इंग्लंडचे डावखुरे फिरकी गोलंदाज डेरेक अंडरवुड यांचा जन्म ८ जून १९४५ रोजी ब्रॉम्ली, केंट, इंग्लंड येथे झाला.
डेरेक अंडरवुड यांची दुस-या महायुद्धानंतरचे एक सर्वोत्तम स्पिनर म्हणून ओळख होती. डेरेक अंडरवुड हे इंग्लंड संघाचे ‘लेफ्ट ऑर्म ऑर्थोडॉक्स’ फिरकी गोलंदाज होते. १७ व्या वर्षी केंटतर्फे खेळणाऱ्या अंडरवुड यांनी पहिल्याच मोसमात १०० विकेट्स घेतल्या. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये विकेट्सचे शतक साजरे करणारे ते सर्वात लहान क्रिकेटपटू ठरले.
२५ वर्षाच्या कारकीर्दीत त्यांनी एका मोसमात नऊ वेळा शंभरहून अधिक विकेट्स घेतल्या. १९६६ मध्ये तर त्यांनी १५७ विकेट्स घेतल्या. १९६९ सालापासून १९७३ सालापार्यंत डेरेक अंडरवुड हे गोलंदाजांच्या क्रमवारीत अग्रस्थानी होते. त्यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीत ८६ कसोटी सामने आणि २६ वनडे सामने खेळले आहेत. ८६ कसोटीत २९७ विकेट्स अंडरवुड यांच्या नावावर आहेत.
सुनील गावस्कर हे डेरेक अंडरवुड यांची १२ वेळा ‘शिकार’ठरले होते. डेरेक अंडरवुड यांची गोलंदाजी इतकी सफाईदार होती की, त्यांनी आपल्या संपुर्ण क्रिकेट कारकिर्दीत एकही वाईड चेंडू टाकला नाही.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply