डेव्हिड हा केवळ पत्रकारच नव्हता. तो वृत्तपत्र कर्मचारी संघटनेचा अध्यक्षही होता. निदर्शक दडपशाही विरोध-कृती मोहिम ठरविण्यासाठी दारेसालाम या राजधानीपासून पाचशे किलोमीटर वर असलेल्या या खेड्यात जमले होते. सभेचा अगोदर बराच गाजावाजा झाल्याने पोलिसांचा भरभक्कम चमू सभेच्या जागी तैनात झाला होता. अचानक निदर्शक व पोलिसांच्यात संघर्ष उडाला व झटापटीत डेव्हिड ठार झाला. प्रत्येक पत्रकार खुनामुळे लोकशाही संवर्धक व्यक्ती जगातून नष्ट होत असते याचे इथे भान ठेवले पाहिजे.
२०१२ सालच्या सहा महिन्यात जगातल्या ४७ गुन्ह्यांतला फक्त एक अपराधी सापडला.वास्तविक ही दुर्मिळ घटना आहे असे मानण्याचे कारण नाही. जगभरच्या गेल्या दहा वर्षातल्या पत्रकारांच्या खुनातल्या नव्वद टक्के प्रकरणातले अपराधी सापडलेच नाही. मुंबईच्या ज्योतिर्मय डे या छप्पन वर्षाच्या जिगरबाज पत्रकाराचे २०११ सालच्या हत्येचे प्रकरण अद्याप कुठे संपले?
– अरुण मोकाशी
परिवहन तज्ज्ञ अरुण मोकाशी यांच्या झांझिबार डायरी या इ-पुस्तकातील लेखाचा हा अंश.
हा संपूर्ण लेख तसेच त्यांचे या पुस्तकातील सर्व २५ लेख वाचण्यासाठी हे पुस्तक खरेदी करा.
हे इ-पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…
https://marathibooks.com/books/zanzibar-diary/
किंमत : रु.२००/
सवलत किंमत : रु.५०/-
Leave a Reply