कोलोनचे हॉटेल सोडून ब्लँक फॉरेस्टच्या घनदाट जंगलामार्गे आम्ही अंदाजे साडे चार पाच तासात सुमारे 490 किमी अंतर पार केले आणि टीटीसीच्या कूकू क्लॉक फँक्टरी भागात, भात, पोळीला फाटा देउन, चविष्ट राजस्थानी जेवणाचा आस्वाद घेतला. खूपच सुंदर जेवण होत. तिथून पुढचा -हाइन फॉल (Schaffhausen Neuhausen) हा 85 ते 90 किमीवर आहे. या मार्गावरुन जाताना दूतर्फा निसर्गानी हिरवेगार गालिचे अंथरले होते. मधेच काही टुमदार उतरत्या छपरांची घर दिसत होती. घरांच वेगळेपण डोळ्यात भरणार होत. काही वेळातच जर्मनीची हद्द पार करुन आम्ही स्वित्झरलंडमधे प्रवेश केला आणि -हाईन फॉल्सकडे आगेकूच केली.
-हाईन नदीवरील धबधाब्याची तुलना आपल्या बेढाघाटशी होउ शकते. दोनच गोष्टींचा ठळक फरक जाणवला; आजुबाजूचे रगबिरंगी खडक नव्हते आणि कारभार शिस्तबद्ध होता. सर्व ग्रुपनी 15 मिनीटांची बोट राईड भरपूर एंजॉय केली आणि बसमधे परतताना #वीणा वल्ड#तर्फे चक्क चहा आणि वडापाव होता.
स्वित्झर्लंडमधील ल्युसर्न या छोट्या शहरी रात्रीच जेवण आणि सकाळपर्यंत रहायची व्यवस्था केली होती. वाटेत झूरिक लेकच धावत दर्शनही झाल.
प्रकाश तांबे
8600478883
Leave a Reply