नवीन लेखन...

एलियन प्लीमन – दुसऱ्या महायुद्धातील गुप्तहेर

एलियनचा जन्म 6 डिसेंबर 1917 रोजी मारसेलीस फ्रांस येथे झाला. तिचे वडील ब्रिटिश तर आई स्पॅनिश होती. तिचे शिक्षण ब्रिटन व स्पेन मध्ये झाले. तिचे इंग्रजी फ्रेंच, स्पेनिश भाषेवर प्रभुत्व होते. ग्रॅजुएशन झाल्यावर ती लिनसेसटर येथे कपड्याच्या व्यापारासाठी गेली. दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर  ती स्पेनच्या माद्रीद व लिसबन  येथे ब्रिटिश एमबसीमध्ये प्रेस सेक्शन मध्ये  1941 पर्यन्त काम करत होती. .ती 1942 ला ब्रिटनला परतली व स्पेनिश प्रेस सेक्शन मध्ये काम करू लागली. 28 जुलै 1942 ला तिने टॉम प्लीमनशी लग्न केले. फेब्रुवारी 1943 च्या मध्यावर तिने स्पेशल ऑपरेशन्स एक्सेकयूटीव या ब्रिटनमधील दुसऱ्या महायुद्धात सुरू केलेल्या गुप्तहेर संघटनेत प्रवेश घेतला.

29 मार्च 1943 रोजी तिने ऑफिशियल सीक्रेट अॅक्ट वर सही केली. तिची ऊंची फक्त 5 फुट होती.पण मेहनत घेऊन जी धाडसे पुरुष करत असत ती सगळी धाडसे एलियन करत असे. स्फोटके हाताळणे, रेल्वे रुळ उखडणे, रेल्वेचे डबे जाळणे, स्वताची नवी ओळख तयार करणे,बेमालुम  खोटी उत्तरे देणे, खोटा भूतकाळ रंगवून सांगणे,तिने अश्या सायकॉलॉजीकल टेस्ट दिल्या ज्यात मानसिक धैर्याची व खंबीरपणाची कसोटी लागेल. खराब हवामानामुळे दोन प्रयत्न फसल्यावर तिने 14 ऑगस्ट 1943 च्या रात्री ती पॅरॅशूटने  रडारची रेंज टाळण्यासाठी 1000 फुटाच्या पेक्षा उंचीवरुन फ्रांसमध्ये  मध्ये उतरली.

तिने आपली टोपणनावे  गेबी व डिन अशी ठेवली. तिने एसओई गुप्तहेर संस्थेसाठी हुशार एजंट गोळा  करणे,  त्यांच्या मध्ये  कम्युनिकेशन घडवणे , अशी कामे केली. तिकडून तिला जुरा प्रांतात पॅरॅशूटने उतरवण्यात आले  आणि थोडाकाळ संघटनेपासून दूर ठेवण्यात आले. तरीही तिने अप्रतिम काम केले. व पुढे संघटनेला उपयोगी पडतील असे लोक शोधले. त्यासाठी तिने कोणतेही धाडस करायला मागेपुढे पाहिले नाही. त्याचवेळी तिचा मोठा भाऊ अल्बर्ट सुद्धा संघटनेसाठी काम करत होता. आणि महायुद्ध जिंके पर्यन्त काम करत राहिला. एलियनला जर्मनांनी मार्च 1944 मध्ये पकडले. 11 सप्टेंबर 1944 ला तुरुंगातून घेऊन म्युनिकची ट्रेन पकडण्यासाठी  करिश्रू स्टेशनवर आणले. तिथून तिला डेकाऊ येथील यातनातळावर रात्री आठ ते दहा च्या सुमारास आणले गेले.दुसऱ्या दिवशी तिला गूढग्यावर बसवण्यात आले आणि डोक्यात गोळी झाडण्यात आली. तिला मरणोत्तर

1 )King’s Commendation for Brave Conduct

2) Croix de Guerre

3) Commendation for Brave Conduct देण्यात अवॉर्ड आली.

— रवींद्र शरद वाळिंबे

 

Avatar
About रवींद्र शरद वाळिंबे 85 Articles
मी हौशी लेखक आहे.मी विविध विषयावर लेखन करतो.कथा ललितलेखन व्यक्तिचित्रण हे माझे आवडीचे विषय आहेत.माझे आत्तापर्यंत कथा,ललितलेख प्रसिद्ध झाले आहेत.त्यापकी एका कथेला अनघा दिवाळी अंकात दुसरे पारितोषिक व एका कथेला मराठी साहित्य परिषद कल्याण शाखा चे उल्लेखनीय कथाचे पारितोषिक मिळाले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..