इन्सब्रुकच्या ऑलेंम्पीया हॉटेलमधुन पाय काढवत नव्हता पण साडे सातच प्रयाण टाळण शक्य नव्हत. दुतर्फा अप्रतीम सृष्टीसौंदर्याचा नजारा न्यहाळत शेवटी 400 किमीवरील इटलीतील व्हेनिसला निघालो. हिरव्यागार दिसणा-या डोंगरावरची लहानमोठी घरे, हॉटल्स, चर्चेस सर्वकाही अत्यंत प्रेक्षणीय दिसत होत.
पर्यटकांसाठी दिलखेचक ठिकाणं म्हणजे काश्मीर, कुलु मनाली, मुन्नार एवढीच नसुन निसर्गानी युरोपातील स्विस, ऑस्ट्रीया, इटली हेही तितकेच तुल्यबळ पर्याय पर्याटकांना दिले आहेत हे टूरभर क्षणोक्षणी जाणवत होत. वाटेत ऑस्ट्रीया इटली बॉर्डर क्रॉस केली आणि त्या पूर्वीच 8° तापमान 20-22° पर्यत सरकल होत.
योगेशनी व्हेनीसविषयी माहिती द्यायला सुरुवात केली. व्हेनिस हा समुद्रात पाच सहा किमी आत वसलेला एकत्रीत बेटांचा पुंजका असुन मोठ्या पुलाने जोडलेला आहे. ह्या पूलावर फोर व्हीलरसाठी जाऊन येऊन चार ट्रँक्स, ट्रँम व रेल्वे ट्रँक आणि शिवाय पादचा-यांसाठी आणि सायक्लिस्टसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. हा स्पॉट दुतर्फा फोटोसाठी अद्वितीय आहे. आता फक्त प्रत्यक्ष भेटीची आस होती आणि साडे चार पाच तासाच्या प्रवासानंतर ज्याच्या प्रतिक्षेत होतो ते व्हेनीस आल.
सर्वत्र पाणीच पाणी असल्यामुळे कोणत्याही एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणासाठी कालव्याचा वापर करावा लागतो. असे असंख्य तलाव किंवा कालवे आहेत म्हणूनच व्हेनिसला कालव्यांच शहर म्हणतात. वॉटरबसेस आहेत, त्यांचे स्टॉप्सही आहेत शिवाय पैसेवाल्यांसाठी वॉटर टँक्सीचा पर्यायही आहेच. बसमध्ये दिवसात कितीही वेळा चढउतार करता येत.
व्हेनिसमधे बोट राईड करुन पायी सीटी टूर करत ग्लास ब्लोइंग फँक्टरी, ब्रिज ऑफ सायझ्, सेंट मार्कस स्क्वेअर बघायला गेलो आणि नंतर 20 मिनीटाची गंडोलाराईड एंजॉय केली.
आता रात्रीच जेवण आटोपून पाडोवाच्या हॉटेलमधे रात्रभर मुक्काम करुन उद्या सकाळी पाडोवा, पीसा, फ्लोरेन्स….
प्रकाश तांबे
8600478883
Leave a Reply