पाडोवा हॉटेलमाधुन चेकौट करुन आम्ही सर्वांनी जन गण मन चे समूहगान केल आणि तिथून 300 कीमीवरच्या पीसा शहराकडे निघालो. इटलीतील पीसाच्या झुकता मनो-याच्या आसपास अजूनही दोन ऐतिहासिक वास्तू आहेत; एक, बाप्टेस्ट्री जी इटलीतील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी बाप्टेस्ट्री आहे आणि जीची घुमटासह उंची झुकता मनो-याहूनही थोडी जास्तच आहे आणि दुसर, पीसा कॅथेड्रल. या दोहोंच्या बरोबरच झुकता मनोरा असूनही पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे तो झुकता मनोराच!
मनो-याची उंची 55 मीटर, बाहेरील व्यास 20 मीटर आणि आतील भाग 4.5 मीटर व्यासाचा असून पाया 4 मीटर खोल आहे आणि टॉवरची सेंटर ऑफ ग्र्ँव्हीटी जमिनीपासून 26 मीटर आहे. हा मनोरा घंटाघर म्हणून बांधायला अकराव्या शतकात सुरुवात झाली आणि थोड्याफार बांधकामानंतर लक्षात आलं की बांधकाम दीड अंश झूकतय. या व युध्द वगैरे काही कारणांनी बांधकाम स्थगित झाल. पुन्हा काही वर्षांनी बांधकाम सुरू झाल आणि हा कोन तसाच ठेवुन अतिशय हळुवारपणे बांधकाम सुरू राहिलं. अंदाजे एकशे ऐंशी वर्षे लागलेल्या या बांधकामाचा तेंव्हा कोन होता साडेपाच अंश जो आता चार अंश असा राहिला आहे.
वेळेअभावी 300 पाय-या चढुन जाणे आम्हाला शक्य नव्हत परंतू सहप्रवाशाकडुन त्यांचा अनुभव ऐकायला मिळाला. चालताना आपण तिरके आणि एका बाजूला झुकतं चालतोय अस त्यांना स्पष्ट जाणवत होत. वरून दिसणारं विहंगम दृश्य ते कधी डोळ्यात साठवत होते तर कधी मोबाईलमधे कैद करत होते. जमिनीकडे पाहून त्यांना जाणवतं होत की एका बाजूला झुकलेल्या अवस्थेत असल्यानं दोन्ही पायावर ताठ उभ राहता येत नव्हत.
आमचा ग्रुप आणि ईतरही जवळजवळ सर्वच पर्यटक आपल्याला झेपेल त्या पोझमधे मनो-याला जवळ घेत होते. कोणी बोटानी ढकलत होते, कोणी पडणा-या मानो-याला पडण्यापासुन सावरत होते; नशीब जमीनीवर तो पक्का असल्याने त्याला कोणी पाठीवर नाही घेतल!
या नंतर परीसरातील शेकडो रोड साईड दुकानातून एखादा तास भरपूर बार्गेनिंग करत
सर्वांनी बँग्ज, पर्सेस, सॉव्हेनिअर्स किंवा मेमेंटो खरेदी केले.
पीसा सोडून आजच्या दिवसाची सांगता करण्यासाठी वाटेत आर्टिस्ट आणि म्युझियम्ससाठी प्रसिद्ध असलेल्या फ्लोरेन्स शहराच्या व्ह्यू पॉइंटला फोटो स्टॉप घेतला.
प्रकाश तांबे
8600478883
Leave a Reply