नवीन लेखन...

अभियंता अलेक्झांडर गुस्ताव्ह आयफेल

अलेक्झांडर गुस्ताव्ह आयफेल यांचा जन्म १५ डिसेंबर १८३२ रोजी फ्रान्समधील बुर्गण्डी प्रांतातील दिजोन शहरात झाला.

अलेक्झां डर गुस्ताव्ह आयफेल हे रेल्वे आर्च ब्रीज बांधकाम तज्ज्ञ होते. तसेच निवृत्तीनंतर हवामान आणि वायुवेग याचाही त्यानी अभ्यास केला होता.

फ्रान्सच्या राज्यक्रांतीच्या स्मरणार्थ उभारण्याच्या स्मारकासाठी अनेक इंजिनिअर्स, वास्तुशास्त्रज्ञ यांच्याकडून निविदा मागविल्या होत्या. त्यात आयफेल यांची योजना मंजूर झाली. न्यूयॉर्कमधील स्टॅच्यू ऑफ लिबर्टी तयार करण्यामधेही त्याचे योगदान होते. ते फ्रान्समधील रेल्वेखात्यामध्ये अभियंता म्हणून हजर झाले. अनेक रेल्वे पुलांची कामे त्यांचे अधिपत्याखाली पार पडली गेली.

१८६८ मध्ये थिओफील सॅरिंग यांचेबरोबर भागीदारीत आपली बांधकाम कंपनी सुरू केली. बीओटी या प्रथेची सुरुवात आयफेल टॉवरचे कामापासून झाली. फ्रान्स सरकारने अंदाजित ६.५ फ्रॅंक प्रकल्प किमतीपैकी फक्त् १.५ फ्रॅंक वाटा व जागा दिली. बाकी सर्व कंपनीने उभारून रोखे काढून खर्च भागविला. सर्व पुतळेप्रेमी जनतेने याचा आदर्श ठरवण्यास हरकत नाही.

गुस्ताव्ह आयफेल यांनी फक्तल आराखडाच तयार केला असे नाही तर त्यांनी निधी उभारण्यासाठी शासनाचे साहाय्याने कर्जरोखे काढणे तसेच बांधकाम व्यवस्थापनही केले. जसा प्रत्येक नवीन गोष्टीला आपल्याकडे जसा विरोध आणि टिंगल असते तशाच प्रकारचा विरोध फ्रान्समधेही या प्रकल्पाला झाला .

आयफेल टॉवर आपल्या निवासी इमारतीच्या ८१ मजल्या एवढा उंच (1,063 फूट, 324 मीटर) उंच आहे फ्रेंच क्रांतीला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या प्रीत्यर्थ सुमारे ३०० कामगारांनी 18,038 अतिशुद्ध लोखंडाचे भाग वापरून आयफेल टॉवर बांधला.त्यासाठी ७३०० टन लोखंडाचा वापर करण्यात आला.

आयफेल यांनी प्रकल्पाचा अंदाजित खर्च, पर्यटकांचेकडून मिळणारा परतावा, वित्तीय संस्थांना द्यावे लागणारे व्याज याच मेळ घालत प्रकल्पाचा नुसताच आरखडा नाहीतर जगातील एक आश्च र्य उभे केले. २०१७ मध्ये ६९ लक्ष पर्यटकांनी आयफेल टॉवरला भेट दिली यावरून त्याचे ऐतिहासिक व पर्यटन कळून येते.

अलेक्झांडर गुस्ताव्ह आयफेल यांचे निधन २७ डिसेंबर १९२३ रोजी पॅरिस येथे झाले.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..