नवीन लेखन...

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शिवसेनेचे नेते व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सर्वात जास्त चर्चेत आहे.एकनाथ शिंदे हे नाव जून २०२२ मध्ये झालेल्या राजकीय भूकंपाने महाराष्ट्रातच नव्हे तर देशात पोहोचलं. शिवसेनेत सर्वोच्च स्थानी मानल्या जाणाऱ्या मातोश्री आणि ठाकरे घराण्यालाच एकनाथ शिंदेंनी आव्हान दिलं. ४० आमदारांना सोबत घेऊन बंडाचं निशाण फडकावलं आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचलं. त्यामुळे एकनाथ शिंदे एका रात्रीत देशात पोहोचले व ४० आमदारांसह महाविकास आघाडीतून बाहेर पडत त्यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले.

एकनाथ शिंदे हे जुन्या शिवसेनेतील मातब्बर नेत्यांपैकी एक.  २०१९ मध्ये राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरु असताना शिवसेनेकडून एकनाथ शिंदे हेच नाव सगळ्यात हॉट फेव्हरिट मानले जात होते. परंतु, ऐनवेळी मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्याचा निर्णय झाला आणि एकनाथ शिंदे या स्पर्धेतून बाहेर पडले.

साताऱ्यातील महाबळेश्वर तालुक्यातील दरे हे एकनाथ शिंदे यांचं गाव. एकनाथ शिंदे यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ रोजी झाला. ते शिक्षणासाठी ठाण्यात आले. गरीबीमुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावं लागलं होतं. त्यानंतर त्यांनी एका मासळी विकणाऱ्या कंपनीत सुपरवाझर म्हणून काम केलं. पण त्यातून मिळकत होत नव्हती. म्हणून शिंदे यांनी रिक्षा चालवण्यास सुरुवात केली. याचवेळी ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाण्यातील शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांच्या संपर्कात आले. तेव्हा त्यांचं वय होतं १८ वर्ष. वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी त्यांनी शिवसेनेतून राजकीय श्रीगणेशा केला. शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात सहभाग घेतला. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा आंदोलनात त्यांनी पोलिसांचा लाठीमारही खाल्ला. मितभाषी, संयमी, पण आंदोलनात आक्रमक असलेल्या एकनाथ शिंदेंवर आनंद दिघेंची कृपा झाली आणि शिंदे ठाण्यातील किसन नगरचे शाखाप्रमुख झाले.

शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात फ्रंटवर असलेल्या एकनाथ शिंदेंना १९९७ हे वर्ष अत्यंत लकी ठरलं.१९९७ मध्ये त्यांना आनंद दिघे व शिवसेनेने ठाणे महापालिका निवडणुकीचं तिकीट दिलं. या निवडणुकीत शिंदे घवघवीत मतांनी विजयी झाले. त्यानंतर ते ठाणे महापालिकेचे सभागृह नेतेही झाले. सभागृह नेते म्हणून पालिका गाजवल्यानंतर २००४ मध्ये त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. पहिल्याच विधानसभा निवडणुकीत ते निवडून आले.२००४ पासून सलग चार वेळा ते कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून आमदारपदी निवडून आलेले आहेत. त्यानंतर २०१४ मध्ये शिवसेना विरोधी पक्षात बसणार होती. तेव्हा १२ दिवसांसाठी ते गटनेते झाले होते. त्यानंतर शिवसेना सत्तेत गेल्यानंतर ते मंत्रीही झाले. शिंदे यांनी या आधी २०१५ ते २०१९ पर्यंत सार्वजनिक बांधकाम या खात्याचे मंत्री म्हणून काम पाहिले.२०१९ मध्ये ते कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले. सध्या ते ठाकरे सरकारमध्ये नगरविकास मंत्री आहेत.नम्र, मितभाषी, कडवट शिवसैनिक, जोडतोडीच्या राजकारणाचं कौशल्य या एकनाथ शिंदेंच्या जमेच्या बाजू आहेत. २०१४ च्या मोदी लाटेतही शिंदेंनी ठाण्यात शिवसेनेची पडझड होऊ दिली नाही. कार्यकर्त्यांचं गाऱ्हाणं ऐकून घेण्याची क्षमता आणि ‘मास बेस’ असलेला नेता म्हणून शिंदेची ओळख आहे. आनंद दिघेंनंतर ठाण्यात शिवसेना टिकवण्यामागे शिंदेंचं योगदान मोठं आहे. ठाणे पालिका, जिल्हापरिषदा, अंबरनाथ नगरपरिषद, कल्याण-डोंबिवली पालिका, बदलापूर नगरपरिषदेपासून ते नाशिकपर्यंत शिंदे यांनी शिवसेनेचं जाळं विणलं आहे. ठाण्यापासून नाशिकपर्यंत शिंदेंचा शब्द प्रमाण मानला जातो.

एकनाथ शिंदे यांना गरीबीमुळे शिक्षण अर्धवट सोडावं लागलं होतं. केवळ इयत्ता दहावीपर्यंतच ते शिकले. त्याचं शल्य त्यांना नेहमीच बोचत होतं. त्यामुळे त्यांनी वयाच्या ५६ व्या वर्षी पदवी परीक्षा पास होऊन शिक्षणाला वयाची अट नसते हे दाखवून दिले आहे. शिंदे यांनी पदवी परीक्षेत ७७.२५ टक्के गुण घेऊन घवघवीत यश मिळविले आहे. ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयातून त्यांनी पदवी परीक्षा दिली आहे. वयाच्या ५६ व्या वर्षी पदवीधर होणारे ते राज्यातील बहुदा पहिलेच मंत्री असण्याची शक्यता आहे. अर्धवट शिक्षण पूर्ण करून त्यांनी एक प्रकारचं अपूर्ण रिंगण पूर्ण केलं आहे. त्यांचं शिक्षण कमी झालं असलं तरी त्यांनी त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांना डॉक्टर बनवलं. श्रीकांत शिंदे हे कल्याण  मतदारसंघातील खासदारही आहेत.

संकलन – संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..