संस्कृती आणि वारसा दोहोंची जपणुक या बाबत सर्वच युरोपीय देश आघाडीवर आहेत. इटली देशाची राजधानी रोममधेही हे दिसुन येते. सेवन हिल्समधे वसलेल्या या रोम शहराची पायी टूर करुन टायबर रीव्हर, रोमन फोरम, ट्रेव्ही फौंटन, सर्कस मँक्सीमस, पियाझा व्हेनीझिया, कलोझियम वगैरे ऐतिहासिक पार्श्वभूमी ची स्थळ बघताना जास्ती करुन भग्न अवशेषच बघायला मिळाले. रोम शहरातल्या ब-याचशा इमारती विटकरी रंगाच्या दिसत होत्या.
जेवण आटोपुन, लास्ट मोमेंटला टूर प्रोग्रँममधे अँड केलेली व्हॅटिकन सिटी पहायला आम्ही गेलो.
व्हॅटिकन सिटी
ख्रिश्चनांच पवित्र स्थान व्हॅटिकन सिटी हा एक स्वतंत्र देश असून जेमतेम हजार लोकसंखेचा हा देश पोलीस आणि सुरक्षेबाबत स्वयंपूर्ण आहे. या देशाच क्षेत्रफळ जेमतेम पुण्यातल्या नारायण पेठे इतपतच असेल. पासपोर्ट स्वतःचा असून सर्वच नियम, संसद, कायदे, कानून स्वतःचे आहेत. शिवाय ईतर युरोपियन देशात जाताना त्यांना व्हिसाही लागतं नाही. बासीलीका ही जगातील सर्वांत मोठी चर्च ह्याच व्हँटीकन सीटीत आहे. ही बासीलीका पोपच्या स्मरणार्थ बांधण्यात आली असुन ही बांधायला एकशे वीस वर्षे लोटली.
चर्चमधेच रोमन इतिहास, माणसे, संस्कृती दर्शवणारे म्युझियम सार्थ अभिमानाने जतन केले आहे. गाईडची कॉमेंटरी आणि माझी मोबाईलवर फोटोग्राफी एकाचवेळी चालु होती. बेसीलिका खूपच छान आहे. पोप जनतेला येथुनच दर्शन आणि संदेश देतात.
पोप दर्शन देतील अस वाटत होत पण तस काही न होता आमचाच पोप-ट झाला!
प्रकाश तांबे
8600478883
Leave a Reply