नवीन लेखन...

गॅस आणि इलेक्ट्रिक वॉटर हीटर

रोज आपण आंघोळीसाठी पाणी तापवतो त्यासाठी अर्थातच इलेक्ट्रीक किंवा गॅस हीटरचा वापर करतो.

पाणी तापवणे ही उष्मागतिकी (थर्मोडायनॅमिक्स) वर आधारित असलेलीया आहे. पाण्याचे मूळ तापमान यात वाढवले जाते. हीटर नव्हते त्याअगोदर आपण मोठ्या भांड्यात पाणी तापवत असून पण त्यात ऊर्जेचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असे.

गरम पाण्याचा अखंड पुरवठा करण्यासाठी वॉटर हीटर, बॉयलर, गिझर्स यांची निर्मिती करण्यात आली. इलेक्ट्रीक वॉटर हीटरमध्ये रचना ही गॅस वॉटर हीटरसारखीच असते. फक्त गॅस वॉटर हीटरमध्ये उष्णता देणारे दोन घटक नसतात.

वॉटर हीटरमध्ये हेवी इनर स्टील टँक असतो. त्यात गरम पाणी काही काळ साठवले जाते, टँकभोवती इन्सुलेशन आवरण असते. थंड पाणी यंत्रात आणण्यासाठी डीप ट्यूब असते. गरम पाणी बाहेर नेणारी एक नळी असते. तापमान नियंत्रित करण्यासाठी एक थर्मोस्टॅट असतो. दाब नियंत्रित करणारा प्रेशर रिलीफ व्हाल्व्ह असतो. टाकी गंजू नये म्हणून सॅक्रिफिशियल अॅनोड रॉड असतो.

गरम पाण्याचे तापमान हे साधारणपणे ४९ ते ६० अंश सेल्सियस ठेवावे. तापमान नियंत्रित करण्यासाठी एक बटन असते त्यात थर्मोस्टॅट काम करीत असतो. गरम पाणी नेहमी थोडे कमी वेगाने सोडून घ्यावे कारण पाणी गरम करण्याच्या वेगापेक्षा सोडलेल्या गरम पाण्याचा बादलीत पडण्याचा वेग जास्त असेल तर मधूनच गार पाणी येऊ शकते. याचे कारण म्हणजे गार पाणी टाकीच्या तळाशी राहते व गरम पाणी वर राहते.

इलेक्ट्रीक वॉटर हीटरमध्ये कॉईलचा वापर केलेला असतो ती तापून उष्णता पाण्याला मिळते. साधारण कुटुंबाला रोज ४८ गॅलन पाणी लागते. इलेक्ट्रीक वॉटर हीटरमध्ये कॉईल असल्याने ती वापरताना विशेष काळजी घ्यावी लागते. बादलीत ठेवण्याच्या इमर्शन कॉईलमध्ये तर हा धोका नेहमीच असतो.

गॅस वॉटर हीटर हे धोकादायक वाटत असले तरी आता अनेक घरांमध्ये ते वापरले जात आहेत. गॅस शेगडीवर पाणी तापवण्यापेक्षा या गॅस वॉटर हीटरमध्ये पाणी तापवणे नेहमीच कमी गॅस वापरला गेल्याने फायद्याचे असते. काळजी तर कुठल्याही हीटरमध्ये घ्यावीच लागते.

१८६८ मध्ये लंडन येथे बेंजामिन वॅडी या पेंटरने पहिल्यांदा वॉटर हीटर तयार केला, त्याला गिझर असे नाव होते. त्यामुळे आजही आपण गिझर हा शब्द वॉटर हीटरला नेहमी वापरतो. १८८९ मध्ये एडविन रूड या नॉर्वेच्या इंजिनियरने अधिक प्रगत असा इलेक्ट्रीक वॉटर हीटर तयार केला.

वॉटर हीटर घेताना त्याच्या नळ्या, कॉईल, इन्सुलेशन रेटिंग, पाणी गरम करण्याचा वेग या बाबी विचारात घेतल्या जातात. दर्जेदार साहित्य वापरलेले वॉटर हीटरच विकत घ्यावेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..