|| हरी ॐ ||
बसलो होतो एक दिवस
नदीत पाय सोडून झाडा खाली,
भन्नाट कल्पनांच्या राज्यात
आठवणींचे गाठोडे सोडून !
नदी खळखळत होती
मोठ्याने आवाज करीत होती
काहीतरी सांगण्याच्या प्रयत्न होता
फेसाळणाऱ्या बुडबुड्यातून व्यक्त होत होता !
मंद झुळकेसरशी येत होता सुगंध,
वर पहिले तर मुग्ध होऊन नाचत होता,
डोलत होता निशिगंध !
वाऱ्याच्या झुळके सरशी करीत होता मनमुग्ध,
वाटत होते बसावे येथेच निशिगंधाखाली,
वाट बघत निशिमुग्धगंधाची !
एकदा तरी येईल हाक मुग्धाची
आठवणींच्या गाठोड्यातून
मला कवेत घेण्यासाठी,
क्षितिजा पलीकडून !
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply