जन्म: १५ ऑक्टोबर १९३१
ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची पहिली ओळख नामवंत शास्त्रज्ञ अशी असताना त्यांना राष्ट्रपती पदाची संधी मिळाली. केवळ देशातच नव्हे तर विदेशातही त्यांनी आपल्या अलौकिक कामगिरीने देशाची नवी ओळख निर्णाण करून दिली.
कार्यकाळ: २५ जुलै २००२ ते २५ जुलै २००७
भारताचे अकरावे राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम. त्यांचे पूर्ण नाव अब्दुल पाकिर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम असे आहे. त्यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रोजी झाल्याची नोंद आहे. तामीळनाडू राज्यातील रामेश्वरम येथे त्यांचा जन्म एका सर्वसाधारण कुटुंबात झाला. त्यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम या नावाने केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात ओळखले जाते. आपल्या आगळ्या वेगळ्या कार्यपद्धतीमुळे ते जनतेचे राष्ट्रपती अशी ओळख निर्माण करू शकले. त्यांचे वडील रामेश्वरम येथे येणाऱ्या यात्रेकरुंना संबंधित धार्मिक स्थळी नावेने सुखरूप पोहोचवत असत. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपूरमला पूर्ण केले. लहानपणीच त्यांचे पितृछत्र हरपल्याने त्यांनी वर्तमानपत्र विकण्यासह छोटे-छोटे व्यवसाय करत शिक्षण पूर्ण केले. त्यांना गणित या विषयाची विशेष आवड होती. त्यांचे शिक्षणावरील प्रेम पाहून त्यांना त्यांच्या बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून शिक्षणासाठी मदत केली तिरुचिरापल्ली येथे बी.एस्सीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील नासा या प्रसिद्ध संस्थेत एरोस्पेसचे शिक्षण पूर्ण केले. कालांतराने विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे प्रमुखही झाले. अग्नी क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे त्यांचे जगभरात कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैयक्तिक सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले. शासनाने त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न अशा मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित केले. त्यांनी आत्तापर्यंत विद्येची अखंड साधना केली आहे.
Leave a Reply