नवीन लेखन...

एक उनाड दिवस – भाग २

गाडीच्या अचानक थांबण्याने दोघांना झोराचा धक्का बसला. डोळे मिटून गाणी ऐकण्यात मग्न मानसी किंचाळली जोरात. अमितच्या मानेला झोरात हिसका बसला. गाडी जागच्या जागी थांबली. काय होतंय पाहायला दोघेही गाडीतून खाली उतरले. गाडीच्या बॉनेट मधून धूर येत होता. गाडीचं इंजिन खूप तापलं होतं बहुदा. पाणी संपलं होतं गाडीतलं.
अमित दुखरी मान वळवू शकत नव्हता. थोडी तिरकी मान करूनच त्याने गाडीचं बॉनेट उघडलं आणि मानसीला डिक्कीतून पाण्याचा कॅन आणायला सांगितला. मानसी धावतच कॅन आणायला निघाली आणि दोन पावलं गेल्यावर बिचकली. काहीतरी विसरल्यासाखी जीभ चावून ओशाळलेल्या नजरेनं अमितकडे पाहू लागली.
अमितला हे समजायला वेळ लागला नाही, की काहीतरी गडबड आहे ” not again मनु , don’t tell me की कॅन नाही आहे गाडीत ” अमित म्हणाला.
“नाहीच आहे, मीच काढून ठेवला होता, परत ठेवायचा विसरले बहुतेक” मानसी पुटपुटली.
“काय ??????” गाडीच्या इंजिन पेक्षा आता अमितच जास्त तापलेला.
दुखणारी थोडी तिरकी मान सावरत तो मानसीला ओरडला.
” एक तर काही प्लॅनिंग नाही, तरीही मी तयार झालो ,आणि इतका वेंधळेपणा , अगं निघतानाच मॅप पहिला होता मी, आता पुढे अजून अर्ध्यातासांनी घाट सुरु होईल , आजूबाजूला गॅरेज काय साधी वस्ती पण नाही , बघतीयेस ना इकडे माणसांची वर्दळ पण नाही, काय करायचं आता. .. ? ” अमित बोलत होता. बोलत कसला ओरडतच होता मानसीला. ” नेहमीच झालंय तुझं मनू, किती निष्काळजीपणा, निदान पाणी टाकून तरी गाडी चालू होतीये का ते पाहिलं असतं ”

जवळजवळ अर्धा तास दोघांनी इंजिन थंड होण्याची वाट पहिली. परत परत गाडी चालू करण्याचा प्रयत्न केला. गाडी सुरु होत नव्हती. मानसी गाडीच्या बाहेर उभी होती. नजर जाईल तिथं पर्यंत शेतं, झाडं, मस्त निसर्ग होता.

“Wow so nice” मानसीचे शब्द ऐकून अमित गाडीतून बाहेर आला.
“ए ते बघ किती सुंदर पक्षी आहे. कॅमेरा आण ना फोटो काढायला.” अमित तिथेच मानसीकडे रागाने पाहत उभा होता.
” अरे आण ना उडून जाईल ” मानसी म्हणाली.

“अगं बाई! कुठल्या अडचणीत अडकलोत आपण आणि तुला काय सुचतंय . काही गांभीर्य आहे का परिस्थितीचं, मी सगळ्या मित्रांना फोन केले , कोणी उचला नाही आणि कोणाच्या फोनला रेंज नाही, एकाशीही पण संपर्क नाही. मी ग्रुप वर मेसेज पाठवलाय. पाहू काही रिप्लाय येतोय का. त्यात इथे नेटवर्क पण अपुरे आहे. काय करायचं ” अमित वैतागून बोलत होता.

“अरे तू आधी कॅमेरा आण रे. उडून जाईल पक्षी” मानसीने त्याला पुन्हा सांगितलं.
अमितने कॅमेरा आणून तिच्या हातात आपटला. छान क्लिक्स काढून झाल्यावर मानसी म्हणाली
” हे बघ अमु , I am sorry रे, पण म्हणून दिवस खराब करायचं का , किती छान वातावरण आहे. निसर्ग किती छान आणि….. हाय बस तुम और हम … का वैतागतोय. शांतपणे विचार करू काय करायचं ते . अमित पुन्हा गाडी सुरू करायचा प्रयत्न करायला गेला.

“अमिssssssत ” मानसी पुन्हा जोरात किंचाळली.
“काय झालं आता ?” अमित वळणार इतक्यात मानेत जोरात काळ अली त्याच्या. तो पूर्ण वळून उभा राहिला आणि तिरक्या मानेने तिच्याकडे पाहू लागला.
” हे बघ माझ्या फोन मध्ये नेटवर्क आलंय, इथून तीन किलोमीटर वर एक गाव आहे. मी लोकेशन सेव केलय जाऊया का?चालत? . काही मदत मिळेल कदाचित”
इतका वेळ प्रयत्न करून गाडी चालू होत नव्हती. त्यात कोणत्याच मित्राचा फोन लागत नव्हता.अर्ध्या तासात फक्त दोन गाड्या गेल्या त्या वाटेवरून. तिकडे जाण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता.
तशाच तिरक्या मानेन अमितने पाठीवर सॅक घेतली आणि मानसीने आपली बॅग घेतली आणि चालू पडले दोघे.
दोन्ही बाजूला सुंदर झाडी. साधारण सडे नऊ -दहा वाजले होते . झाडांच्या आणि ढगांच्या मधून , ऊन नुकतंच वाकुल्या दाखवत होत,. वारा भलताच रोमँटिक झाला होता. मानसीला खूप गंमत वाटत होती. कुणाचा फोन नाही , मेसेज नाही. शांत वाटत होतं.
अमित मात्र सगळं प्लॅनिंग गडबडल म्हणू अजूनच वैतागत होता.

‘गजब का है दिन देखो जरा
ये दिवाना पन सोचो जरा
तुम हो अकेले हम भी अकेले
मजा आ राहा है
कसम से ‘
मानसी जोर जोरात गाणं म्हणत एखाद्या फुलपाखरासारखी बागडत होती. अमितच्या दोन पावले पुढेच चालत होती ती.

“ए माझी जुही चावला अगं उजवीकडे जायचं आहे. तिकडे कुठे?
अमितने पण मिश्किलपणे तिचा हात धरून आपल्याकडे खेचलं तिला आणि आता अमित पण थोडा मूड मध्ये येतोय हे पाहून मानसीही त्याचा हात धरून चालू लागली.

तीन किलोमीटर थोडंच अंतर आहे, लगेच पोहचू असं दोघांनाही वाटलं.
पण शेतातून, काट्याकुट्यातून’ कच्या रस्त्यावरून, चालतांना चांगलीच कसरत होत होती दोघांची.
चालून दोघे थोडे थकले होते. थोडी भूक लागली होती . अमितने आपल्या सॅक मधून एक केळ आणि एक सफरचंद काढलं. आता ते खात खात दोघे चालू लागले..

इतकया ‘धाssप! ‘ असा जोरात आवाज आला.

एक भल्ल मोठ वानर त्याच्या समोर येऊन बसलं. दोघेही खूप दचकले. फिल्मी मानसीने लगेच हात जोडून हनुमान स्तोत्र म्हणालाय सुरवात केली आणि आपल्या हातातल केळ त्या वानरासमोर टाकलं. ते घेऊन ते निघून गेलं. आता अमित आणि मानसीच्या पायानी वेग घेतला पण कोणीतरी आपला पाठलाग करतंय ते त्यांच्या लक्षात आलं … एका वनराला केळ मिळालं म्हणून दहा-बारा वानरांची टोळीच मानसी आणि अमितला गराडा घालून उभी होती….

क्रमशः

मधुरंग

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 373 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..