एक सैनिक ही बापचं असतो
जरी तो घरापासून दूरवर असतो,
तुझ्या जन्माचा आनंद ही घेता आला नाही
बाप म्हणून गावभर मिरवता ही आले नाही,
तुझ्या आठवणीत उश्या खाली रडतो
या सैनिकांचं मन कोण भला जाणतो,
घरी आल्यावर ओळखशील का ग मला..
बाबा बाबा हाक मारशील ना ग मला..
ना बाहुली ना खेळणी आणली मी तुला
आल्यानंतर माफ करशील ना ग मला…
कुशीत घेण्याचा मोह आता आवरेना
भेटण्याची आतुरता कधी संपेल कळेना….
सुट्टीच्या प्रतीक्षेत दिवस ही सरेना
घरच्या ओढीने माझं मन ही रमेना..
एक सैनिक ही बापचं असतो
जरी तो घरापासून दूरवर असतो…
— सौ. शिल्पा पवन हाके
Very nice poet di