विजय टी .व्ही. वर मालिका पाहत असताना विजयच्या लक्षात आले की या मालिकातून रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहीणही बहिणीला राखी बंधू शकते आणि बहीणही बहिणीचे रक्षण करू शकते हा विचार पुढे आणण्याचा प्रयत्न होताना दिसला. प्रथमदर्शनी विचार करता राक्षबांधन हा फक्त भावा- बहिणीचा सण आहे पण सध्याची सामाजिक परिस्थिती पाहता आणि विभक्त कुटुंब पद्धती पाहता अशी परिस्थिती निर्माण होऊच शकते ज्या घरात भाऊ नसतील फक्त बहिणी असतील तर त्यांनी ओढून ताणून कोणाला भाऊ करण्यापेक्षा विजयला हे बहिणीने बहिणीला राखी बांधून तिला तिचे रक्षण करण्याचे वचन देणे हा एक उत्तम पायंडा ठरू शकतो असे वाटते. आणि तसेही आज स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत कशातही मागे नाहीत. त्यामुळे त्या त्यांच्या बहिणीचे रक्षण करूच शकतात. यात पुरुषांना कमीपणा वाटण्याचेही काही कारण नाही… आज कित्येक भाऊ राक्षबंधनाला बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देत असले तरी कित्येकदा संकट समयी बहिणीही भावाचे रक्षण करतात की ! विजय आपल्या लहान बहिणीच्या बाबतीत पूर्वीपासूनच खूप हळवा होता… त्याला त्याच्या बहिणीला एक उत्तम भविष्य देऊन तिला तिच्या पायावर उभं करण्याची खूप इच्छा होती पण त्याची ती इच्छा काही पूर्ण झाली नाही कारण कदाचित ते नियतीलाच मेनी नव्हते. नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. विजयच्या बहिणीने वयाच्या अठराव्यावर्षीच प्रेम विवाह केला… खरतर विजयला हे आवडले नव्हते पण तिच्यावरील प्रेमापोटी त्याने ते स्वीकारले पण ! आपण आपल्या बहिणीला उत्तम भविष्य देऊ शकलो नाही याची खंत आजही त्याच्या मनातं आहे.. तसे त्याच्या बहिणीचे फार काही वाईट झाले नाही पण कदाचित तिने विजयचे ऐकले असते तर आज तिला तिच्या आयुष्यात जो संघर्ष करावा लागतोय तो कदाचित करावा लागला नसता. पण ! विजयला आता लक्षात येते आहे आपण तिचे भविष्य बदलण्याचा जो अट्टहास करणार होतो तो खरतर गाढवपणाच ठरणार होता… कारण तिच्या आयुष्यात त्याच घटना घडणार होत्या ज्या नियतीने लिहून ठेवल्या होत्या.
विजयच्या पत्रिकेत दोन भाऊ आणि एक बहिणीचा योग होता. त्यामुळेच त्याच्या बहिणीचा जन्म झालेला होता. कोणाच्या मनात काही विचार वगैरे येणे हा सर्व नियतीचाच खेळ असतो. त्यामुळे आता विजयला तिच्या भविष्याची चिंता वाटत नाही आणि तिच्या वाट्याला आलेला संघर्ष हे तिचे प्रारब्धच आहे म्हणून विजयने स्वीकारले आहे. विजयच्या बहिणीने लग्नानंतर एका वर्षात एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर दहा वर्षाने तिला मुलगी हवी असतानाही मुलाचा जन्म झाला. ती दोन्ही मुले जवळ – जवळ लहानाची मोठी विजयच्याच घरात होत होती. विजयच्या लहान बहिणीच्या लग्नातच विजयने पहिल्यांदा अनामिकाला पहिले होते आणि त्याच्या मानत विचार आला होता.. ही जर वयाने जरा मोठी असत तर मी हिच्याशी विवाह केला असता. इतका तो तिच्या सौंदर्याच्या प्रेमात पडला होता. त्याला त्याच्या स्वप्नातील परीसारखी त्यावेळी अनामिका दिसत होती. पण ! अनामिकेचा त्याच्या आयुष्यात प्रेवेश होताच त्याच्या आयुष्यातील त्याच्यावर प्रेम करणारी प्रत्येक तरुणी त्याच्या आयुष्यातून आश्चर्यकारक रित्या वजा होऊ लागली. तोपर्यतच्या त्याच्या आयुष्यात असंख्य सुंदर तरुणी होत्या. त्यावेळचा त्याचा चेहरा आणि शरीरयष्टी पाहूनच तरुणी त्याच्या प्रेमात पडायच्या भरलेले छाती, पोट सपाट ,लांब केस, सडपातल बांधा , डोळ्यात प्रचंड आत्मविश्वास आणि स्त्रियांबद्द्दल त्यांच्या सौंदर्याबद्दल अजिबात हपापलेपणा नाही. त्यावेळी विजय नेहमी उगडा राहत असे. त्याच्या त्या उगड्या देहाला किती जणींची नजर लागली असेल देवच जाणे… अनामिकालाही त्याच्या ह्या रूपाचे आकर्षण असावे कदाचित ! पण त्यापेक्षाही तिला त्याच्यातील गुणांचे आकर्षण आणि कौतुकही होते. विजयची प्रचंड बुद्धिमत्ता हेच एकमेव कारण होते अनामिका विजयच्या प्रेमात न पडायला. काही वर्षांपूर्वी जेंव्हा अनामिका विजयच्या काही महिन्यांसाठी प्रत्यक्षात संपर्कात आली तेव्हा विजयची तिच्याशी आणि तिची विजयशी मोकळेपणाने बोलण्याची काही हिंमत झाली नाही. विजयला आपल्या ज्या सौंदर्यामुळे अनामिका आपल्या प्रेमात पडेल याची खात्री होती ते सौंदर्यच नियतीने अनामिक त्याच्या आयुष्यात येताच हिरावून घेतले.. . त्यामुळे विजयला नेहमीच प्रश्न पडतो की अनामिका त्याच्या आयुष्यतील शाप आहे की वरदान ? अनामिका विजयच्या आयुष्यात आल्यानंतर एकही तरुणी त्याच्या आयुष्यात आली नाही , तो त्यानंतर कोणाच्या प्रेमातही पडला नाही, उलट देहिक सुखापासून तो दिवसेन दिवस दूर जाऊ लागला. कधी कधी विजयला वाटते मला या भौतिक भोगाच्या मोहातून मुक्त करण्यासाठी तर अनामिका माझ्या आयुष्यात आली नाही ना ? विजयच्या उगड्या शरीरावर अनामिकेची नजर पडल्यानंतर दुसऱ्या कोणाची नजर त्याच्या उगड्या शरीरावर पडू शकली नाही कारण त्यानंतर डागाळलेली शरीर विजय लपवून ठेवण्यासाठी अट्टहास करू लागला. अगदी त्यानंतर त्यावर अनामिकाचीही नजर त्यावर पडू नये असेच त्याला वाटत असे… त्यामुळे हळू हळू अनामिकाही त्याच्यापासून दूर गेली मानाने आणि शरीरानेही… आता अनामिका आणि त्याच्यात काहीच संपर्क नाही … पोहचतात त्या फक्त एकमेकांजवळ एकमेकांच्या बातम्या…विजय आणि इ अनामिका दोघेही त्यांच्या आयुष्यात सुखी नव्हते. कधी कधी विजयला प्रश्न पडतो जशी ती माझ्या आयुष्यात आल्यावर माझ्या आयुष्याची वाट लागली तशी मी तिच्या आयुष्यात आल्यामुळे तिच्या आयुष्याची तर वाट लागली नसेल ना ? कारण अनामिकाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनाही फार आनंददायक नाही आहेत. नियती आमच्या दोघाच्याही आयुष्यात काही बरे का होऊ देत नाही… आम्हाला जर एकत्र आणणे नियतीच्या मनात असेल तर त्यासाठी इतका विलंब का होत असावा ? खूप विचार केल्यानंतर विजयच्या मनात आता असा विचार येऊ लागला आहे की माझ्या भौतिक आयुष्याची तर आता वाट लागलेलीच आहे. एकाकी आयुष्य जगणे तर मी आता जवळ जवळ स्वीकारले आहे .. आणि भविष्यात मला माझ्या आयुष्यात कोणत्या दिशेने प्रवास करायचा आहे हे ही ठरलेले आहे. त्यामुळे त्याच्या वाट्याला आलेले दुःख वेदना अनामिकाचा वाट्याला येऊ नये असेच आता विजयला मनापासून वाटू लागले होते.. म्हणजे थोडक्यात त्याने आता अनामिकेला विसरण्याचा निर्णय घेतलेला होता.
अनामिका त्याच्या आयुष्यात यावी म्हणून तो आता आता काहीही प्रयत्न करणार नव्हता. त्याने आता त्याच्या नियती समोर शेवटी गुडघे टेकले होते. अनामिकेच्या प्रेमात त्याने त्याच्या आयुष्यातील सहा – सात वर्षे वाया घालविली होती. पण तो तिच्या प्रेमात पडलेल्याला आता पंधरा वर्षे होऊन गेली होती. या पंधरा वर्षात दोघांच्याही आयुष्यात काही खास असे घडलेच नाही ज्यातून त्यांना आनंद मिळेल. नाही म्हणायला इतरांच्या आनंदात त्या दोघानीही आनंद मिळविला… आपल्याला नाही तर नाही निदान अनामिकाला तरी तिच्या आयुष्यात आनंद मिळायला हवा ! असे आता विजयला मनापासून वाटू लागले होते…मागील कित्येक वर्षांपासून तिच्या आयुष्यात आनंद येता येता माघारी फिरतो… का फिरतो हे जगासाठी एक कोडे असले तरी विजयासाठी ते तसे नाही कारण विजयने तिची जन्मकुंडली पाहिलेली आहे… तिच्या जन्मकुंडली प्रमाणे ती दिसायला सुंदर असली तरी तिचे शरीर अनेक व्याधींनी ग्रस्त आहे… तिच्यात कामुकता अजिबात नाही. भविष्यात तिला संततीच्या बाबतीतही समस्यांचा सामना करावा लागणार होता. वैवाहिक सौख्याचा विचार करता ते फार उत्तम दिसत नव्हते. तिचा विवाह होण्यात अनेक अडचणी येणार होत्या. तिच्या जन्मपत्रिकेत अनेक दोष होते पण ते दोष विजयच्या दृष्टीने मात्र नगण्य होते…एकूणच विवाह अनामिकासाठी फार लाभदायक ठरणार नव्हता. तसा तो विजयसाठीही ठरणार नव्हता म्हणूनच विजय समदुःखी असणाऱ्या अनामिकाचा प्रेमात पडला होता… नियतीने त्या दोघांच्या कुंडलीत बऱ्याच बाबतीत साम्य निर्माण करून ठेवलेले होते.. अनामिका आणि विजयच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनात बऱ्याच प्रमाणात साम्य होते… काही महिन्यांपूर्वी विजयने समांतर ही वेबसिरीज पाहिल्यावर विजयला खरे तर हसू आले होते. पण विजयच्या हे ही लक्षात आले की अनामिका आणि त्याच्या चेहऱ्यावरील काही खुणाही सारख्याच आहेत… त्या कदाचित त्यांची लग्न रास एक आहे म्हणूनही असतील… पण ते नक्की सांगता येत नाही. त्या दोघांचाही जन्म राहूच्या महादशेत झालेला आहे… विजय आणि अनामिकाचा पुनर्जन्म झालेला आहे… अशी विजयला खात्री वाटते… पण कधी कधी त्याच्या मनात त्या बाबतीत शंकाही निर्माण होते…
— निलेश बामणे.
Leave a Reply