नवीन लेखन...

एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक

पोलीस दलात एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची १९९५ मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. प्रदीप शर्मा यांच्यासोबत त्यांना गु्न्हे अन्वेषण शाखेत काम सुरू केले. दया नायक हे शर्मा यांच्या एन्काउंटर पथकात होते. दया नायक यांनी १९९६ मध्ये पहिला एन्काउंटर केला. त्यांनी जवळपास ८० गुंडाचे एन्काउंटर केले आहेत.

एन्काउंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेले दया नायक यांची कारकीर्द काहीशी वादग्रस्तदेखील ठरली. बेहिशेबी मालमत्ता आणि अंडरवर्ल्डसोबत संबंध असल्याच्या आरोपावरून त्यांना पोलीस सेवेतून 2006 साली निलंबित करण्यात आले होते. महाराष्ट्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ACB ने त्यांना अटक केली होती. पुढे ACB ने कोणतेही पुरावे न दिल्याने नायक यांना क्लिन चीट मिळाली. 2012 मध्ये नायक यांना सेवेत पुन्हा घेण्यात आले. त्यांची नियुक्ती मुंबईत करण्यात आली. त्यानंतर त्यांनी बदली नागपूर येथे करण्यात आली. त्या ठिकाणी रूजू न झाल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. पुढे 2016 मध्ये त्यांच्या निलंबनाची कारवाई मागे घेत मुंबईत त्यांची पोस्टिंग करण्यात आली.

मुंबईच्या वर्सोवा भागातल्या एका हॉटेलात दया नायक वेटरचे काम करायचे. दया नायक यांनी नकळत्या वयात मुंबईचा रस्ता धरला होता. उडपीतल्या छोट्या गावातून आलेलं शाळेचं पोरं होतं ते. मुंबईच्या रंगीत दुनियेला पाहून भुलायच वय ते. त्यातही हा काम करायचा, ते देखील बारमध्ये.

वर्सोवा भागतल्या बारमध्ये १९७९ च्या दरम्यान देखील, कोणतं वातावरण असू शकतं हे वेगळं सांगण्याची गरज नाही. त्या काळात वेटर असणाऱ्या या पोराला पगार होता पाचशे रुपये. पोराच्या गोड बोलण्यामुळे महिना पाचशे रुपये टिप देखील मिळायची. राहिलेल्या पैशातून दया नायक शिक्षणाची स्वप्न बघायचे. वेळ मिळाला की पुस्तक वाचायचे. हॉटेलचा मालक शहाणा होता. त्याने या पोराचा अभ्यास पाहीला आणि नाईट स्कुलला अॅडमीशन करुन दिलं. आत्ता हॉटेलमालकाच्या कृपेनं दया नायक शाळा शिकू लागले. दहावी, बारावी झाली. गावाकडच्या आईला पोरगं कमवतय याहून अधिक आनंद पोराच्या शिक्षणात मिळत होता.

वेटरसोबत दया नायक प्लंबर म्हणून काम करत आणि सोबत MSc देखील ते झाले. अशाच एका रात्री दया नायक यांनी ठरवलं PSI परिक्षेचा फार्म भरायचा. मित्रांकडून माहिती घेतली. पोलिस होण्याचं स्वप्न पाहीलं. पण ते सहज शक्य नव्हतं. वेटर, प्लंबर अशी काम सोडून दया नायक दादर इथल्या एका अभ्यासिकेत कामाला लागले. काम करत अभ्यास करणं याहून अधिकचा आनंद कशातच नव्हता.

बघता बघता दया नायक PSI झाले.पण तेव्हा दुख: एकाच गोष्टीचं होतं त्याचं कौतुक करायला त्याच्या जवळच कोणीच नव्हतं. दया नायक यांची पहिली पोस्टिंग झाली ती, जुहूच्या टिडेक्शन विंगमध्ये. वेटरचा शिक्का जावून अंगावर खाकी वर्दी आली होती. त्या वर्दीवर नेमप्लेट असायची, त्यावर लिहलं होतं. सब इन्स्पेक्टर दया नायक.

आज त्या नावात वाटणारी दहशत तेव्हा नव्हती. तो नव्यानं दाखल झालेला एक पोलिस सब इन्स्पेक्टरच होता. शांतपणे तो नोकरी करत होता, पण अचानक एक दिवशी त्याच्या आयुष्यात, तो प्रसंग आला..

त्याच्या समोर छोटा राजन टोळीतले दोन गुंड उभा होते. त्यांची दादागिरी पाहून सब इन्स्पेक्टर दया नायक त्यांच्यावर तुटून पडला. छोटा राजनच्या टोळीतील गुंडावर हात टाकण्याचं धाडस एका पोलिस सब इन्स्पेक्टरने केलं होतं. एका रात्रीत मुंबईतल्या क्राईम स्टोरीवर लक्ष असणाऱ्या पत्रकारांच लक्ष त्याच्याकडे गेलं. हा कोण? याची चर्चा तेव्हाचे डेप्युटी पोलिस कमिश्नर सत्यपाल सिंह यांच्या कानावर गेली. सत्यपाल सिंग यांनी नव्या मुलात दम दिसतोय म्हणून त्यांची रवानगी CIU ब्रॅन्चमध्ये केली. तिथे त्याचे सिनियर होते इन्स्पेक्टर प्रदिप शर्मा.

अंडरवर्ल्ड डॉन बबलू श्रीवास्तवचे दोन पंटर अमुक ठिकाणी येणार आहेत अशी टिप प्रदिप शर्मांना मिळाली होती. त्याच चकमकीत दया नायकच्या पिस्तुलातून पहिल्यांदा गोळ्या सुटल्या. दोन पंटर खल्लास झाले पण एका सब इन्स्पेक्टरला एकांन्टर स्पेशॅलिस्ट बनवून गेले.

प्रदिप शर्मांना अस्सल ज्युनियर मिळाला होता. त्याला मरायची भिती वाटतं नव्हती. तो फक्त मारायच्या गोष्टी करायचां.
रफीक डब्बेवाला, सादिक कालिया, श्रीकांत मामा, विनोद भटकर, परवेज सिद्दीकी आणि सुभाष एकामागून एक नाव जोडत गेलं. आत्ता दया नायक हे नाव साधं राहिलं नव्हतं. दयाच्या नावाने आत्ता मुंबईच्या क्राईमच्या दुनियेत एक दहशत जोडली गेली होती.

२६ डिसेंबर १९९६.

सादिक कालिया हे नाव मुंबईच्या दहशतीमधलं सर्वात महत्वाचं नाव होतं. सादिक शार्पशुटर होता. दोन्ही हातानं एका वेगात बंदुक चालवण्यासाठी तो गुन्हेगारी जगतात प्रसिद्ध होता. २६ डिसेंबरच्या दिवशी सादिक आणि दया नायकची कुस्ती संपुर्ण दादरच्या फुल मार्केटला पहायला मिळाली होती.

दादरच्या मार्केटमधून जात असतानाच सादिक दया नायकच्या रडारवर आला. पुढचा मागचा विचार न करता भर बाजारात दया नायकने सादिकवर हात टाकला. सादिक आणि दयाची कुस्ती चालू झाली. आत्ता दया नायक भर चौकात मारला जाणार याचा अंदाज बारक्या मुलानं देखील लावलेला. अचानक एक गोळी आली आणि दया नायकच्या मांडीतून रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या.दया नायकचं रक्त पाहून निम्मी गर्दी आपआपल्या घरी गेली होती. तोच दूसरी, तिसरी एकामागून एक गोळ्या आल्या आणि सादिक आडवा झाला. दया नायकने दादरच्या गर्दीत सादिकचा गेम केला.

दया नायकच्या नावावर ८० हून अधिक एन्कांन्टर जमा झाले होते. अशातच अंधेरी नाक्यावर त्याच्या गाडीत बॉंम्ब ठेवण्यात आला. एखाद्या सिनेमाला लाजवेल अशा आश्चर्यकारक रितीने दया नायक यातून वाचला. महिनाभर तो हॉस्पीटलमध्ये होता.
संपुर्ण बॉलिवूडचं लक्ष त्याच्याकडे गेलं. खंडण्यांचा धमक्या येण्याच्या काळात बॉलिवूडसाठी दया नायक हे नाव हिरोहून कमी नव्हतं. फेम नावाचा प्रकार दया नायकच्या नावासोबत जोडला जावू लागला. अशातच दया नायकने आपल्या गावात शाळा बांधण्याचा निर्णय घेतला. दिवसरात्र टेबलांवर दारूचे ग्लास भरून शिक्षण घेतलेल्या पोराला शाळेचं महत्व कळणं साहजिक होतं. पण याच शाळेच्या उद्घाटनानंतर त्याचे उलटे वासे फिरू लागले.

बॉलिवूड इंडस्ट्रीमधले मोठ्ठ मोठ्ठे सेलिब्रिटी त्याच्या शाळेच्या उद्घाटनासाठी हजर झाले होते. दया नायक एन्कांटर स्पेशॅलिस्ट असला तरी तो एक सब इन्प्सेक्टर होता. त्याचा पगार आणि त्याची शाळा हे गणित न जुळणार होतं. त्याच्यावर चौकशी आयोग बसवण्यात आला, पण त्यातूनही तो सहिसलामत सुटला. दया नायकच्या संपत्तीवरती चर्चा करणारे शांत झाले होते.

त्याच्या संपत्तीबद्दलचा संशय दर वेळी वाढवणारी उदाहरणे दिसतं होती. शेवटी एंन्टी करप्शन ब्रॅन्चने त्याच्यावर चौकशी आयोग नेमला. २००६ साली आपल्या दोन जवळच्या मित्रांसोबतच त्याला अटक करण्यात आली. दोन महिने एन्कांटर स्पेशॅलिस्ट जेलमध्ये होता. मिडीयाच्या नजरेतून हे बातमीमुल्य होतं.

दया नायक जेलमध्ये हि बातमी टिआरपी वाढवणारी होती. पण त्यामुळे दया नायकडे बघणारी नजर बदलली. त्याने केलेल्या एन्कांन्टवर संशय घेण्याच काम घेण्याच काम देखील करण्यात आलं.

तब्बल पाच वर्ष दया नायकला सस्पेंड ठेवण्यात आलं. याच २००९ मध्ये त्याच्यावर कारवाई करण्यासाठी परवानगी देण्याची वेळ आली तेव्हा डिजीपी एस.एस.विर्क यांनी त्या गोष्टीला नकार दिला.

संकलन-संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..