कोकणातील उभारता गायक कुणाल भिडेचा जन्म ७ जूनला झाला.
देवरुख येथील उदयोन्मुख गायक कुणाल भिडे गेले दहा वर्षे संगीत शिकत असून कुणालने संगीता बापट रत्नागिरी यांच्याकडे गायनाचे शिक्षण घेतले असून सध्या तो डोंबीवली येथील पंडित महेश कुलकर्णी यांच्याकडे गायनाचे शिक्षण घेत आहे. कुणालचे शालेय शिक्षण देवरुख येथे व उच्च शिक्षण राजेंद्र माने माने कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे झाले आहे.
कुणालने नोव्हेंबर २०१७ मध्ये अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडल, मुंबई येथे संगीत विशारद पूर्ण केले आहे.
संगमेश्वर तालुक्यतील सांस्कृतिक चळवळ जपणाऱ्या कलांगणच्या दिवाळी पहाट कार्यक्रमात कुणालने गायन केले आहे. तसेच कोकणात अनेक ठिकाणी त्याने मैफिली केल्या असून रत्नागिरीतील आर्ट सर्कल या संस्थेतर्फे १५ ऑगस्ट २०१८ मध्ये ‘स्वरभास्कर’ या बैठकीचे आयोजन केले होते यात कुणाल भिडेने आपली कला सादर केली होती.
देवरूख येथील अक्षय पाटील याने बनवलेल्या ‘अजाण’या लघुपटाला कुणालने आपल्या मित्रांच्या सोबत संगीत दिले आहे. हा लघुपट नाशिक येथील फेस्टिव्हल मध्ये दाखवला गेला होता.
कुणालने अनेक स्पर्धेत भाग घेतला असून अनेक पारितोषिके मिळवली आहे. गायना बरोबरच कुणाल उच्च शिक्षित असून ‘कॅप जेमिनी’ येथे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत आहे.
उदयोन्मुख गायक कुणाल भिडेला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply