एक झाड
सारखं माझ्या स्वप्नांत येत राहतं
अक्षरांनी लगडलेलं
मी वेचतो,मी तोडतो
मी जमवतो खुप अक्षरे
आणि
बनवतो निरनिराळे शब्द त्यांचेपासून
माळेसारखी ओवून
वाचकासाठी ठेवतो
काही माझ्यासाठीही…..
श्रीकांत बापुराव पेटकर हे कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत आहेत. त्यांना लेखनाची आवड असून त्यांची 'आणि मी बौद्ध झालो' या अनुवादित पुस्तकासोबत कल्याण, शांबरीका खरोलिका, बेहोशीतच जगणं असतं,कविता मनातल्या , चांगुलपणा अवती भवती अशी एकूण आठ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.इंद्रधनुष्य हा कथासंग्रह .
पेटकर यांनी सामाजिक जाणिवेतून माहिती अधिकाराचा वापर, नागरिकांना वीज बचतीचे महत्त्व पटवून देणे, परिसरातील विधायक काम करणा-या व्यक्तींना प्रकाशात आणणे असे विविध पातळ्यांवर प्रयत्न केले आहेत. पेटकरांनी चित्रकलेचा छंद जोपासला असून त्यांच्या चित्रांची आतापर्यंत दोन प्रदर्शन आयोजित करण्यात आली आहेत.
Leave a Reply