नवीन लेखन...

वर्तनशैली – भेटवस्तु

Etiquette - Gifting

भेटवस्तु हा नव्या जगातला जादूई मंत्र आहे. अनेकविध भारतीय सण, राखी, भाऊबीज, जन्मदिवस, प्रमोशन, बाळाचे आगमन, शिक्षकदिन अशा एक का अनेक प्रसंगात भेटवस्तूंची देवघेव होत आहे.

नव्या पिढीचे इंटरनेटशी जुळलेले नाते आणि त्यामुळेच जगभराशी वाढलेला दोस्ताना यातून फ्रेंडशिप डे, फादर – मदर डे, व्हॅलेंटाईन डे यासारख्या पाश्चिमात्य दिवसांनी तरुणांना आपलेसे केले आहे.

आजची तरुणाई ही चंगळवादी आहे असे विधान सर्रास केल जातं पण ती तेवढीच भावूक आहे, दिलदार आहे हे मात्र नेमकं विसरलं जातं प्रेम ही जगातील सर्वश्रेष्ठ भावना आहे आणि त्याचं प्रतिक म्हणून सर्वदूर असलेल्या तरुणांमध्ये भेटीचे आदानप्रदान चालते. ‘मला तू आवडतोस/आवडतेस’ हे खुलेपणे सांगण्याचा जमाना आहे. त्याचबरोबर प्रेमाच्या इंद्रधनू रंगांची, मैत्रीची, परस्परांच्या आवडीची कदर करणे हे सर्वमान्य झाले आहे. या पार्श्वभूमीवर, ही भेटवस्तू कशाला? असा आडमुठेपणा काहीजण करतात. आमच्यावेळी नव्हती असली थेर हे उद्गार म्हणजे तर तरुणाई आणि जेष्ठमंडळी यांच्यातील मतभेद आणि अंतर वाढविणारे ठरतात.

प्रत्येक पिढीनुसार भावभावनांचे प्रतिबिंब बदलत गेले आहे कारण बदल हा जीवनाचा स्थायीभाव आहे. तर परिवर्तन हा जगण्याचा आरसा आहे. त्यामुळे भेटवस्तूवर तोंडसुख घेत टीकेचा सूर लावणे गैर आहे. आपल्या जिवलग मित्रमैत्रीणी, भावंड, आईवडील, आजीआजोबा एवढच कशाला सर मॅडम संबोधल्या जाणार्‍या शिक्षकांनाही आजकाल भेटवस्तू दिल्या जातात त्यामुळे त्यांच्याबरोबर मैत्रीपूर्ण संबंध होतात. अडचणींचे, समस्यांचे निवारण होण्यासाठी गुरुशिष्य नात्याबरोबरच एक मार्गदर्शक मित्र या नात्याचा जन्म होतो तो विद्यार्थ्यांना आपलेपणा देतो.

याचा अर्थ शिक्षकांना भेटवस्तू द्या अन् घ्या सवलत असा नव्हे. परस्परांविषयीचा दृष्टीकोन समजायला आणि भीतीचा पगडा दूर व्हायला दोघांतील ओळख वाढायला भेटवस्तू हे एक माध्यम बनते. हीच दृष्टी नात्याच्या परीघातील अनेक बिंदूपर्यंत पोचते मग ते घरगुती असो की मित्रपरिवारातले. त्यामुळे पाल्याला किती परफ्युम्स, घड्याळे मिळावीत याची अवाजवी गणिते करणे सोडा. अकरावीत गेल्यावरच तुला हे सारं मिळतय, या वयातच मिळालं याचे भान ठेवा अशा हेटाळणीयुक्त वाक्यांचा उपयोग न करता त्याच्या भेटवस्तूंचे कौतुक करा कारण मुलामुलींना मिळणार्‍या भेटवस्तू या त्यांचे मित्रत्वाचे जग विस्तारते आहे हे सांगणारे आहे. नाती ही रक्तापलिकडे जाणारी आणि म्हणूनच महत्वाची आहेत ज्यात तुमचा पाल्य हा एक व्यक्ती म्हणून समृद्ध होतोय.

भेटवस्तू ही कुणीही कुणालाही द्यावी ती देतांना एक पथ्य मात्र जरूर पाळावे की ज्यात किंमतीचा टॅग महत्वाचा नसून आपलेपणाची ओढ असावी. जी वस्तू महाग की स्वस्त, छोटी की मोठी याहून माणसांची श्रीमंती जपणारी असली की भेटवस्तूचा गोडवा अधिकच आनंद देतो. भेटवस्तूची देवघेव ही त्या व्यक्तीची आवड, तिचे व्यक्तिमत्व लक्षात घेऊन करायला हवी. अन्यथा भेटीच्या आनंदापेक्षा हे काय भलतंच, याचं काय करू? एवढंही माहीत नाही तर उगाचच ही नाटकं कशाला? अशी भावना होते.

ज्याला वाचनाची आवड आहे त्याला पुस्तक भेट आवडेल. मोठमोठे शोपिस घराला सौंदर्य देण्याऐवजी कुणाला म्युझियम अवतरले वाटू शकतं. कुणी रिस्टवॉच वापरत नाही त्यांना घड्याळ म्हणजे अडचणच.

अर्थात प्रत्येक भेटवस्तू त्या गोष्टी देणार्‍या व्यक्तीची ओळख सांगते. त्यामुळेच कुणीही कुठल्याही भेटीचा अनादर न करता त्या व्यक्तीच्या आनंदाचा स्वीकार करीत भेटींचा मजा भेटवस्तूंमधून मनमुराद लुटावा.

समता गंधे
५८/८, वसंतसृष्टी, पांडुरंगवाडी
गोरेगांव (पूर्व), मुंबई
४०००६३०२२-२८७४५६८१

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..