एकदा कवेत घे,
संपवून सारा अबोला,
जीव तुझ्यासाठी राजा,
बघ, कसानुसा झाला,–!!!
स्पर्श तुझा होता सखयां,
सर्व दु:खे नमून जातील,
अडचणींचे डोंगर सारे,
क्षणार्धात ते वितळतील,
बाहूंत तुझ्या वेड्या जिवां,
कधी मिळेल रे आसरां,–!!!!
ओढ वाटे सारखीच,
छळते मज रात्रंदिवसा,
तू येतां, जवळी परंतू,
मिठीत घेते आभाळां,–!!!
प्रितीच्या रंगी रंगता,
तुझ्याच रंगात रंगते,
होऊन वेडिपिशी कशी,
हात नकळत देते हातां,–!!!
माझी मी नसते,
तुझ्याबरोबरी असतां,
भानही हरपून जाते,
तव समीप राहतां,–!!!
रंगतदार तुझी साथ,
मोह तिचा माझ्या जिवां,
परोपरीने वाट पाहते,
उन्हात थंडगार विसावा,–!!!!
हिमगौरी कर्वे
Leave a Reply