भारतीयनिवडणूकआयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील एक स्वायत्त घटनात्मक संस्था आहे. निवडणुक आयोगाला भारतीय संविधानाच्या चार स्तंभांपैकी एक मानले जाते.
भारतातील निवडणुकींसाठी निवडणूक आयोग सर्वस्वी जबाबदार आहे. निवडणूक आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपती नेमतील इतके अन्य निवडणूक आयुक्त यांच्यासह एक निवडणूक आयोग बनतो. ऑक्टोबर १९९३ पासून दोन निवडणूक आयुक्त नेमण्याची प्रथा पडली. तसेच एका अद्यादेशाद्वारे त्यांना मुख्य निवडणूक आयुक्त सारखाच दर्जा व स्थान देण्यात आले. मुख्य निवडणूक आयुक्तांना पार पाडण्याचे कर्तव्य लक्षात घेऊन सामाजिक प्रतिष्ठा, कायद्याचे ज्ञान आणि समृद्ध असा प्रशासकीय अनुभव असलेल्या व्यक्तीची नेमणूक राष्ट्रपती या पदावर करतात. भारतात निवडणूक आयोगाची स्थापना २५ जानेवारी १९५० रोजी झाली.
भारताच्या निवडणूक आयोगाच्या इतिहासाची जर मांडणी करायची झाली तर टी एन शेषन ह्यांच्या आधीचा निवडणूक आयोग आणि शेषन ह्यांच्यानंतरचा निवडणूक आयोग अशी करावी लागेल इतका जबरदस्त ठसा त्यांनी उमटवला.
निवडणूक आयोग किती निष्पक्ष आणि प्रभावी असू शकतो ह्याचा वस्तुपाठच त्यांनी समोर ठेवला.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply