नवीन लेखन...

हत्ती व सिंहाचा रेल्वे रुळांवरील वावर

भारताच्या अतिपूर्वेकडील प्रांतात म्हणजे आसाम, बिहार , पश्चिम बंगाल या भागात काही वर्षांपूर्वी रेल गाडीची धडक लागून ६५ हत्तींचा मृत्यू झालेला आहे. बरेचसे मृत्यू रात्रीच्या अंधारात घडलेले असून, बरेच वेळा इंजिनांचंही नुकसान होत आहे. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी आयआयटीच्या इंजिनीयर्सनी अनमॅन्ड एरियल व्हीइकल यू.ए.व्ही.चा वापर करून रात्रीच्या काळोखात हत्तींना ते रेल्वे मार्गावर पाशी आलेले असल्यास शोधणारे संवेदक बसविले आहेत. या उपकरणाच्या मदतीने हत्तींच्या कळपानं हालचाल सेंट्रल रेल्वे ट्रॅक कंट्रोल सिस्टीम ला कळविली जाईल. खबर मिळताच ते गाडीचा वेग कमी करतील व हत्तींच्या बळी पडण्याची शक्यता कमी होईल . ज्या विशिष्ट जंगलातील भागातून हत्तींची हालचाल जास्त असते, त्याठिकाणी रेल्वेमार्गाच्या खालून रस्ते काढण्यात आले आहेत. ज्यावरून हत्ती पलीकडील बाजूला जाऊ शकतील.

सौराष्ट्रातील गीर जंगलाच्या बाजूने जाणाऱ्या रेल्वे मार्गाजवळून गाडी जात असताना सिंहांची कुटुंब दिसू शकतात. हा रेल्वेमार्ग पिपाव्ह बंदराकडे जातो. एकदा एका मालगाडीच्या धक्क्याने दोन सिंहिणी तत्काळ मरण पावल्या व त्या मालगाडी बरोबर खेचल्या जाऊन पुढे मार्गाजवळ पडलेल्या आढळल्या. त्यांच्याबरोबर असलेले सिंहाचे ३ बछडे मात्र वाचले होते.

गिर जंगल सिंहांकरता जगप्रसिद्ध आहे. त्या जंगलाच्या बाजूने एक रेल्वेमार्ग जातो . काहीवेळा रात्रीच्या अंधारात सिंह आणि त्यांचे बछडे थेट रेल्वेमार्गावर येतात व त्या वेळी येणार्‍या गाडीच्या धक्क्याने मरण पावतात. अशा घटना ३ ते ४ वेळा घडल्या आहेत. अशा घटनेत सिंहांचा बळीजाणे योग्य नाही हे लक्षात घेऊन या मार्गावर रात्री ७ ते सकाळी ७ या काळात गस्त घालण्याकरता जवळच्याच खेड्यातील दोन सिंहप्रेमी तरुण काठ्या, टॉर्च व वॉकीटॉकी घेऊन रेल्वे मार्गावर गस्त घालतात. तिथेच आडवे होण्याकरता एक छोटे मचाण बांधण्यात आले आहे. रात्रभरात ५ ते ६ मालगाड्या जात असतात. या वेळात जर सिंहाची डरकाळी ऐकू आली किंवा त्यांची हालचाल दिसली तर जवळच्या स्टेशनमास्तरला ताबडतोब कळविलं जातं, जरूर पडल्यास टॉर्चच्या उजेडाने इंजिन थांबविलं जातं व योग्य तो सल्ला इंजिनड्रायव्हरला दिला जातो. या तरुणांना अंदाजे प्रत्येकी ६,००० रुपये महिना असा भत्ता दिला जातो. सिंहांवरील प्रेमापोटी रात्रभर जागत राहण्याचं हे काम ते तरुण मनापासून आवडीने करत आहेत पूर्णविराम

Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 179 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..