गलेलठ्ठ झाले ठेकेदार उंदीर मारणारे
अवकाळी फाशी चढत आहे शेतात राबणारे
दिनरात राबतो घामात न्हाहतो शीवारात तो
मिळवीत आहे नफा तक्क्यास टेकून लोळणारे
कसे रे मिटावे कर्ज हे सातबाऱ्यावरचे आज
सभागृहात कमी माझ्या हक्कांसाठी भांडणारे
पुराव्याच्या फाईली सगळ्या कुरतडल्या उंदरांनी
होतील मुक्त सारेच आता घोटाळे करणारे
मिळावा अधिकार मलाही उंदीर हे मारण्याचा
मारील आनंदाने चारदोन बाँम्ब पेरणारे
भावना ही तूझी ” जयवंता ” आतली वेदना रे
हसते रे ते अंधभक्त पाय सत्तेचे चाटणारे
© जयवंत वानखडे,कोरपना