मराठी लोकांची आणि या लोकांच्या घराघरात पोचलेली एक राष्ट्रीयीकृत बॅंक म्हणून बॅंक ऑफ महाराष्ट्रची एक वेगळी ओळख आहे. तिचे मुख्यालयही पुण्यासारख्या शहरात दिमाखदारपणे उभे आहे. बँक ऑफ महाराष्ट्रची स्थापना १६ सप्टेंबर १९३५ रोजी झाली. १९६९ साली हिचे राष्ट्रीयीकरण झाले. वामन काळे ह्यांनी महाराष्ट्रीयांच्या आर्थिक गरजा भागविता याव्यात, म्हणून ‘बॅंक ऑफ महाराष्ट्र’ ची स्थापना करण्यात त्यांनी पुढाकार झेतला आणि त्या बॅंकेचे संस्थापक, अध्यक्ष व संचालक म्हणून अखेरपर्यंत काम पाहिले.
बँक ऑफ महाराष्ट्रची ध्येयधोरणे:
१) ग्राहकांच्या अपेक्षांना तत्पर आणि कार्यक्षम प्रतिसाद मिळेल याची खात्री बाळगणे.
२) समाजातील विविध घटकांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी योजना आणि सेवा यात नावीन्य आणणे.
३) अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा सातत्याने अवलंब करणे.
४) सक्रिय, व्यावसायिक आणि वचनबध्द कर्मचारीवर्गाची उभारणी करणे.
५) सर्वोत्कृष्ट कार्यपध्दती आणि कॉर्पोरेट पध्दतीच्या प्रशासनाव्दारे भागधारकांच्या संपत्तीत वाढ करणे.
६) शाखांच्या विस्ताराव्दारे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रवेश करणे.
बँक ऑफ महाराष्ट्रचे बोधचिन्ह
दीपमाळ
हे बोधचिन्ह आपल्या असंख्य दीपांच्या प्रकाशाने प्रगतीच्या उंच शिखरांचा मार्ग दाखवते.
स्तंभ
आमची संस्था – सामर्थ्याचे प्रतीक
दीप
आमच्या शाखा – सेवेचे प्रतीक
या बोधचिन्हातील तीन “एम` म्हणजे तीन प्रतीके आहेत –
म्हणजेच गतिमान अर्थचलन
कार्यध्दतींचे आधुनिकीकरण
कर्मचा-यांना प्रेरित करत राहणे
सध्या थकीत कर्जाचे वाढलेले प्रमाण (एनपीए) आणि अलीकडच्या काळात झालेला मोठा तोटा, या पार्श्वदभूमीवर बँक ऑफ महाराष्ट्र सध्या वेगळ्या अर्थाने चर्चेत आहे. बॅंकेच्या उच्चपदस्थांनी केलेल्या गैरव्यवहारांमुळे बॅंकेच्या प्रतिष्ठेला धक्काही पोचलेला आहे. अशा नकारात्मक घटना आणि त्यांच्या जोडीला माध्यमांत प्रसृत होणाऱ्या बातम्यांमुळे या बॅंकेचे खातेदार, ठेवीदार आणि हितचिंतकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. बॅंकेच्या कथित विलीनीकरणाची चर्चाही जोरात सुरू आहे. या पार्श्वमभूमीवर रवींद्र मराठे यांच्या रुपाने बॅंकेला एक मराठी खंबीर, कार्यक्षम नेतृत्व लाभले आहे. संकटात सापडलेल्या या बॅंकेची धुरा आता त्यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे. बॅंकेची एकूण परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी आणि त्यांच्या टीमने विविध आघाड्यांवर लढाई सुरू केली आहे. या लढाईचे यश दिसायला काही काळ जावा लागणार आहे. तोपर्यंत सर्वांनाचा संयम आणि विश्वाईस ठेवावा लागणार आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply