नवीन लेखन...

एक था गुल और एक थी

१९६० सालातील गोष्ट आहे, मोठ्या भावानं धाकट्या भावाला चित्रपटाच्या दिग्दर्शनाची पहिली संधी दिली चित्रपट होता, ‘छलिया’! या चित्रपटात बेबी नंदानं छोटीशी भूमिका केली होती त्यानंतरच्या ‘ब्लफ मास्टर’ ने उत्तम यश प्राप्त केले. मग आला ‘बदतमीज’ व ‘किस्मत’ त्याची खरी ‘किस्मत’ उघडली ती राजेश खन्नाच्या ‘सच्चा झुठा’ पासून!
‘मेरी प्यारी बहनिया, बनेगी दुल्हनियाँ’ हे गाणं त्या काळात तमाम बॅण्डवाले वाजवायचेच त्यानंतर ‘रामपूर का लक्ष्मण’, ‘भाई हो तो ऐसा’ व ‘आ गले लग जा’ चित्रपट प्रदर्शित झाले.
राजेश खन्नाच्या ‘रोटी’ने सर्वत्र रौप्यमहोत्सव साजरे केले. त्याच दरम्यान त्याला एक सहा फुटी लंबू भेटला व ‘परवरिश’ चित्रपटाची निर्मिती झाली या लंबूशी त्याची ‘केमिस्ट्री’ जुळली व पुढील त्याचे सलग आठ चित्रपट, सुपरहिट झाले.
तो निर्माता-दिग्दर्शक म्हणजेच, ‘लाॅस्ट ॲ‍ण्ड फाऊंड’ स्टोरीचा हुकमी किमयागार मनमोहन देसाई!! २६ फेब्रुवारी १९३७ साली मनमोहन यांचा जन्म मुंबईत झाला. वडील व मोठा भाऊ याच व्यवसायात होते त्यामुळे यांचेही मन, तिकडेच वळले
‘अमर, अकबर ॲ‍न्थोनी’ ने सुपर डुपर हिट यश मिळविले. मुंबईतील २५ चित्रपटगृहात या चित्रपटाने एकाच वेळी रौप्यमहोत्सव साजरे केले. आजही हा चित्रपट पहाताना प्रेक्षक, ‘डोकं’ बाजूला ठेवून मनसोक्त एंजॉय करतात हीच मनमोहन यांची ‘खासियत’ होती!
‘सुहाग’, ‘नसीब’, ‘देशप्रेमी’ या चित्रपटांनी बच्चनला सुपरस्टार केलं नंतर आला ‘कुली’ जणू अमिताभ बच्चनचा ‘पुनर्जन्मच’ यातीलच फाईटींगच्या चित्रीकरण प्रसंगी अमिताभ, गंभीर जखमी झाला व यमराजाचे दार ठोठावून परत आला.
त्यानंतर त्यांनी ‘मर्द’ व ‘गंगा जमुना सरस्वती’ यांची निर्मिती केली. एव्हाना प्रेक्षक पूर्वीचा राहिला नव्हता, साहजिकच हवं तसं यश काही मिळालं नाही.
मनमोहन यांच्या मुलानं, वडिलांना घेवून ‘तुफान’ची निर्मिती केली मात्र हवामानानं हवी तशी, साथ दिली नाही जेव्हा वीस चित्रपटांपैकी तेरा चित्रपटांना अभूतपूर्व यश मिळतं आणि कालांतराने ओळीनं अपयश मिळू लागल्यावर, नैराश्य येणं स्वाभाविकच ठरतं.
१९९३ साली ‘अनमोल’ चित्रपटाची निर्मिती करुन मनमोहन यांनी काम थांबवलं ही झाली त्याची, एक निर्माता-दिग्दर्शक म्हणून चित्रपटांची कारकिर्द एक माणूस म्हणून त्यांचं योग्य वेळी लग्नही झालं होतं त्याची पत्नी, जीवनप्रभा ‘सुहाग’ चित्रपटाच्या निर्मिती दरम्यान १९७९ साली मनमोहनची साथ सोडून, परलोकी निघून गेली.
त्या परिस्थितीतही मनमोहन यांनी चित्रपट निर्मितीत स्वतःला गुंतवून ठेवले दिवस तर कामात निघून जायचा, पण रात्री त्याला एकाकी वाटायचं भूतकाळात डोकावताना त्याच्या मनात नंदाबद्दलचे, विचार यायचे साधारण त्यांच्याच वयाच्या नंदाबद्दल त्यांना एकतर्फी प्रेम वाटू लागलं होतं मात्र तिला प्रत्यक्ष भेटून बोलण्याचे धाडस काही झालं नाही.
अखेर १९९२ साली मनमोहन यांनी आपल्या मनातील भावना नंदा समोर व्यक्त केल्या नंदाने होकारही दिला लग्न करायचं नक्की केलेलं असताना नंदाच्या आईचं निधन झालं मनमोहन यांनी काही महिने थांबायचं, असं ठरवलं.
१९९४ साली मनमोहन यांचे बाल्कनीत बसलेले असताना खाली पडून अपघाती निधन झाले. त्यांच्या या मृत्यूचे ‘रहस्य’ शेवटपर्यंत उलगडलेच नाही.
नंदाची घोर निराशा झाली. एकतर इतक्या वर्षांनी तिचा एकटेपणा संपणार होता जीवनातील शेवटचा काळ, सुखावह होणार होता पण नियतीने, हे सुख निर्दयीपणे हिरावून घेतले.
पुढे तिनं एकाकीपणात वीस वर्षे घालवली २०१४ साली हे जग सोडून ती, मनमोहनकडे निघून गेली
‘जब जब फुल खिले’ या चित्रपटातील ‘एक था गुल और एक थी बुलबुल’ या गाण्याप्रमाणे त्यांची प्रेमकहाणी, भूलोकी नाही तर स्वर्गलोकी ‘सफल’ झाली.
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२६-२-२२.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 407 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..