर्वीसारखे शारीरिक आकर्षण वाटेनासे झाले होते.. कारण विजय जेंव्हा अनामिकेच्या प्रेमात पडला होता ती खूपच तरुण होती. त्यामुळे तेव्हा विजयला तिच्याबद्दल शारीरिक आकर्षण वाटले होते पण आज जेंव्हा तो तिच्याकडे पाहतो तेंव्हा त्याला ते पूर्वीचे शारीरिक आकर्षण वाटत नाही.. आता तिचाही टवटवीत चेहरा कोमेजला आहे.. त्याच्यात तो पूर्वीचा उत्साहही पाहायला मिळत नाही ती अकाली प्रौढ झल्यासारखी तर दिसतेच त्यात तिच्या चेहऱ्यावर एक अनामिक दुःखाची झलक दिसते… विजयच्या बाबतीत तसे झालेले नाही कारण विजयच्या वाट्याला जे जगणे आलेले आहे ते त्याने स्वतःहून स्वीकारलेले आहे . त्यामुळे तो इतका टवटवीत आणि आनंदी कसा राहू शकतो हा प्रश्न जगाला पडत असतो… अनामिका आणि त्याच्यात काहीतरी एक गूढ रहस्यमय नाते आहे हे विजयला माहित असल्यामुळेच फक्त तो तिच्यात गुंतून पडलेला आहे अन्यथा अनामिकाला विसरनेही त्याच्यासाठी तसे फार अवघड वगैरे आता राहिलेले नाही… विजयला ज्या गोष्टी बदलणे आपल्या हातात नाही त्या गोष्टी बदलण्यासाठी आता कोणतेही प्रयत्न करण्याची त्यासाठी मेहनत करण्याची त्याची अजिबात इच्छा नाही. श्रावण महिना सुरु झाला आणि विजयच्या पायाच्या दुखण्यात अचानक सुधारणा झाली… विजयच्या पावित्र्याला श्रावणासारख्या पवित्र महिन्याची जोड मिळाली असेच विजयला वाटत होते.. विजय आता खऱ्या अर्थाने मानाने, ताणाने आणि विचारानेही पवित्र झालेला आहे कारण आता त्याला कोणाच्याही आनंदात आनंदी होता येते कोणाच्याही दुखत दुःखी होता येते… त्याच्याजवळ त्याने आता असे काहीच जवळ केलेले नाही की जे गमावल्याचे त्याला दुःख व्हावे. सहा महिने विजयचे आर्थिक नुकसान झाले पण त्याला त्याचे काही दुःख नव्हते उलट याही परिस्थितीत ईश्वराने आपल्यावर कोणासमोर हात पसरण्याची वेळ आणली नाही याचा त्याला अधिक आनंद होत होता. विजय ज्या प्रकारचे मानसिक त्रास नसणारे आयुष्य जगत आहे तसे आयुष्य आज जगणे भल्याभल्याना शक्य होत नाही. त्यामुळे कोणावाचून त्याचे काहीही आडत नाही… तो नियतीला त्याच्या बाबतीत तिचा खेळ खेळण्याची पूर्ण संधी देतो… त्यामुळेच तो आनंदी आहे… त्याचा पाय दुखावला त्याचेही त्याने मानसिक दडपण न घेता विचार केला हे होण्यामागेही नियतीची काहीतरी योजना असावी. कोणालातरी त्याच्या चुकीची शिक्षा व्हावी अथवा मिळावी म्हणून नियतीने ही योजना आखलेली असावी किंवा त्याच्याच कोणत्यातरी कर्माची चांगली अथवा वाईट प्रतिक्रिया असावी.. . ते तर आता येणाऱ्या काळात विजयच्या आयुष्यात नियती नक्की काय घडामोडी घडवून आणते यावरून ठरेल…विजयने त्याच्या आयुष्यातील सर्व नाती त्याने त्याच्यापरीने उत्तमरीत्या जपली पण आता विजय त्या नात्यातूनही स्वतःला हळू हळू बाजूला करू पाहतोय.. कारण हे कलियुग आहे. या कलियुगात नात्यातही कळीचा प्रवेश होत असतो.. नात्यातही स्वार्थ जोपासला जातो तो वाढीस लागतो. नात्यात संपत्ती जवळीक आणि दुरावा दोन्ही निर्माण करते म्हणून विजयने संपत्तीचा संग्रह केला नाही आणि नात्यात खर्च केलेल्या संपत्तीचा कधी हिशोबही ठेवला नाही… तो त्याच्या परीने त्याला शक्य तेवढी आता नाती जपतो पण ती अपेक्षा आता तो समोरच्यांकडून करत नाही… त्यामुळे आता कोणीही त्याच्यावर नात्याचा दबाब टाकून त्याला दाबू शकत नाही मग ते नाते कोणते का असेना ! खरं तर विजयच्या आयुष्याचा प्रवास आता एक थोर आध्यात्मिक व्यक्ती होण्याच्या दिशेने सुरु झालेला आहे..
— निलेश बामणे.
Leave a Reply