नवीन लेखन...

सचिनचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण

पाकिस्तानविरुद्ध १५ नोव्हेंबर १९८९ साली सचिन तेंडुलकर ने क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. याला आज ३२ वर्षे झाली.

सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वयाच्या सोळाव्या वर्षी पदार्पण केले. पदार्पण केले त्या दिवशी त्याचे वय १६ वर्षे २०५ दिवस इतके होते.त्यापूर्वी १९८८ साली सहकारी विनोद कांबळीबरोबर हॅरिस शिल्ड या शालेय स्पर्धेमध्ये ६६४ धावांच्या भागीदारीचा विक्रम केला होता. इंग्लंडमध्ये १९९० साली ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात त्याने यजमानांबरोबरच्या कसोटी सामन्यात पहिले शतक झळकावले होते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिले द्विशतक फटकावण्याचा मानही सचिनच्याच नावावर आहे. १९९९ साली सर डॉन ब्रॅडमन यांनी सचिनवर स्तुतिसुमनांचा वर्षांव करत त्याला भेटीसाठी बोलावले होते.

चार वर्षांचा असताना सचिनने हातात बॅट घेतली होती. बॅट तोलण्याचे वय नसले तरी त्याच्यात महान फलंदाज होण्याची परिपक्वता होती. त्याने काही दिवसांत ही खेळी आत्मसात केली. वेगवान गोलंदाज होण्याची त्याची इच्छा होती. मात्र प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांनी त्याच्यातील प्रतिभा ओळखली आणि त्यातूनच सचिनच्या इच्छेला कलाटणी मिळाली. आचरेकरांच्या मार्गदर्शनाखाली त्याने फलंदाजीचे धडे गिरवणे सुरू केले होते. चपळ व विश्वासू असलेल्या शिष्यावर गुरू आचरेकरांचा प्रगल्भ विश्वास होता. यामुळे ते त्रिफळ्यावर एक रुपया ठेवत होते. सचिनला त्रिफळाचीत करून तो रुपयाचा शिक्का घेऊन जाण्यास ते सर्व गोलंदाजांना सांगत होते. मात्र सर्व गोलंदाज यामध्ये अपयशी ठरत होते. अखेर तो रुपयाचा शिक्का सचिनला मिळत होता. आचरेकरांच्या या वेगळ्या मार्गदर्शनामुळे सचिनमधील फलंदाजी पूर्णपणे यशस्वी झाली होती. विद्यार्थिदशेत सचिनमधील फलंदाजी अधिक बहरली होती. त्याला चांगल्या खेळीची लय गवसली होती. यातून विक्रमांचा पल्ला गाठण्याची नवी उमेद त्याच्यात निर्माण झाली होती. मैदानावर उतरल्यावर विक्रमी धावांचा पाऊस पाडणारी फलंदाजी तो करू लागला.

१९८७ साली मुंबई येथे विश्वचषकाचा सामना खेळवला गेला होता. या वेळी सचिन चौदा वर्षांचा होता. बाँड्री बॉयच्या भूमिकेत तो या वेळी मैदानावर होता. या सामन्यातून घेतलेल्या प्रेरणेतून आजच्या घडीला सचिनने कारकिर्दीतले सहा विश्वचषकातील सामने खेळले आहेत. तसेच त्याने अपूर्व व अशक्य असा शतकांचे शतक ठोकण्याचा विक्रम केला आहे.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..