पेन्शनची शिदोरी.FDचाही ठेवा
जेष्ठ नागरिकांच्या देवा, करती सारे हेवा….
बॅंकेमध्ये ह्यांच्यासाठी, वाढीव व्याज दर
रेल्वे,ST तिकीटावर ती, सवलतही फार
सरावले आता सारे, सरावले आता सारे
खावया हा मावा, जेष्ठ नागरिकांचा हेवा……
पर्यटनच्या ऑफीसांमध्ये, ह्यांच्या दिसती रांगा
ह्यांच्या दारी चैतन्याची, उत्साहाची गंगा
देशोदेशी फिरुनी येता, देशोदेशी फिरुनी येता
मनी येई गारवा, जेष्ठ नागरिकांचा हेवा…….
निसटलेले क्षण जगण्याचा, ह्यांचा आटापीटा
जोपासती छंद हे आपुला, वेळ ना दवडता
रिचार्ज करण्या स्वत:ला ते, रिचार्ज करण्या स्वत:ला ते
जाती हास्या-योगा, जेष्ठ नागरिकांचा हेवा……
मुलांच्या संसारामधी, हे न लुडबुडती
नातवंडांचा परी आनंदे, सांभाळ करीती
वृध्दपणाचा ना करती, वृध्दपणाचा ना करती
कुणी आता कावा, जेष्ठनागरिकांच्या देवा
करती सारे हेवा……..
— सौ. अलका वढावकर
Leave a Reply