एकदा तुझी नी माझी भेट व्हावी
व्यक्त भावनांची वेल सजावी
एकदा तुझी नी माझी भेट व्हावी
डोळ्यांतल्या अश्रूंची मोट तुला कळावी
एकदा तुझी नी माझी भेट व्हावी
निःशब्द साथ हळुवार वीण उलगडावी
एकदा तुझी नी माझी भेट व्हावी
मनातल्या खुणांची एकजूट व्हावी
एकदा तुझी नी माझी भेट व्हावी
अलगद मोहर तुझी अंतरी फुलावी
एकदा तुझी नी माझी भेट व्हावी
स्पर्श मधुर तुझा मी मोहक मोहरावी
एकदा तुझी नी माझी भेट व्हावी
आरक्त अंतरात तुझी आस बहरावी
एकदा तुझी नी माझी भेट व्हावी
व्याकुळ लोचनात तुझी सय साठावी
एकदा तुझी नी माझी भेट व्हावी
अलवार तुझ्या मिठीत मी धुंद व्हावी
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply