कासवांचे पृथ्वीतलावर २२ कोटी वर्षांपासून वास्तव्य आहे. म्हणजे कासव हे सरडे, साप किंवा मगरी या प्राण्यांपेक्षा पुरातन प्राणी आहे. जगातले सर्वात मोठे कासव २०० सेंटीमीटर म्हणजे साडेसहा फूट आणि ९०० किलो वजनाचे आहे. २०११ सालच्या अहवालानुसार कासवांच्या जगातल्या पंचवीस वंशजाती लवकरच नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत तर त्याच्यानंतर आणखी ४० वंशजातींना पण धोका आहे. वादळी सागरात ही कासवे बिनधास्तपणे राहू शकतात. ती महासागराच्या चार हजार फूटाच्या खोलीचा तळ गाठू शकतात व तेथे दीड तासाच्यावर आरामात राहू शकतात. मात्र अंडी घालण्यासाठी मादी किनाऱ्यावर येते व एका बिळात ऐंशी अंडी घालते. पिले मोठी झाल्यावर ती आठ फूट लांबीच्या आकाराची होऊ शकतात त्यावेळी त्यांचे वजन असते नऊशे किलोग्रम. या पार्श्र्वभूमीवर झांझीबार जवळच्या एका बेटावरची कासव-कहाणी मोठी उद्बोधक आहे. त्यातलेच आता मोठे झालेले एक अजस्त्र कासव आहे, १८५ वर्षाचे आणि ३०० पौंड वजनाचे. कल्पना करा, हे बलाढ्य कासव एके दिवशी अचानक मनुष्यवाणीत बोलायले लागले तर..?
– अरुण मोकाशी
परिवहन तज्ज्ञ अरुण मोकाशी यांच्या झांझिबार डायरी या इ-पुस्तकातील लेखाचा हा अंश.
हा संपूर्ण लेख तसेच त्यांचे या पुस्तकातील सर्व २५ लेख वाचण्यासाठी हे पुस्तक खरेदी करा.
हे इ-पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…
https://marathibooks.com/books/zanzibar-diary/
किंमत : रु.२००/
सवलत किंमत : रु.५०/-
Leave a Reply